Bluepad | Bluepad
Bluepad
ज्ञान हाच निर्व्यसनी जीवनाचा पाया आहे
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*ज्ञान हाच निर्व्यसनी जीवनाचा पाया आहे*
अज्ञान हे दुःख निर्मितीच केंद्र आहे . दुःख निर्माण झाल कि पावलं आपोआप व्यसनाच्या मार्गाने मार्गक्रमण करतात. पुरेसं ज्ञान असेल तर कोणत्याही प्रकारचा व्यसन आपला पाया आपल्या जीवनात आरंभ करू शकत नाही.प्रवासात चालकाची नजर हटली कि अपघात निश्चित असतो .तसच आपल्या जीवनातील जीवन मार्गावर मार्गक्रमण करताना ज्ञान मार्ग सोडला तर व्यसन लागण्यासाठी फार वेळ लागत नाही. म्हणून ज्ञान मार्ग जीवनाचा सुरक्षित मार्ग आहे. आपण ज्ञान मार्गावर असताना बहुतांश व्यसन हि आपल्या आजूबाजूला चुकुन सुद्धा फिरकत नाहीत.फिरकलीच तर आपली ते शिकार करू शकत नाहीत .आपली शिकार होऊ देयची नसेल तर आपला जीवन मार्ग हा ज्ञान सदृश असला पाहिजे.मुळात निर्व्यसनी जीवन राहण्यासाठी‌ आपलं जीवन सदैव ज्ञान मार्गावरच असल पाहिजे.सुख दुःखांचा समुद्र म्हणजे जीवन ,संकटाची मालिका आणि समस्यांची वादळं यामुळे जीवन वारंवार प्रभावित होत असतं .आणि याच दरम्यान अनेक बाह्य घटक मग आपला प्रभाव निर्माण करून आपल्यावर नियंत्रण स्थापित करत असतात .मग या मधुनच आपण नशेच्या दिशेने प्रवास सुरू करतो .या सगळ्या मधून आपली सुटका फक्त आत्मज्ञानानेच होऊ शकते .आपल्या आजुबाजूला असणार वातावरण आपल्यवर काही परिणाम घडवून आणत असत ‌.मुळात आपला परिसर ,संगत, सहवास ,आपला संपर्क,यावर बरंच काही अवलंबून असतं .या सगळ्या मध्ये महत्वाची बाब म्हणजे आत्मज्ञान आपल्या कडे किती या नुसार हा प्रभाव आपल्यावर परिणाम करतो. आयुष्यातील ,वाटेवर ,बिकट आति बिकट ,आशा प्रंसांगातुन सही सलामत मार्गक्रमण करण्यासाठी उपयोगी पडणार आत्म ज्ञान हे अमृत आहे . ज्यांच्या जवळ आत्मज्ञान हे अमृत आहे. त्यांचं या सृष्टीवरील कोणतही विष विकार काही बिघडवु शकत नाही . सृष्टी वर जसं सकारात्मक शक्ति कार्यरत असतात त्याच पद्धतीने नकारात्मक, विघातक शक्ती देखिल कार्यरत असतात .पण या विघातक शक्ती पासुन आपली सुटका करून घेण्यासाठी आपल्याकडे आत्मज्ञान असणं खूप गरजेचं आहे . म्हणून आपल्याकडं आत्मज्ञान असेल तर आपण कोणत्याही नशेच्या प्रभावात जाणार नाहीत.त्या मार्गावर धावणार नाहीत किंवा त्या दिशेने जाणार नाहीत. तशी वाटचाल देखिल कधीच करणार नाहीत. एवढी ताकद क्षमता आत्मज्ञानात आहे.महणुन आत्मज्ञान हाच नशा मुक्तिचा पाया आहे . नशा हि नशाच मग ती कोणतीही असो, सत्ता,पद ,पैसा , संपत्ती, प्रसिद्धी, किंवा याव्यतिरिक्त कोणतीही असेल .जीवनाची दिशा व दशा बदलणारी अवस्था म्हणजे नशा असते.सृष्टी वर असा कोणीही व्यक्ती नाही कि जो त्याची अंतरमनातुन नशेच्या गर्तेत जाण्याची इच्छा असते .पण वेळ, काळ, परस्थिती, याचा प्रभाव आणि वेळच्या अनुषंगाने झालेले अघात त्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी खुणावत असतात आणि नेमकं याच वेळी आपल्याकडं आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटना घडामोडी विषयी परफेक्ट आध्यत्मिक ज्ञान नसेल तर मग मात्र आपण नशेच्या मार्गावर धावणार या मध्ये अजिबात शंका नाही.कारण आपल्याकडं असणार्या समर्पक ज्ञानमुळे आपल्याला त्या दिशेने जाण्याची आवश्यकता भासणार नाही. नशा कोणत्याही प्रकारची असो ती जीवनाच्या विनशाची दिशा निश्चित करत असते .आणि या भयानक संकटातुन आपला बचाव व्हावा हि प्रत्येकाची मनोमन इच्छा असती .पण महत्वाचा विषय हा आहे त्यावरील उपाय काय तर नशा मुक्ति साठी आत्मज्ञान हा एकमेव उपाय आहे.आणि ज्याने आत्मज्ञान आत्मसात केले त्याला कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारची नशा करण्याची आवश्यकता भासणार नाही . म्हणुन आपण आत्मज्ञानाने समृद्ध असल पाहिजे.महणजे जीवनातील कोणतीही नशा तिचा प्रभाव आपल्यावर दाखवु शकणार नाही. नशा म्हणजे फक्त अंमली पदार्थ इथं पर्यंत मर्यादित अर्था‌ नही तर एकंदरीत मानवी जीवनात एकच बाब पुन्हा पुन्हा वारंवार आपलं लक्ष्य केंद्रित करण .नशा म्हणजे सर्व साधारण पणे व्यसन किंवा सवय प्रत्येकाला कोणत्या तरी प्रकारचं व्यसन असतंच व्यसन किंवा सवय मुळात अनेक वेगवेगळ्या प्रकारची आहे .आणि या सगळ्या प्रकारातील व्यसना पासुन आपली सुटका सहीसलामत करायची असेल तर आत्म ज्ञाना शिवाय तरूनोपाय नाही .
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक, तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad