Bluepad | Bluepad
Bluepad
अपयशाला वारसदार शोधण्या ऐवजी आपल्या ञुटी शोधणं लाभदायक ठरत
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*अपयशाला वारसदार शोधण्या ऐवजी आपल्या ञुटी शोधणं लाभदायक ठरत*
जीवन हा यश अपयशाचा खेळ असतो .अपयशाला नकारात्मक घेऊन त्याचे खापर कशावर तरी फोडून स्वतः ला निर्दोष सिद्ध करण्याला फार काही अर्थ नसतो . आपण कुठे चुकलो कुठे कमी पडलो आपली रणनीती आखण्यात कुठे चुक झाली हा शोध महत्वाचा असतो.आपल्या चुकांचा शोध घेऊन पहिल्या पेक्षा अधिक वेगाने कार्य करण कधीही उत्तमच असतं.मनाविरुद्ध घडण म्हणजे आपण अपयश समजतो .पण साधारणतः अपयश हे दोन प्रकारचे असते. एक सार्वजनिक क्षेत्रातील अपयश त्या मध्ये सामाजिक , उद्योग, व्यवसाय, राजकारण, समाजकारण, इत्यादी क्षेत्रांचा समावेश असतो .तर दुसरा प्रकार म्हणजे व्यक्तिगत अपयश हे म्हणजे कौटुंबिक ,नाते संबंध , शैक्षणिक, नौकरी, अशा पद्धतीने जीवनात साधारणपणे आपल्याला दोन प्रकारच्या यश अपयशाला सामोरे जावे लागत असत. उपरोक्त नमुद प्रकारातील वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने प्रत्येक जण यशा साठी प्रयत्न करत असतो. आणि त्यासाठी मार्गस्थ होऊन प्रगतीच सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करत असताना याच दरम्यान कधी कधी पुढे जाण्याऐवजी थांबावं लागतं. किंवा दोन पावलं मागे यावं लागतं .यालाच आपण अपयश म्हणतो संबोधतो . थांबण म्हणजे संपण नव्हे . अपयशाच्या संदर्भात प्रत्येकाचं वेगळं मत असु शकत .वेगळं निरीक्षण असणं यामध्ये काही गैर नाही. जीवनातील कुठलंही अपयश हे अंतिम नसतं .अपयश आल म्हणून खचणे निराश होणे, खिन्न होणे, तणाव घेणं हा पुरूषार्थ नाही .यश अपयश हे जीवनातील अविभाज्य घटक आहेत. आपल्याला निरंतर किंवा सतत यश मिळेल. असं कधी होत नाही . आणि सतत अपयश येईल असही होत नाही .यश अपयशाचा लपंडाव म्हणजे जीवन .आणि हा लपंडाव ज्याला निःसंदिग्ध पणे खेळता येईल. तो जीवनाच्या पटलावरील आति उत्कृष्ट खेळाडू आहे. असं समजायला काहीच हरकत नाही. यश मिळाल्या नंतर हुराळुन जाता कामा नये. व अपयश आलं म्हणून खचुन जाता कामा नये.यश मिळवत असताना यदाकदाचित अपयश आलं तर त्या अपयशाचे खापर हे कोणावरही न फोडता. आत्म चिंतन करून आपण कुठे कमी पडलो याचा शोध घेतला पाहिजे .आणि आपले प्रयत्न अधिक गतीने वाढवले पाहिजेत पण शक्यतो आपण तसं न करता अपयशाची वास्तविक नसलेली वेगवेगळी कारणं शोधुन काढतो व आपली सहीसलामत सुटका करून घेण्याचा प्रयत्न करून आपलं व आपल्या हिंतचिंतकांच खोटं समाधान करतो . बहुतांश लोकांच्या संदर्भात अपयशाची कारणमिमांसा एवढाची आहे कि आपल्या अपयशाचे खापर हे .खरंया अर्थाने कोणाच्या तरी माथी मारून मोकळं होणं . पण असं करणं खरंच उचित ठरेल का ? तर नक्कीच नाही .आणि म्हणूनच अपयशाच योग्य असं चिंतन मंथन करून वास्तविक कारणमिमांसा शोधून पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करणं म्हणजे उत्तम व्यक्तिमत्त्वाच लक्षण आहे . म्हणून अपयश हे व्यक्तिगत असो किंवा सार्वजनिक क्षेत्रातील असो आपण जेव्हा अपयशाला सामोरे जातो तेव्हा मात्र बहुतांश लोक हे त्याच आत्मपरीक्षण करून स्वतः मध्ये सुधारणा करण्याऐवजी अपयशाचा वारसदार शोधून स्वतः नमनिराळे राहण्याचा प्रयत्न करून स्वतःच नुकसान करून घेतात सध्या असंच सकृतदर्श चित्र सगळ्याच क्षेत्रात पाहायला मिळत आहे.पण असं करत असताना यामध्ये इतरांच कहीच जात नाही.किंवा इतरांच कहिही नुकसान होत नाही.उलट आपणच आपल्या स्वतःचे खूप मोठं नुकसान करून घेतो असतो. मुळात अपयश हि काही फार मोठी गोष्ट नाही. तर ती यशाची पहिली पायरी आहे . पहिली पायरी चढल्याशिवया शेवटीची पायरी येणार नाहीच .मग पहिली पायरी चढताना एवढं काय घाबरायचे .आणि कधी कधी अस पण होत कि अनेक लोक थेट पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतात. म्हणजेच अपयशाची त्यांची भेट होत नाही. मात्र बहुतांश लोक हे पहिल्या प्रयत्नात यशस्वी होत नाहीत. तर काही लोकांना अपयशाच्या अनेक पायर्या ओलांडून यशाला गवसणी घालावी लागते. कधी कधी जीवनात दोन पाऊल पुढे जाताना दोन पावलं मागे पण याव लागत हे नैसर्गिक आहे. याला कोणीही अपवाद नसतं .परंतु अपयश जेव्हा पदरी पडत तेव्हा आपण आपलं ज्ञान विवेक आणि संयम हरपतो .आणि भावनिक होऊन नकारात्मक दृष्टिकोन अंगिकरतो . नकारात्मक दृष्टिकोन हा प्रामुख्याने ज्ञानावर अघात करतो. आणि मग आपण मुख्य जो मुद्दा आहे कि अपयशाचे आत्मपरीक्षण करून अधिक जोमाने शक्तिने कार्य , मेहनत करून यश खेचून आणण्यासाठी प्रयत्न करण तोच विसरतो .जे क्रमप्राप्त असत ते आपण करत नाही.उलटं पक्षी आपण अपयशाला विविध कारणांशी जोडुन खेळत बसतो.आणि टाईमपास करतो. प्रचंड वेळ वाया घालवतो . आणि हि वाया घातलेली वेळ आपल्यला खुप मागे घेऊन जाते.आणि कधी कधी तर इतकं मागे घेऊन जाते कि पुन्हा आपण प्रयत्न करणच सोडुन देतो . म्हणजे तिथे हा अध्याय संपुष्टात येतो . आणि आयुष्य भर आपण हिच कथा वाचतो .कि या कारणांमुळे आपण यशस्वी होऊ शकलो नाही. असंच काहीसं भासवून स्वतः ला मात्र या मधुन आपण सहिसलामत बाजूला काढतो .याचाच खरं अर्थ काय तर आपण आपली तात्पुरती सुटका करून घेतोय. किंवा आपली खोटी खोटी समज काढतोय असाच आहे. यापालिकडे याची काहीच फलनिष्पत्ती होणारा अर्थ निघत नाही .हे असं करणं कितपत योग्य आहे ?तर हे अजिबात योग्य नाही संयुक्तिक नाही . वास्तविक अपयशातून यशाची फलनिष्पत्ती करायची असेल तर त्याचं चिंतन करून आपण कुठं आणि कसं कमी पडलो .याचा योग्य शोध घेऊन पुन्हा नव्या उमेदीने ताकादीने यशाल गवसणी घालण्याचा प्रयत्न करणं .आणि अगोदरच्या वेळी आपल्या कडून ज्या काही चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती होणार नाही. याची दक्षता घेणं खुप महत्वपूर्ण आहे. आणि अंखडीतपणे सचोटीने पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा येवढी प्रचंड असली पाहिजे.कि यश आपल्या समोर येऊन नतमस्तक झाले पाहिजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत , साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad