*सद्गुण अवगुण हे देहाचे मुळ निवासी असुन ज्याचे लाड करू तो विराट रूप धारण करणार*
आयुष्याच्या रंगमंचावर मार्गक्रमण करत असताना . कोणत्या वळणावर टप्यावर आपल्या देहातील कोणता गुण प्रकाट होईल .आणि होत्याच नव्हत होईल. किंवा अशक्य प्रायः गोष्ट शक्य होईल.याची पूर्वकल्पना हि कोणालाही नसते . परंतु हे शक्य होत ते आपल्या देहांत एकत्र नांदत असणारे सद्गुण व अवगुण यांच्यातील एकाजण त्या क्षणी अचाणक प्रकट झाल्यामुळे आणि म्हणूनच आपण आपल्या जीवनात कोणत्या गुणांचे पालण पोषण केले आहे करत आहेत व आपल्या सहवासात कोण आहे तसेच आपला मार्गदर्शक दिशादर्शक कोण आहे .याला खूप प्रचंड असं महत्व आहे यदाकदाचित कळतं न कळत आपल्या मधील अवगुण विस्तार करू लागले. किंवा आपल्या मनात अस्तित्व निर्माण करू लागले. तर अशा वेळी प्रकाट झालेले अवगुण हे आपल्याला प्रचंड नुकसानदायक ठरण्या अगोदरच जर आपला सहवास आपले मार्गदर्शक दिशादर्शक हे सुयोग्य असतील. तर ते त्याची तीव्रता कमी करून नष्ट करून, आपला बचाव करू शकतात. तसेच आपल्या होणा-या नुकसान पासून वाचवु शकतात .यालट योग्य सहवास योग्य मार्गदर्शक अशा वेळी लाभलं नाही. तर मग मात्र अहित होणारच .म्हणून आयुष्य हे खुप सावधपणे जाण्याची बाब आहे . कधी कोणता अवगुण प्रकाट होईल. आणि अपघात घडवेल .आणि आयुष्य वाया घालवेल. याची खात्री कोणीही देऊ शकत नाही . आपल्या देह मध्ये सद्गुण आणि अवगुण हे एकत्र नांदणारे मुळ निवासी ते परस्पर विरोधी आहेत.आपल्यवर ज्या पद्धतीने संस्कार होतात . त्या पद्धतीने त्यांचा विकास होतो .मग चांगले संस्कार झाले. तर चांगले सदगुण विकासित होतात. आणि कुसंस्कार झाले .तर अहितकारक गुण विकासित होतात. आपल्या मनावर बुद्धीवर एकावेळी एकाच गुणाच संस्काराचा अधिराज्य असु शकत. म्हणजे सद्गुण अंगिकारले तर दुर्गुण प्रगट होणार नाहीत. आणि दुर्गण अंगिकारले तर सद्गुण प्रगट होणार नाहीत . त्यामुळे आपण ज्याचा आदर सत्कार करू ज्याला महत्व देऊ . तो गुण हाळुहळु विकसित होऊन आपलं विशाल रूप धारण करणार .आणि शरतेशेवटी आपणस आपण विकिसत केलेल्या गुणांनुसारच परिणामांना सामोरे जावे लागेल .मग आपण सद्गुण स्वीकारले असतील तर चांगले परिणाम दिसतील. आणि दुर्गुण स्वीकारले असतील तर अहितकारक परिणाम दिसतील. शेवटी आपण जे स्वीकारले ते प्रगट होणार. समजा आपण शेतात बाजरीच बी टाकले तर बाजरीच उगवणार ज्वारी कधीच उगवु शकत नाही . आपण जे टाकणारं तेच उगवणार त्यामुळे आपल्या शरीरात असणारे चांगले आणि वाईट गुण यापैकी आपण ज्याचे पालक होणार. त्याचा विस्तार व विकास होणार हे निश्चित आहे.मग आपल्या वर ही सर्वस्वी जबाबदारी आहे कि आपण काय स्वीकारलं पाहिजे.व काय नाकारले पाहिजे.जर आपल्याला आपल्या आयुष्याच कल्याण करायचं असेल आयुष्य सदकारणी लावायच असेल. तर आपण आपल्या शरीरातील सद्गुणांचा विकास करून ते वाढीस लागतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
प्रत्येक व्यक्ती हा या सृष्टी वर जेव्हा जन्म घेऊन येतो . तेव्हा सुरवातीचा कालखंडा म्हणजे बालपणी अगदी निरागस असतो . चिखालाच्या गोळ्या सारख म्हटलं तरी चालेल .आणि ज्या पद्धतीने चिखालाच्या गोळ्याला कारागिर आकार देईल .त्या प्रमाणे तो गोळा विकसित होऊन मुल्यावान किंवा अ मुल्यावन वस्तू म्हणून विकसित होतो . त्या चिखलाच्या गोळ्या पासुन घडविलेल्या प्रत्येक वस्तू चे मुल्य हे वेगवेगळे असते.मानवी शरीराचं पण जवळपास असंच आहे . सद्गुण आणि अवगुण हे परस्परांचे विरोधी पण एकाच शरीरात वास करून राहतात .आणि ज्याला आपण खतपाणी घालतो .त्याचा विकास होऊन आपण तसे घडतो. मध्ये कोणतीही शंका नाही.महणुन जगात जन्माला येताच कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही. तर आयुष्याच्या पदोपदी पावलोपावली आपल्याला जशी संगती ,सहवास लाभेल आपले असणारे मार्गदर्शक मार्गदर्शन ज्या पद्धतीच आहे ,मग ते हितकारक आहे,कि अहितकारक आहे, तसेच आपल्या मध्ये असणारे सद्गुण व दुर्गुण या पैकी कोणते गुण विकसित करण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहेत. यावर हे सगळं अवलंबून असतं.आणि जर सुसुंगती लाभली तर आपण गुणवत्ता पुर्ण घडु शकतो . आणि कुसंगती लाभली तर आपण दुरगुणी होऊ शकतो .एकंदरीत आपल यश आणि अपयश तसेच आपली किर्ती व अपकिर्ती हि आपल्या संगतीवर , आपल्या मार्गदर्शक वर, तसेच आपल्या मध्ये असणार्या सद्गुण दूरगुण यापैकी ज्याचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहेत.व ज्या गुणाला नियमित खतपाणी घालत आहोत . त्यानुसारच आपल्यला परिणाम दिसणार . म्हणून कोणीही व्यक्ती जन्माला येताच ज्ञानी नाही, किंवा कोणी अज्ञानी , नाही तसेच कोणी सद्गुणी किंवा कोणी दुरगुणी नाही ,त्याच प्रमाणे, कोणी विवेकी किंवा अविवेकी नाही ,एवढंच काय तर कोणी सदाचारी किंवा कोणी दुराचारी नाही . जन्मताच कोणी सतपुरूष वा चोर डाकु दरोडेखार नाही. म्हणजे जन्म घेता क्षणी आपण कोणीच नाही .आणि जन्म झाल्यानंतर जसं जसं आपलं वय वाढेल. आणि वय वाढत असताना ज्या पद्धतीचा सहवास, मार्गदर्शक ,संगती , विचार मग ते सुविचार किंवा कु विचार आपल्याला लाभेल .त्या पद्धतीने आपल्यामध्ये जन्माताच असणारे सद्गुण आणि दुर्गुण हे त्या पद्धतीने वाढीस लागणार. आणि त्याच विस्तृत रूप झालं कि मग त्याचे परिणाम हळूहळू आपल्यला जाणवणार . या मध्ये काहीही शंका नाही. आणि म्हणून सद्गुण स्वीकारायचे कि अवगुण हे आपल्यावर अवलंबून आहे . जर आपल्याला अवगुण पासून अलिप्त रहायचं असेल तर आपल्या जीवनातील योग्य संस्कार , योग्य मार्गदर्शन, सुसंगती, योग्य मार्गदर्शक, सुविचार, न्याय निति धर्माचं आचरण, प्रमाणिकता , सचोटीने व्यवहार, या पद्धतीने आपण आपले सद्गुण विकसित करून ,आपलं जीवन सार्थकी लावु शकतो .व आयुष्याची वाट लागण्यासाठी कारणीभूत असणारे अवगुण हे कोणत्याही क्षणी प्रगट होऊ शकतात त्यापासून आपण आपलं रक्षण करू शकतो .
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301