Bluepad | Bluepad
Bluepad
मिळविण्याचा आनंद उपभोगण्यात टिकत नाही
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*मिळविण्याचा आनंद उपभोगण्यात टिकत नाही*
जागृत अवस्था आणि बेहोश अवस्था या जीवनातील महत्वपूर्ण अवस्था असुन जागृत अवस्थेत आपण जे काही कार्य करतो स्वाभाविकच त्याचा आनंद चिरकाल टिकतो . आणि बेहोशी मध्ये जे कार्य करतो त्याचा आनंद प्राप्ती नंतर शिल्लक उरत नाही हे भायनक वास्तव असुन सत्य आहे. गोडी अथवा आवड हि भावनिक असेल तर ती फार काळ टिकत नाही. मिळविण्याचा उदेश काय आहे त्यानुसार त्याच आयुष्य आणि भविष्य ठरत असतं .प्रत्येक बाबीचा विषयाचा त्याच बरोबर सुख दुःखाचा संबंध अथवा मुळ हे शेवटी ज्ञान पर्यंत पोहचत असत.आपण आपल्या जीवनात काही मिळविताना जर दुरदृष्टी आणि प्रगल्भता ठेवून त्याविषयी पुर्ण रूपरेषा आणि गुह्य ज्ञाना जाणुन घेतल तर त्या बाबतीत सगळ्या संकल्पना आपल्याला स्पष्ट असतील आणि जर मग संकल्पना स्पष्ट असतील तर मिळविताना जो आनंद आहे तो मिळाल्या नंतरच्या काळात देखिल कायम टिकून राहिल अन्यथा तो क्षणिक ठरेल.आनंद हा साधारणतः दोन प्रकारचा असतो एक शाश्वत जो चिराकाल टिकतो आणि दुसरा भौतिक म्हणजे क्षणिक तो असतो . क्षणिक आनंदाचं उगमस्थान पण क्षणिकच असल्याने या आनंदाचा प्रभाव फार काळ टिकून राहत नाही .अथवा तो आपल्याला टिकवता येत नाही. मिळविण्याचा आनंद हा उपभोगण्यात द्विगुणित झालाच पाहिजे.पण द्विगुणित तर सोडा मिळविताना जो आनंद असतो तोच उपभोगताना राहत नाही हे वास्तव सत्य याला कोणी नाकारू शकत नाही.जीवनातील बहुतांश घटना घडामोडी अथवा बाबी ह्या मिळवताना आपली भूमिका हि भावनिक असते.भावनिक मृगजळ हे मृगजळच असतं .जाग येईल तेव्हा वास्तव फार वेगळं असतं. म्हणून मिळवताना जो आनंद वाटतो तो भास असतो .हा भास फार काळ टिकत नाही म्हणून नंतर तो आनंद ओसरतो अथवा त्याचा शेवट दुःखात पुनर्वसन होऊन होतो .ज्ञान आधारस्तंभ असेल तर आणि तरच जीवनात एकसमान स्थिती अस्तित्वात असते .अन्यथा जीवन हे अस्थिरच असत.मुळात आपण केलेली एखादी कृती हि ज्ञान सदृश्य आहे कि अज्ञान सदृश्य आहे हे त्याचे परिणाम काय उमटतात त्यानुरूप ठरते . निर्माण झालेल्या परिणावर स्थिती अवलंबून असते.परिणामाची स्थिती एकसमान शेवट पर्यंत राहिली तर ती कृती आपण ज्ञान अवस्थेत संपूर्ण ज्ञान आधारित केलेली असते .जीवन हे बहुतांश वेळा भावनिक वादळात सापडलेल्या नावे सारखं झोंकाडया घेत असत.जीवनातील बहुतांश बाबी ह्या आपण ज्ञान पुर्ण नाही तर भावनांच्या लाटेवर स्वार होऊन करतो म्हणून आपण काही मिळविण्याचा आनंद उपभोगण्यात आपल्याला टिकवता येत नाही.मानवी मन आणि स्वभाव चंचल असल्याने जीवनात अनेक वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळ्या टप्प्यावर घडत असतात आपल्याला कधी काय आवडेल आणि कधी त्या विषयी उद्विग्नता निर्माण होईल याचा अंदाज आपल्याला स्वतःला देखिल नसतो.आनंद असा मिळवा जो चिरकाल टिकला पाहिजे.क्षणिक आनंद हा क्षणिक असतो .ज्ञान सदृश्य आनंद हा शाश्वत असतो . मिळवताना ज्ञान स्थिती नसते अथवा योग्य ज्ञानावरून आपण मिळवत नाही म्हणून मिळताना असणारा आनंद उपभोगताना येत नाही. म्हणून ज्ञान‌ स्थिती वरून मिळवा उपभोताना नक्कीच दुप्पट आनंद निर्माण होईल.जीवन एक गाथा आहे समजलं तर खुप छान आणि नाही समजलं तर मग मात्र सगळंच कठिण आहे.आपण जीवनात कशासाठी काय अपेक्षा इच्छा बाळगतो अथवा बाळगून असतो याचा आपल्याच अंदाज नसतो . इतरांनी मिळवलं म्हणून आपण मिळविण्यासाठी धावतो अथवा काही तरी जाणवलं अथवा इतर काही कारणांमुळे आपण एखाद्यी बाब मिळविण्यासाठी जेव्हा आटोकाट प्रयत्न करतो तेव्हा आपण हे मुळात कशासाठी करतोय हे गुह्य ज्ञान समजलं तर काहिच अडचण उरतं नाही पण कोणत्याही प्रकारच गुह्य ज्ञान महित नसताना वरकरणी मिळावलेली बाब फार काळ आनंद देत नाही.आनंद काय दुःख काय याची मुख्य संकल्पना कळली तर मग दुःख शिल्लक उरत नाही दुःख हे मृगजळ असतं जे आपण स्वतः आपल्या जीवनातील काही विकृतीला खतपाणी घालण्यासाठी निर्माण करतो.आणि मग त्या मधुन शाश्वत असा आनंद कसा निर्माण होईल.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad