स्वतः मधील दोष शोधता आल्याशिवाय महात्मा होण्याचा मार्ग आरंभ होत नाही
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023
Share
*स्वतः मधील दोष शोधता आल्याशिवाय महात्मा होण्याचा मार्ग आरंभ होत नाही*
स्वतःमध्ये असणारे दोष शोधता आल्याशिवाय महात्मा होण्याचा मार्ग आरंभ होत नाही पण आपण मात्र संबंध आयुष्य इतरांचे दोष शोधत बसतो .सत्य हे रुचकर नसल्याने ते सहजासहजी कोणाच्याही पचणी पडत नाही.पण सत्य हे अंतिमतः प्रभावी आणि उपयोगी असतं . सत्य स्वीकारण्यासाठी धैर्य सामर्थ्य आणि ज्ञान लागत असल्या कारणाने सत्य हे कोणालाही पेलन एवढं सहज सोपं नाही. म्हणून सत्य जो जाणतो तो अगोदर स्वतः मध्ये बदल घडविण्यासाठी अथवा स्वतःला योग्य पद्धतीने सिद्ध करण्यासाठी स्वतःवर काम करत असतो .आपल्या स्वतः मध्ये असणारा दोष शोधता आला पाहिजे हेच आपल्यासाठी उपयोगी आणि आवश्यक असतं पण आपण आपली सगळी ऊर्जा इतरांचे दोष शोधण्यात घालवतो . स्वतःचा दोष समजण्यासाठी आणि त्या मध्ये दुरूस्ती करून योग्य मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे वास्तविक जीवन.पण दुर्दैवाने जीवन आपल्याला उमजत नाही म्हणून असं होतं नाही . स्वतः मधील दोष शोधुन स्वतःला घडविण्या ऐवजी आपण संबंध आयुष्य फक्त इतरांच्या मध्ये असणारे दोष शोधण्यासाठी घालवतो.हि मानवी जीवनातील खुप मोठी शोकांतिका आहे .ज्यामुळे आपला सार्थक वेळ व्यर्थ वाया जाते आणि आपल्या पदरी शेवटी निराशाच पडते .जग हे विराट आहे आणि विराटत्वा समोर आपलं अस्तित्व हे नगण्य असत .पण आपल्या मध्ये असणारा पराकोटीचा अंहकार हे वास्तव सत्य मान्य करू देत नाही. हा वेगळा विषय आहे.पण खरया अर्थाने जीवन समजलं तर आपण आपल्या मध्ये छोटे छोटे काय दोष आहेत ते सहज समजून घेऊन स्वतःला दोष मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार हे निश्चित आहे पण हेच मुख्य गुह्य ज्ञान समजलं नाही तर आपण आपल्या आजूबाजूला भोवतालच्या परिसरात, असणारे वेगवेगळे घटक, अथवा इतरत्र म्हणून ज्यांचा ज्यांचा उल्लेख अथवा समावेश आहे त्यांच्याशी आपले कसेही संबंध असले तरीही आपण फक्त त्यांच्या मध्ये काय दोष आहे. हे शोधण्यात धन्यता मानतो हा मानवी स्वभाव व वृत्तीचा भाग आहे .म्हणजे खरया अर्थाने आपण कसे आहोत याचा विचार आपण कधीतरी करतो का कारण आपल्याला महान होण्याची कधी इच्छा निर्माण होत नाही का ?महान तेव्हा होता येत जेव्हा आपण स्वतः मधील दोष शोधत शोधत स्वतःला दोष मुक्त करण्या मध्ये शंभर टक्के यश प्राप्त करतो. पण आपल्या दृष्टीने इतरांचे दोष शोधण म्हणजे महानता आहे आणि हाच गैरसमज आपल्याला सत्या पासुन दुर ठेवून आपलं पराकोटीच नुकसान करतो . आपण कधी या कडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहत नाही आपला फोकस फक्त इतरांच्या संदर्भात दोष शोधत कसे येतील आणि ते शोधत बसण एवढाचा आपला जीवन उद्देश अथवा दिनचर्या याचा भाग आहे म्हणून आपण याकडे पाहतो .पण हे आपल्यासाठी हितकारक अजिबात नाही.आपला जन्म हा इतरांचे नाही तर स्वतः मधील दोष शोधुन ते नष्ट करत स्वतःला दोष मुक्त करण्यासाठी झालेला आहे पण याचा चक्क विसर पडल्याने आपण संबंध जीवन व्यर्थ घालवतो .अणि शेवटच्या क्षणापर्यंत देखिल आपल्याला या वास्तव सत्याचा बोध होत नाही अथवा सत्य उमजत नाही सत्य न समजल्यामुळे आपण आपल्या जीवनातील मुख्य बोधा पासुन व वास्तविक शाश्वत हितापासुन वंचित राहतो . मानवी जीवनात ज्ञान हेच सर्वोत्तम आणि सर्व श्रेष्ठ आहे. ज्यामुळे आपण आपल्या योग्य पथ मार्गाला शोधु शकतो .पण हेच आध्यत्मिक ज्ञान अर्जित करण्यासाठी सत्याचा, न्यायाचा, संस्कारांचा, निर्मोही मार्ग स्वीकारवा लागतो .पण हा मार्ग खडतर असल्याने या मार्गावर वर्दळ थोडी कमीच असते .आणि इकडे फार कोणीही फिरकण्यास उत्सुक देखील नसत.पण कोणत्याही क्षेत्रात आणि परिस्थिती मध्ये सत्य हेच उपयोगी लाभदायक ठरत . स्वतः मध्ये असणारा दोष शोधता येण अथवा तो शोधून दुरूस्त करण्यासाठी कार्य करण हे खुप महत्वाच आहे. आयुष्यात हे महान कार्य ज्याला जमलं तो महात्मा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनात आपण इतरांचे नाही तर स्वतः मधील दोष शोधुन काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि शेवटच्या क्षणापर्यंत हिच भावना मनात ठेवून त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे.खरया अर्थाने मानवी जीवनाची सार्थकता हिच आहे शेवटच्या क्षणापर्यंत श्वासा पर्यंत स्वतःला सत्यनिष्ठ ठेवत आपल्या मध्ये कोणाताही अवगुण अथवा दोष शिल्लक राहणार नाही.आणि त्यासाठी अध्यात्मिक ज्ञान मार्ग हा उत्तम आणि खात्रीशीर मार्ग आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301
0
Share
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य