*साहित्य समुद्रात उतरल्या शिवाय विचारांचे मोती सापडत नाहीत*
आपल्या मनावर ज्या बाबींचा प्रभाव निर्माण होतो . त्या अनुषंगाने घडण्यासाठी अथवा बिघडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो.आपण आपल्या मनात कोणत बीज पेरल त्यानुसार फल स्वरूप पिकं येत असत . दैनंदिन जीवनात योग्य उत्तम सात्विक साहित्य वाचन केले तर नक्कीच आपल्या जीवनात यथा योग्य बदल होईल.जीवनातील योग्य बदल होण्यासाठी साहित्य समुद्रातील अनमोल मोती आपल्याला शोधता आलेच पाहिजे त्या शिवाय पर्याय नाही. साहित्य हे विचारांच्या संस्कारांची खान असते .जीवनात हि खान सापडण्यासाठी साहित्य समुद्रात उतरल्या शिवाय गत्यंतर नसतं . ज्याला हि खान सापडली त्याच्या आयुष्याची चांदी होऊन श्रीमंती आपोआप वृद्धिंगत होते. सकारात्मक विचारांमुळे उर्जा निर्माण होत असते .आदर्श आणि लोक कल्याणकारी जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल,असे प्रभावी उत्कृष्ट आणि दर्जेदार विचारांचे संस्कार हे आपल्याला साहित्यातून मिळत असतात . म्हणून जसं साहित्य वाचन केलं तसं जीवन आपोआप घडत असतं .मानवी जीवन जगत असताना आपले आचार, विचार ,वर्तणुक, गुण ,दोष, चांगले, वाईट विचार,आपली सामाजिक प्रतिम, प्रतिष्ठा, ह्या सगळ्या महत्त्वाच्या बाबी ह्या आपल्यावर झालेल्या वेगवेगळ्या संसकारावर अवलंबून तर असतातच पण त्या अनुषंगाने आपलं जीवन सार्थकी लागलं अथवा निरर्थक ठरल हे फक्त आपल्या वर वेळोवेळी झालेल्या चांगल्या, वाईट योग्य, अयोग्य संस्काराचे प्रतिबिंब स्वरूप असत. आपण जीवन मार्गावर असताना जीवना मध्ये वेगवेगळ्या टप्यावर जसं बालपणी आई , प्राथमिक शिक्षण घेताना शिक्षक दहावीच्या दरम्यान मित्र आणि दहावी नंतर समाज वातावरण यांचा आपल्यावर प्रभाव तर असतोच पण या सोबत आपण वाचन करत असलेलं साहित्य खुप महत्वपूर्ण आहे . हेच साहित्य आपलं जीवन निर्धारित करत असत म्हणून आपण कधी काय वाचन केलं पाहिजे हे खुप महत्वाच आहे.कारण या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्यावर वेग वेगळ्या प्रकारचे संस्कार होत असतात .जसं आपले आई-वडील,शिक्षक, मित्र, आणि आजुबाजुला असणारे वातावरण यानुसार आपण घडत असतो.तस दरम्यान च्या काळात काही सगळ्यात महत्वाचे आणि प्रभावी संस्कार ज्याला आपण विचारांचे संस्कार म्हणतो.हे विचारांचे संस्कार आपल्याला जीवनात खूप महत्वपूर्ण भुमिका निभावत असतात ते संस्कार आपल्याला उत्कृष्ट आणि दर्जेदार साहित्यातून मिळत असतात तसेच त्याचे परिणाम स्वरूप आपल्या जीवनावर सकारात्मक होत असतात आणि त्या संस्कारातून आपण घडत असतो या सगळ्या संस्कारांमध्ये विचारांचे संस्कार हे जीवनात सकारात्मक उर्जा निर्माण करतात आणि आपल्या आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देत असतात म्हणून हे विचारांचे संस्कार खूप महत्वपूर्ण आहेत .म्हणून आपल्या जीवनामध्ये दैनंदिन आणि नियमित दर्जेदार साहित्य आपण वाचन केलं पाहिजे .अनादी काळापासून ते आज तागायत पर्यंत म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग , द्वापारयुग,आणि कलयुग , या चारही युगात मानवी जीवनातील विचारांच्या संस्काराचे साहित्य हे उगमस्थान राहिलेल् आहे.आणि सध्याच्या गतिमान, आधुनिक तसेच तंत्रज्ञान आणि विज्ञान युगातील कालखंडात सुद्धा साहित्य हे मानवी जीवनातील मूलभूत आणि पायाभूत संस्काराचे प्रेरणास्थान आहे . साहित्य ही कलाकृती कल्पनाप्रधान असली तरी साहित्याची पाळेमुळे वास्तवाच्या जमिनीवर खोलवर रुजलेली असतात. वास्तवातील घटना प्रसंग याची निवड करून त्याची पुनर्रचना करून आणि त्यामध्ये स्वतःची नवी भर घालून साहित्यिकाने साधलेली वास्तव संमातर अशी ती नवनिर्मिती असते .आणि सगळ्यात महत्वाचे ती स हित असते . म्हणजे साहित्याची रचना समाजाचं हित साध्य होण्यासाठीच केलेली असते. तसेच ज्या विचारातून समाज हित साध्य होऊ शकत नाही ते विचार साहित्य स्वरुप नसतात. किंवा साहित्याचा भाग होऊ शकत नाही . साहित्यातून मिळणारे विचारांचे संस्कार आपल्याला आदर्श जीवन जगण्याची आणि यशस्वी होण्याची प्रेरणा देतात. तसेच साहित्यातून मिळणारे संस्कार आपल्याला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देत असतात ज्या पद्धतीच्या साहित्याच आपण वाचन करतो तसं अनुकरण देखिल करतो .त्या पद्धतीने आपलं जीवन घडत असतं आपण अवलोकन केलेल्या साहित्य विचारांचे संस्कार हे परिणाम स्वरूप चांगले-वाईट आपल्या जीवनामध्ये दिसत असतात. म्हणून आदर्श आणि उत्कृष्ट दर्जाचे दर्जेदार साहित्य आपण नियमित दैनंदिन वाचन केले पाहिजे. ऐकले पाहिजे कारण जीवनातील अमुल्य महत्वपूर्ण असे विचारांचे संस्कार आपल्याला साहित्यातून मिळत असतात. आपण जीवन यथार्थ होण्यासाठी आपलं कल्याण होण्यासाठी विचारांचे अनमोल मोती शोधण्यासाठी जीवनात दैनंदिन आपण साहित्य समुद्रात उतरलच पाहिजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301