गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023
Share
*मुलांवर दबाव नाही तर प्रभाव निर्माण करणं गरजेचं*
मुलांच्या मनात शिक्षाणा विषयी रस निर्माण करण्याचं कौशल्य पालकांना अवगत कराव लागेल असंयमी युगात पाल्य घडवणं हि तारेवरची कसरत आहे.पण हिच कसरत पालकांना आपल्या मुलांवर प्रभाव निर्माण करून यशस्वी करता आली पाहिजे.व्यक्ति दबावाखाली जितकं कार्य करत नाही त्या पेक्षा कितीतरी पट अधिक आणि फलदायी कार्य प्रभावातून करत असतो.लहान वयात तर अनुकरण आणि प्रभाव हा खुप फलदायी ठरत असल्याने दबावा पेक्षा प्रभाव हा खुप महत्वाचा ठरत असतो . पेरणी उत्कृष्ट पद्धतीने केली तरी पिकं व्यवस्थित उगवतं याची जाणीव आपण ठेवायला हवी.उगवण क्षमता हि पेरणीवर अवलंबून असते.महणुन आपण आपल्या मुलांच्या मनात विचारांची व्यवस्थित पेरणी कशा पद्धतीने करतोय त्यानुसार त्याचं भविष्य ठरत असतं. त्यांच्या बाल मणावर आपल्याला व्यवस्थित प्रभाव निर्माण करता आला तर आपोआपच आपला प्रभाव त्यांच्यावर निर्माण होईल आणि कोणत्याही दबावा शिवाय आपल्याला त्यांना व्यवस्थित पणे घडवता येईल.शेवटी घडण आणि घडवणं हेच महत्वपूर्ण असत.अशा अपेक्षा असल्या पाहिजेत पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे .अशा अपेक्षा यांचं ओझं एवढं मोठं नसावं कि त्या ओझ्याखाली मुलं चिरडली जाऊन बालपण विसरून तणावग्रस्त व्हावीत.शिकलं पाहिजे या बाबतीत दुमत नाही .पण शिक्षण तणावातून नाही तर स्व इच्छेने शिकलं पाहिजे .त्याच्या प्रति गोडी निर्माण करता आली पाहिजे.जो विषय आपल्याला गोड वाटतो भासतो तो आपण स्वतःहून झोकून देऊन पुर्ण करतो .अथवा पुर्ण करण्यासाठी आपली सगळी शक्ती समर्पित करतो .आपली मुलं आपली शक्ती पुर्णपणे शिक्षणासाठी कारणी लावतील यासाठी आपण त्यांना त्या पद्धतीने घडवलं पाहिजे. कोणाच्याही मना विरुद्ध दबावाखाली दबावात आपण फार काही करू शकत नाही.दबावाखाली कार्य करून घेता येत नाही व्यक्ती दबावात मनातुन कार्य करत नाही तो फक्त काही तरी करतोय असं भासवतो .याची खरी जाणीव हि पालकांना असली पाहिजे.आपली मुलं घडविण्यासाठी त्यांना तणावात नाही तर आपुलकीने गोडीने त्यांच्यावर असा प्रभाव निर्माण करा कि शिक्षणाच्या प्रति त्यांच्या मनात गोडी निर्माण झाली पाहिजे.आपली मुलं शिकली पाहिजे त्यांनी प्रचंड मोठं यश निर्माण केलं पाहिजे हि साधारणतः सर्वच पालकांची इच्छा अपेक्षा असते.पण अपेक्षा पुर्ण होण्यासाठी करण्यासाठी मुलांवर दबाव नाही तर संस्कारांचा प्रभाव निर्माण करा आपण त्यांना दबाव निर्माण करून तणावाखाली ठेवण्या ऐवजी मुलांनी स्वतः स्वतःच्या भविष्य बाबत सचेत राहव असा संस्कारांचा प्रभाव त्यांच्यावर निर्माण करा जेणेकरून सशक्त राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपली मुलं सशक्त होऊन आदर्श व्यक्तिमत्व ठरतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची भुमिका खुप महत्वपूर्ण असते .हिच महत्वपूर्ण भूमिका म्हणजे मुलांवर कोणत्याही प्रकारचा अभ्यास करण्यासाठी दबाव निर्माण न करता प्रभाव निर्माण करा जेणेकरून मुलं स्वतःहून अभ्यासा साठी स्वतःला झोकून देतील.पण दुर्दैव सध्या असं होतं नाही पालकांच्या अशा अपेक्षा चरणसिमेवर आहेत .याच अपेक्षेने पालक मुलांवर दबाव निर्माण करत आहेत त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याचे दुरगामी परिणाम होऊन अनेक वेगवेगळ्या घटना घडत आहेत. शिक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस अमुलाग्र बदल होत आहेत त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होऊन बहुतांश मुलं तणावात आहेत. त्या मध्ये आणखी भर पडते ती पालकांच्या अवाजवी अपेक्षा पूर्ण कशा कारायच्या अशा समस्या मुलांच्या समोर उभा असल्याने याचा परिणाम नकारात्मक होऊन अनेक मुलं मुली या तणावातुन स्वतःला उभा करण्यात कमी पडत आहेत हे अगदी वास्तव आहे.जस जग बदलतंय तसं वेळेसोबत बदलता आल पाहिजे. हल्ली संयम कोणाकडेच नाही त्याचा परिणाम आपण आपल्या आजुबाजूला पाहतोय पण आजुन वेळ आपल्या हातात आहे. आपण अजुनही परिस्थिती व्यवस्थित करू शकतो.आपली मुलं आपल्या आज्ञेत आज्ञाधारक राहतील या साठी त्याच्या वर संस्कारांचा प्रभाव निर्माण करता आला .गोडी माया आपुलकी याच वलय एवढं मोठं असलं पाहिजे कि आपल्या आई वडीलांच्या मनात काय चाललंय हे मुलांना जाणता आलं पाहिजे.याचा अर्थ मुलं भविष्यकार झाले पाहिजे असा नाही पण आपल्या आई वडिलांची अपेक्षा काय आहे हि त्यांना न बोलता समजली पाहिजे एवढा मोठा प्रभाव आपला त्यांच्यावर असला पाहिजे. हा प्रभाव अंत्यंत चतुराईने प्रगल्भतने पालकांनी आपल्या मुलांवर निर्माण करणं गरजेचं आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301
0
Share
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य