Bluepad | Bluepad
Bluepad
विवेक जागृत होणं हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश असतो
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*विवेक जागृत होणं हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश असतो*
शक्ति बळ सामर्थ्य निर्माण होण्यासाठी शिक्षण व सत्याचा मार्ग समजण्यासाठी विवेक जागृत झाला पाहिजे विवेक जागृत होण्यासाठी शिक्षण हे अमृताची भुमिका बजावत .पण हल्ली आपण शिक्षणाला खुप हलक्यात घेतो .याचा अर्थ आपल्याला शिक्षणाचं मुळ समजलं नाही.शिक्षण हे वाघीणीचे दुध असुन ते जीवन उत्थानाच सर्व श्रेष्ठ आणि उत्कृष्ट असं माध्यम आहे.शिक्षणामुळे आपला विवेक जागृत होतो . आणि एकद विवेक जागृत झाला कि मग आपण जगातील कोणत्याही शक्तिला , सामर्थ्याला ,वैभवाला घाबरत नाहीत. कारण सत्य हे कधीच घाबरत नसतं . त्याला भिती नसते आपली विवेक हि शक्ती जगातील सगळ्या शक्ति वर प्रभावी ठरते.सत्य असत्य या मधील फरक ओळखता येण त्याच बरोबर सत्य स्वीकारण्याच आणि असत्य नाकारण्याचा धाडस निर्माण होण्याची शक्ति म्हणजे विवेक आणि हाच विवेक जागृत होण्यासाठी शिक्षण हेच मुख्य माध्यम असत.शिक्षणाचं महत्त्व आणि उदेश हा जीवनात सार्थकी लागला पाहिजे असं खरया अर्थाने वाटतं असेल तर शिक्षणामुळे आपली चेतना आपला विवेक जागृत ‌ झाला पाहिजे.मुळात आपण शिक्षण कशासाठी घेतोय हा प्रश्न अगदी सहजपणे कोणालाही विचारला तर नौकरी रोजगार काही तरी पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अथवा भौतिक सुविधा साधन संपदा अर्जित होण्यासाठी सहकार्य होईल हाच मुख्य हेतू ठेवून आपण शिक्षण घेत असतो. हेच उत्तर प्रथम दर्शनी आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळेल या मध्ये अजिबात शंका नाही.पण शिक्षण म्हणजे फक्त नौकरी अथवा पोटा पाण्याची सोय हाच समज साध्यतरी सगळीकडे रूढ असला तरी सुद्धा आयुष्यात शिक्षणाचा उपयोग हा मुख्यत्वे चेतना जागृत होण्यासाठी असतो .आपला मेंदू आपली चेतना जागृत झाली तर आपल्यासाठी जगात असंभव असं काहीच उरत नाही .पण आपण खरया अर्थाने याच मुख्य उद्देश पासुन वंचित राहतो .आणि दुय्यम असणार्या उद्देशाला मुख्य समजुन मृग जळात अडकुन राहतो. उदात्त आति उदात्त हेतू धेय्य अर्जित करण्यासाठी असणार शिक्षण आपल्या मध्ये सामर्थ्य ताकद शक्ति निर्माण करत असतं पण आपण शिक्षण म्हणजे फक्त नौकरी एवढाच समज डोक्यात ठेवून वावरत असतो. सामर्थ्य शक्ति आणि ताकद याच महत्त्व जीवनात अनन्यसाधारण असं असतं पण हेच अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला आपल्या मध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षणाची खरी आवश्यकता आणि भुमिका समजणं गरजेच आहे.आपण हि भुमिका जाणुन घेण्यासाठी फार उत्सुक नसतो . नौकरी अथवा रोजगार कसा मिळेल आणि मार्क कसे मिळतील वाढतील एवढ्यापुरताच आपण शिक्षणासोबत जोडले जातो .आपण फक्त क्षणिक लाभ पाहते नौकरी एवढाच आपला वरकरणी उदेश असल्याने आपण शिक्षणातील अनमोल अमृता पासुन वंचित राहतो. कस्तुरी पोटात घेऊन फिराणारा मृग कस्तुरी पासुन वंचित असतो तशीच आपली सुद्धा काहिशी अवस्था आहे. शिक्षणाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदला पाहिजे आपण शिक्षणाकडे ज्या पद्धतीने पाहतोय त्याच पद्धतीने त्या मर्यादेत आपल्याला त्याचा लाभ होईल. शिक्षणाच्या प्रति आपण जेव्हा उदात्त आणि विराट दृष्टीकोन ठेवून ज्ञान अर्जित करू तेव्हा निश्चितच आपला विवेक जागृत होईल आणि शिक्षणाचा खर लाभ आपल्याला होऊन तेच ज्ञान लोक कल्याणासाठी करणी लागेल या मध्ये काही शंका नाही. जीवनाचं यथार्थ ज्ञान समजण्यासाठी शिक्षणाचा मुल्य आणि महत्व समजण्या बरोबरच शिक्षणाचा मुख्य हेतू आपल्याला आपल्या जीवनात साध्य करता आला पाहिजे.व त्याचा योग्य उपयोग करून घेऊन आपलं जीवन सार्थक करण्या बरोबरच आपण आपलं शिक्षण ज्ञान हे समाजाच्या देशाच्या हितासाठी सत्कारणी लगल पाहिजे.शिक्षण सत्कारणी लागण हे खुप महत्वाच आणि आवश्यक बाब असुन ते गरजेचे आहे. सत्य ओळखण्याची क्षमता ताकद निर्माण झाल्याशिवाय हे सगळं ईप्सित साध्य होणार नाही म्हणून सत्य जाणण्यासाठी शिक्षणाचा खरा उद्देश आपला विवेक जागृत झाला पाहिजे आणि तो जागृत करण्यासाठी शिक्षण घेताना क्षणोक्षणी जागृत असल पाहिजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad