Bluepad | Bluepad
Bluepad
इच्छा भौतिक नाही तर अध्यात्मिक असल्या पाहिजेत
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*इच्छा भौतिक नाही तर अध्यात्मिक असल्या पाहिजेत*.
इच्छा म्हणजे दुःखांचा मुळ आणि हे मुळ कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी आपल्या मनात निर्माण होणाऱ्या इच्छा ह्या भौतिक नाही तर आध्यत्मिक असल्या पाहिजेत.संसार हा क्षणभंगुर असुन भौतिक सुख सुविधा हे मृगजळ आहे. त्या मागे आपण इच्छा स्वरूप धावत असतो . धावुन धावुन धकलो तरी हा मार्ग संपत नाही.हा कधीच न संपुष्टात येणारा मार्ग असल्याने जीवनाचं सार्थक होण्यासाठी भौतिक नाही तर आध्यत्मिक इच्छा बाळगाल्या पाहिजेत.संसारातील भौतिक इच्छा आध्यत्मिक ज्ञान मार्गाने पुर्ण करता आल्या तर जीवनात दुःखांचा लवलेशही उरत नाही .पण आपल्याला भौतिक इच्छा आध्यत्मिक इच्छा मध्ये परिवर्तित करता येत नाहीत म्हणून खरी अडचण निर्माण होते .संसार म्हटलं कि अनंत इच्छा असतात पण त्या इच्छा पुर्ण होण्यासाठी मर्यादा देखिल असतात .किती हि मिळवलं तरी जीवनास पुर्णत्व मिळत नाही समुद्राला अंत नसतो तसंच इच्छांना देखिल अंत नसतो इच्छा असणं गैर नाही.संसारात इच्छा निर्माण होणारच या मध्ये अजिबात शंका नाही.पण इच्छा निर्माण होताना इच्छा भौतिक आधारावर नाही तर आध्यत्मिक आधारावर आधारीत असल्या पाहिजेत. जेणेकरून इच्छा पुर्ती अपुर्तीच दुःख अथवा खेद कलेष आपल्याला अजिबात होणार नाही. जीवनात दुःखांचा सामना करायची इच्छा नसेल तर जीवनात इच्छा बाळगायला हरकत नाही पण आपली प्रत्येक इच्छा हि आध्यत्मिक ज्ञानाशी सुसंगत असली पाहिजे.महणजे दुःख आपला प्रभाव आपल्यावर निर्माण करू शकणार नाही.आपलं जीवन दुःख मुक्त असाव हे प्रत्येकाला वाटत असत. पण त्यासाठी भौतिक नाही तर अध्यात्मिक इच्छा बाळगल्या पाहिजेत. इच्छा म्हणजे,आशा ,अपेक्षा, महत्वकांक्षा, तृष्णा, वासना, भावना, ह्या वेळ आणि काळानुरूप वेगवेगळ्या असतात.बालपणी वेगळ्या तारूण्यात वेगळया आणि वयोवृद्ध अवस्थेतील वेगळ्या अशा पद्धतीने वेळेनुरूप इच्छा बदलतं असतात. एकंदरीत काय तर जसं वय वाढेल तसं इच्छा बदलतं असतात.पण जीवनातील प्रत्येक इच्छा हि भौतिक नाही तर आध्यत्मिक असेल तर सर्व दुःखा पासुन आपली आपोआप मुक्ति होईल. जीवन म्हणजे इच्छांचा समुद्रच असतो .अनंत इच्छांच ओझं घेऊन आपण जीवन जगत असतो . बहुतांश इच्छा पुर्ण होत नाहीत हे वास्तव पचवता येत नाही म्हणून जीवनात दुःखाची निर्मिती होत असते .जीवनात इच्छा असणं गैर नाही पण इच्छा भौतिक नाही तर अध्यात्मिक असल्या पाहिजेत. जन्म ते मृत्यू हा फक्त इच्छांचा सापळा असतो. या सापळ्यात मृगजळात आपण अलगद अडकतो . आणि संबंध जीवन हे फक्त दुःख मय ठरत .जीवन आणि इच्छा यांचा परस्परसंबंध घनिष्ठ असतो .अनेक इच्छा उत्पन्न होऊन त्या पुर्ण करण्यासाठी जीव अहोरात्र धडपडत असतो.पण भौतिक इच्छा या मध्ये फार काही साध्य होत नाही शेवटी पदरी दुःख पडत .अध्यात्मिक इच्छा ह्या ज्ञान सदृश असतात. त्याची कल्पना, संकल्पना तृप्ती ह्या सर्व बाबी ज्ञानाशी संबंधित असल्याने या इच्छा दुःख नाही तर आनंद निर्माण करत असता.संसारात सगळं काही अस्थिर अस्थायी असतं .आणि अस्थायी बाबींसाठी आपण नाहक दुःख निर्माण करतो. जीवनाचा मुख्य उद्देश आणि अर्थ समजला तर आपण निरर्थक बाबींवर लक्ष्य केंद्रित करत नाही महत्वाचा आणि आत्मा हितार्थ काय आहे यावरच लक्ष्य केंद्रित करतो . आत्मा हितार्थ बाबी ह्या चिरकाल टिकणारया असता. पण आपण जो कायम स्वरुपी टिकणार आहे ते स्वीकारण्यास तयार नसतो आणि जे क्षणिक आहे संपुष्टात येणार आहे ते मिळविण्यासाठी उतावीळ असतो .पण आयुष्य अंतिम टप्प्यात असताना सत्य समजत पण उपयोग होत नाही म्हणून जितक्या लवकर जागृत होता येईल तितक्या लवकर जागृत होता आलं पाहिजे. इच्छा भौतिक बाळगुन दुःख अर्जित करण्या ऐवजी आध्यत्मिक इच्छा बाळगून दुःख मुक्त जीवन जगणं कधीही उत्तम आणि हितकारक आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad