Bluepad | Bluepad
Bluepad
वाणीचा प्रभाव आपलं मुल्य निर्धारित करत असतो
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*वाणीचा प्रभाव आपलं मुल्य निर्धारित करत असतो*
आपली वाणी आपलं मुल्य ठरत असते . वाणीचा प्रभाव आणि अभाव हे व्यक्तिमत्त्वाच स्वरूप निश्चित करत असतात .आपले चांगले वाईट संस्कार हे आपल्या वाणीतून प्रकट होत असतात.वाणी हि सर्व बंधनातून मुक्त असते .वाणीवर तसं पाहिलं तर आपण स्वतः सोडता इतर कोणीही निर्बंध घालु शकत नाही.आपलं मत, भुमिका,विचार, व्यक्त करण्याचा,लिहणयाचा , प्रसिद्ध करण्याचा अधिकार स्वातंत्र्य हे आपल्याला घटनेने तर दिलेलं आहेच पण तो आपला नैसर्गिक अधिकार देखिल आहे .पण हाच नैसर्गिक अधिकार ज्याला आपण मूलभूत हक्क संबोधतो. आपला नैसर्गिक अधिकार आपण कशाप्रकारे पद्धतीने वापरतो आहेत त्यानुसार आपल्या व्यक्तीमत्त्वाबाबत विविध पैलू प्रकट होत असतात. आपण आपल मत भुमिका विचार व्यक्त करत असताना आपल्या मेंदुचा सरसेनापती विवेक असले तर आपल्या वाणीतून प्रकट होणारा प्रत्येक शब्द हा प्रभाव निर्माण करणाराच असेल या मध्ये काही शंका नाही म्हणून सदैव अखंड आयुष्भर आपल्या मेंदुचा सरसेनापती विवेक हाच जागृत अथवा कार्यरत ठेवता आला पाहिजे. त्यामुळे आपल्या वाणीतून आपले सु संस्कारच प्रकट होतील.उलट पक्षी त्याच वेळी आपल्या मेंदुचा सरसेनापती जर अविवेक असेल तर आपण जे बोलतोय अथवा आपल्या वाणीतून जे प्रकट होत आहे ते सर्व मर्यादा पार करून संस्कार पायदळी तुडवणार असेल या मध्ये काही शंका नाही. जीवनात विचार हे खुप महत्वपूर्ण आहेत . मुळात दुसर्याला वाईट म्हणून आपण चांगले आहोत हे सिद्ध होत नाही .आपल्या विवेकानुसार इतरांबद्दल आपलं काय मत आहे. यावर आपलं मुल्य अवलंबून असतं. जमिनीच मुल्य हे पाण्यावर अवलंबून असतं .खडकाळ जमीन असली तरी चालेल परंतु पाणी जर सदैव चोवीस तास असेल तर त्या जमिनीवर सोनं पण उगवेल .आणि पिकेल त्याच पद्धतीने खुप काळी भुसभुशीत जमीन आहे. परंतु पाणी उपलब्ध नाही तर त्या जमिनीवर खास करून काही विशेष पिक येणार नाही. तसंच मानवी जीवनाचं आहे .आपण दिसयाला कसे आहोत रंगाने काळे आहोत. की गोरे आहोत शारिर प्रकृतीने धष्टपुष्ट आहोत .कि किरकोळ आहोत .किती श्रीमंत आहोत किंवा गरीब आहेत. यावर आपलं मूल्य नक्कीच ठरत नाही .तर आपलं मूल्य ठरते आपण इतरांविषयी बोलताना किंवा आपले मत आपली भूमिका आपले विचार व्यक्त करताना आपली वाणी किती संयमित आहे . किंवा असंयमित आहे. यावर आपलं सामाजिक मूल्यमापन होत असते. म्हणून आपली रसाळ आणि अमोघ वाणी सदैव पवित्र असली पाहिजे .इतरांबद्दल चा आकाश दुजाभाव वास्तविक मनात असला कि तो वाणीतून प्रकट होणारच. जसं जमिनीत पाऊस पडला किंवा पाणी टाकल तर ज्या पद्धतीचे बियाणे जमिनीत टाकावे .ते तसेच उगवणार त्यामध्ये किंचित सुद्धा गुणधर्मात बदल होऊ शकत नाही. म्हणून आपल्या मन बुद्धी मध्ये ज्या पद्धतीचे विचार आचार संस्कार आपण चिंतन करतो .विचार करतो वेळेनुसार ते घटना किंवा प्रसंग कुठलाही असेल. त्यावर मत व्यक्त , भूमिका व्यक्त करताना, विचार मांडताना आपल्या वाणीतून प्रकट होणाऱ्या प्रत्येक शब्दावर आपले संस्कार आणि आपलं सामाजिक मूल्य निश्चित होतं असत.आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचा आहे .की आपण आपला मूलभूत अधिकार वापरताना सामाजिक मूल्य जपलं पाहिजे आणि वाणी ही खूप पवित्र आहे.महणुन वाणीचा वापर खुप पावित्र्याने झाला पाहिजे .इतरांना तुच्छ लेखून वाईट बोलून किंवा अज्ञानी समजून आपण ज्ञानी आहेत हुशार आहेत प्रतिभावान आहेत असं मुळीच सिद्ध होत नाही .ज्याच्या अंगी समोरच्याला आपल्या पेक्षा मोठा आहे .हुशार आहे विद्वान ज्ञानी आहे हे मान्य करण्याची आणि पाहण्याची दानत असते. ताकद असते. तो वास्तविक मोठा असतो . वाणी आणि पाणी हे नेहमीच जपून आणि सहजतेने वापरले पाहिजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9014634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad