Bluepad | Bluepad
Bluepad
जीवन घडविणारे शिल्पकार वंदनीय व्यक्तिमत्त्व गुरूजी
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*जीवन घडविणारे शिल्पकार, वंदनीय व्यक्तिमत्व गुरूजी*
जीवनाची दशा आणि दिशा बदलण्याची ताकद शक्ति सामर्थ्य असणारी अद्भुत दिव्य शक्ती म्हणजे गुरुजी .आपण आपल्या जीवनात केलेली प्रगती अथवा अधोगती याच्या पाठिमागे आपल्या जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवरील गुरूजन यांचा शुभ आशिर्वाद असतो .विद्या हे सर्व श्रेष्ठ असं धन आहे. ते एकदा प्राप्त झालं तर आयुष्यच सोनं झाल्याशिवाय राहत नाही .सर्वश्रेष्ठ असणार विद्या हे धन अहोरात्र निस्वार्थी भावनेने दान करण्याच महत भाग्य ज्यांना लाभल असे महान विभूती संस्कारांचे अंखड वाहक निस्वार्थी ,निःसंदिग्ध अहेतुक , प्रामाणिक भावनेने व सचोटीने लोककल्याणासाठी जीवन समर्पित करण्याचे महत भाग्य ज्यांच्या वाट्याला येत ते महान थोर आदर्श वंदनीय पुजनीय गुरूजन असतात . लोककल्याणासाठी जीवन समर्पित करणारे युगो युगे अनेक पिढ्या घडविण्यासाठी अहोरात्र योगदान देताना कोणताही संकुचित भाव वृत्ती न बाळगता उदार अंतःकरणाने सदैव सात्विक ज्ञान दान करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सगळ्या प्रकारच्या चांगल्या उत्तम ,सदाचारी, सात्विक ,शिस्ती लावण्याचे महत्वपूर्ण कार्य करण्याच महत भाग्य गुरूजी यांच्या वाट्याला येत .आपल्या जीवनातील यशाचे खरे शिल्पकार सुद्धा आपले गुरूजनच असतात . आपल्या मध्ये असणारी कुवत, क्षमता तपासून योग्य आकार देण्याच महत्वपूर्ण कार्य सुद्धा गुरूजनच करत असतात .न्याय,निती, धर्म मार्ग अवलंबून सदमार्गने मार्गक्रमण करून यशाल गवसनी घालण्याची प्रेरणा हा गुरुजनांचा कृपा प्रसाद असतो .आपलं आयुष्य आणि भविष्या घडविण्या मध्ये गुरुजनांचा कळत न कळत सिंहाचा वाटा असतो. अगदी जन्म झाल्यानंतर बालपणी लहान वयात आई प्रथम गुरूजी असते .नंतर वेळेनुसार प्राथमिक शिक्षण ते माध्यमिक उच्च शिक्षण या दरम्यानच्या कालावधीत अनेक वेगवेगळ्या गुरूजींच्या सानिध्यात प्रभावाने आपण घडत असतो . मग क्षेत्र कोणतही असु द्या गुरूजींना शिवाय यश नाही.आपल्याला ज्या क्षेत्रात झेप घेयची आहे .त्या क्षेत्रातील गुरूजी यांचा आपल्याला घडविण्यासाठी व आपल्या यशात सिंहाचा वाटा असतो. जीवनाची दिशा हि आपल्याला वेळोवेळी उपलब्ध होणार मार्गदर्शन,आपला सहवास, आजुबाजुला असणार वातावरण, आणि आपण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करत आहेत.ते गुरूजन या सगळ्या बाबींवर अवलंबून असते.महणुन गुरूजनांच योग्य मार्गदर्शन हे खूप महत्वपूर्ण असत . गुरूजनांन शिवाय कोणीही व्यक्ती हा परिपूर्ण होऊ शकत .नौकरी शिक्षण इथपर्यंतच गुरूजणांच महत्व अबाधित नसुन अमर्याद जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला गुरूजनांची आवश्यकता जाणवते.तसेच आपल्याला सदाचारी सात्विक घडवून एक चांगल आदर्श व्यक्तिमत्व घडविण्या मध्ये सुद्धा गुरूजनांचा सिंहाचा वाटा असतो .इतिहासा चे अवलोकन केले तर सर्व थोर सदपुरूष , महापुरुष हे गुरूजनांच्या सानिध्यात घडले.अगदी सृष्टी वर ञेतायुगात अवतार घेतलेले प्रभु श्रीराम असतील किंवा द्वापारयुगात अवातार घेणारे भगवान श्रीकृष्ण असतील शिक्षण हे गुरूंच्या सानिध्यात अज्ञाधारक होऊन च घेतले . देव देवतांना देखिल गुरूजनांच्या सानिध्यात शिक्षण घ्यावं लागल .म्हणजे आपल्या संस्कृतीत गुरजनांच महत्व किती अफाट आहे यावरून आपल्या लक्षात येईलच. आपल्याला देशाला शिक्षणाचा व गुरू शिष्य परंपरेचा खुप मोठा वसा वारसा लाभलेला आहे .हे आपलं भाग्य आहे. आणि हि परंपरा हा वारसा हे संस्कारा पुढे चालण्यासाठी गुरूजन ज्या पद्धतीने अहेतुक योगदान देत आहेत. उल्लेखनीय कामगिरी करत आहेत .हे ऋण फेडण्यासाठी शब्द अपुरे पडतील तरी ते ऋण फिटणार नाही. गुरुजनांचा आदर हि परंपरा तर भारत देशाला ब्रह्मांड नायक भगवान विष्णू यांचे सातवे अवतार प्रभु श्रीराम यांनी जगातील सगळ्यात मोठ्या राज्याचे राजकुमार असताना देखिल विश्वामित्र ऋषी यांच्या आश्रामात जाऊन तेथे सर्व सामान्य व्यक्ती प्रमाणे गावताच्या चटाईवर आराम करून फळ कंद मुळ हा आहार घेऊन शिक्षण पुर्ण केले. प्रभु श्रीराम हे आपल्या राजभवनात ऋषी विश्वामित्र यांना पाचारण करून त्यांच्या कडुन शिक्षण घेऊ शकले असते. परंतु त्यांनी तसं केलं नाही. तर स्वतः त्याठिकाणी वनात जाऊन अश्रामात सर्व साधारण व्यक्ती प्रमाणे शिक्षण घेतलं. व भविष्यातील अनेक पिढ्यांच्या साठी आदर्श निर्माण केला. ज्यामुळे गुरूजण यांचं महत्व अधोरेखित होते. गुरुजनांचा योग्य सन्मान केला गुरूजना प्रति उचित संबंध प्रस्थापित करून आदर भावाने अज्ञाधारक वृत्तीने ज्ञान गृहण करणार्या विद्यार्थाचे आयुष्य आणि भविष्य यशस्वी झाल्या शिवाय राहत नाही. या मध्ये तीळमात्र शंका कुशंका नाही.गुरू हे सद मार्गाने सात्विक वृत्ती ने आयुष्य मार्गक्रमण करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात .जो गुरूजनांचा हात पकडून व्यवस्थित प्रवास करतो .तो नक्कीच योग्य ठिकाणी पोहचतो . म्हणून आपल्या जीवनाचे शिल्पकार, प्रेरणास्थान, सद मार्गाचे पथ दर्शक युगा युगाचे दिशादर्शक आदर्श गुरूजनां प्रति नम्र आदरभाव प्रकट करत असताना प्रत्येकाला आपल्या जीवनात आदर्श विद्यार्थी ते आदर्श शिक्षक हा रोमांचकारी प्रवास सध्या करता येण हे जीवनातील योग्य फलित आहे. म्हणून आपण आज्ञाधारक विद्यार्थी ते आदर्श शिक्षक हा योग्य प्रवास करून लोककल्याणासाठी समर्पित व्हावं हिच प्रत्येकाडुन या निमित्ताने अपेक्षा आहे.शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य*
9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad