Bluepad | Bluepad
Bluepad
मनाला ध्यानाने जिंकता आला पाहिजे
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*मनाल ध्यानाने जिंकता आल पाहिजे*
‌ आपलं मन हेच आपल्या जीवनातील अनंत दुःखांच मुळ असतं मात्र हेच मुळ कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी मनाला ध्यानात गुंतवता आलं पाहिजे.मन जिंकता आल तर शिल्लक कहिच उरत नाही, मनुष्य ते ईश्वर हि जी यात्रा आहे त्याचा पहिला अध्याय म्हणजे मन जिंकणे अथवा मनावर प्रभुत्व निर्माण करणं हाच आहे .पण हेच महत्वाचं कार्य करण्यापासून आपण आयुष्यभर दुर राहतो .मनाला जिंकण्यासाठी ध्यान हिच सर्व श्रेष्ठ अशी साधना आहे.मानवी जीवनाचं एकंदरीत मुल्यमापन पाहिलं तर आपल मन हेच आपला मुख्य शत्रु आणि मित्र असल्याने आपलं मन हे आपल्या चांगल्या वाईटासाठी त्याच बरोबर हित अहितासाठी होण्यासाठी जबाबदार असत .आपल्या मनावर आपलं नियंत्रण प्रस्थापित असेल तर मग जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जाण्याची आवश्यकता आपल्याला भासत नाही.आपलं मन जर अनियंत्रित असेल तर मग अखंड जीवन फक्त ताण तणाव, अनंत दुःख या मध्येच अडकून पडत . त्या सोबत अनेक अडथळ्यांची शर्यत देखिल पार करावी लागत असल्याने अनियंत्रित मन हेच कारणीभूत ठरत असल्याने ते क्षणोक्षणी आपल्याला अस्थिर ठेवत. प्रत्येकाला मन शांती हवी आहे .मन शांती नको आहे अस शोधून देखिल आपल्याला कोणी सापडणार नाही.पण मन हे तर मन आहे मग ते प्रचंड अति चंचल,अति वेगवान,वायु वेगाला सुद्धा मागे टाकणार या मध्ये शंका नाहीच इतकं बलाढ्य शक्तिशाली मन मग शांत कसं राहिल. म्हणून मनाला शांत करण खुपच कठिण असतं .पण प्रयत्न केला तर अशक्य अस काहीच नसतं .संबंध आयुष्य आणि अंतिम साध्य याचा सारासार विचार ज्ञान सदृश अवस्थेतून केला तर जीवनात अर्जित करण्या सारख काय आहे. तर अंतिमतः आपल्या मनावर आपलं नियंत्रण असण अथवा आपलं मन नियंत्रित असण हेच जीवनातील सर्व श्रेष्ठ असं साध्य आहे.अनियंत्रित मन हेच दुःखाचं मुळ व आपलं जीवन प्रभावित होण्याचं मुख्य कारण असतं .मन हे मोह मायेच मृगजळा असल्यामुळे ते आपल्याला घेऊन धावणारच आहे. या मध्ये अजिबात शंका नाही.आपण त्या सोबत किती धावायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्या मनाची अवस्था चंचल अस्थिर असेल तर जीवनात आपोआपच अशंतात निर्माण होते .जीवनातील अशंती म्हणजे आपल्या अस्थिर मनाची एक प्रकारे फल प्राप्तीच असुन दैनंदिन जीवनात आपण किती हि प्रयत्न केला तरी सुद्धा आपलं मन हे स्थिर होत नाही.मनाल स्थिर करण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी ध्यान हेच आवश्यक आहे.जगात जिंकण्यासाठी सगळ्यात मोठी अवघड आणि कठिण बाब हि आपलं मन आहे.मनाल जिंकल त्याने जग जिंकल कारण जग जिंकता येईल पण मन जिंकता येत नाही. मानवी मनाला जिंकण हि जीवनातील सगळ्यात कठिण गोष्ट आहे. पण ती तितकीच सोपी आणि सहज देखिल गोष्ट आहे.मनाला जिंकण्यासाठी आपण अंनत प्रयत्न करत असतो. पण शेवटी सगळे प्रयत्न निरर्थक ठरतात पण मन काही नियंत्रित होत नाही.आपल मन नियंत्रित असलं पाहिजे हि प्रत्येकाची मनोमन इच्छा असते .पण तसं होत नाही सगळ्या दुःखाचं मुळ मन आहे.जीवनातील सगळे चांगले वाईट प्रसंग हे आपल्या मनाची देणं असते .आपलं मन आपल्या अधिपत्याखाली अथवा नियंत्रणात रहिल पाहिजे हि साधारणतः प्रत्येकाची मनोमन इच्छा असते ज्याला मनावर ताबा मिळवता आला त्याला सगळं काही शक्य झालं. हेच कठीण कार्य सोपं होतं ते ध्यानाने ध्यान केल तर अगदी सहजपणे आपण आपलं मन जिंकु शकतो . जसं आपलं मन असतं त्या दिशेने आपलं जीवन मार्गक्रमण करत असत.मनावर आपलं नियंत्रण किती मजबूत आहे. अथवा सैल आहे त्यानुसार आपली दिशा ठरत असते. त्या अनुषंगाने प्रत्येक जण आप आपल्या पद्धतीने आपलं मन कसं नियंत्रित करता येईल या साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो .अनेकजण मन नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नशेच्या साधनांचा देखिल उपयोग वापर करत असतात. तो क्षणिक आणि घातक विनाशकारी आणि तात्पुरता मार्ग आहे.परंतु सगळ्यात सोपा सुलभ आणि सहज उपाय ध्यान हाच आहे. दैनंदिन जीवनात नियमित पणे ध्यान धारणा अथवा साधना केली तर निश्चितच मनावर नियंत्रण प्रस्थापित होण्यासाठी फारसा वेळ कालावधी लागत नाही.ज्ञान हा पाया मजबूत असेल तर मनाला जिंकण्यासाठी ध्यान करण्याची कला शिकण्यासाठी फार वेळ लागत नाही.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य*मनाला ध्यानाने जिंकता

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad