योग्य वेळी उचित ज्ञान पचणी पडत नाही हिच खरी समस्या असते
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023
Share
*योग्य वेळी उचित ज्ञान पचणी पडत नाही हिच खरी समस्या असते*
ज्या वयात जे आवश्यक आहे गरजेचं आहे आणि आपल्या हितार्थ आहे हे समजलं पचणी पडलं तर जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या उरत नाही पण योग्य वेळी योग्य समज आणि उंची नसल्या कारणाने त्या वेळी ते पचणी पडत नाही हिच जीवनातील खरी समस्या आहे.हि समस्या ज्याला सोडवता आली त्याच आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहत नाही.आपल जीवन कल्याण होण्यासाठी हि स्थिती आपल्याला प्राप्त करता आली पाहिजे . आणि हि स्थिती प्राप्त होण्यासाठी आध्यत्मिक ज्ञानाचा मार्ग उत्तम मार्ग आहे.वय ज्ञान समज व उमज यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध असतोच . योग्य वेळी योग्य ज्ञान शक्यतो उमजत नाही म्हणून जीवन प्रभावित होत .आपल्या विचारांवर मतांवर वेळेचा आणि वयाचा खूप मोठा प्रभाव असतो .म्हणजे आपलं मत विचार हे वयानुसार ठरत असतात जीवनात वेळेचं आणि आपण घेतलेल्या निर्णयाचा खुप घनिष्ठ संबंध असतो घेतलेला निर्णय योग्य आहे कि अयोग्य हे वेळ निश्चित करत असते .वेळ अयोग्य असेल तर तो अपेक्षित परिणाम देत नाही .म्हणून वेळेचा आणि निर्णयाचा योग्य संगम सधता आला पाहिजे.यासाठी महत्वाचं आहे ते आपलं ज्ञान योग्य वेळी असणारी योग्य समज आणि म्हणून हाच जीवनाचा परिपाक आहे.योग्या वेळी योग्य निर्णय घेण्याची समज उमज आणि क्षमता निर्माण करणं गरजेचं आहे. आणि अयोग्य वेळी अयोग्य निर्णय घेण्यापेक्षा अचुक वेळेची वाट पाहण कधीही उत्तम असतं. म्हणून जीवनातील एकंदरीत गणित हे वेळेवर आणि त्यावेळी असणारी जी आपली समज यावर अवलंबून असतं.विचारांचा प्रभाव हा वेळ आणि वयानुसार होत असतो .आज जे विचार अयोग्य वाटतात ते कदाचित उद्या योग्य वाटत असतात. आणि आज जे विचार योग्य वाटतात ते उद्या अयोग्य वाटतात.महणजे हा विचारांवर असणारा वेळेचा प्रभाव आहे . एकंदरीत विचार तेच असतात पण ते वेळ आणि वयानुसार विचारांची योग्यता निश्चित करत असतात .योग्य वेळी योग्य वयात योग्य विचार समजले पाहिजे. आणि ते समजुन आत्मसात करता आले पाहिजे .आणि हे करता येण म्हणजेच विचारांवर असणारा वेळेचा काळाचा प्रभाव ओळखता येणं आणि त्याला आपल्या ज्ञानानुसार वळण देण हे जमलं पाहिजे . तसंच आपण परिपक्व आहेत कि अपरिपक्व आहेत हे आपल्या विचारांवर अंवलबुन असतं. आपले विचार हे वेळ काळ आणि वय यावर अवलंबून असतात . आपलं वय आणि समोर येणारे किंवा असणारे विचार किंवा त्या वयासाठी आवश्यक तत्वज्ञान हे त्या वेळी आपल्याला रूचेलच असं नाही.आणि जरी रुचल तरी ते पचेल अशी शंकाच असते . कारण रूचण अणि पचन हे वेळ आणि वयोमानावर अवलंबून असतं तरी सुद्धा रूचल व पचल तर मग अगदी उत्तम म्हणजे अगदी जीवन सार्थकी लागल्यासारखं . पण शक्यतो असं होतं नाही. म्हणून ते पचत नाही . म्हणजे बाल वयात असताना आपल्या जे विचार रूचत नाहीत. ते तरूण वयात अगदी बरोबर आहेत .व खुप योग्य आहेत. असंच आपलं मत असतं आणि तसं आपल्यला जाणवतं दिसत वाटत हे अनुभव सत्य आहे .परंतु तेव्हा ती योग्य वेळ निघून गेलेली असते. आणि मग ते योग्य वाटुनही काही उपयोगाच नसतं. तसंच तरूण वयात जे विचार अयोग्य वाटतात तेच विचार नेमके म्हातारपणी किंवा उतार वयात योग्य वाटत. पण त्या वयात ते योग्य वाटुन काही अर्थ नाही . म्हणून ज्या वयात जे ज्ञान उपयोगी आणि आवश्यक आहे. हे योग्य वेळी ज्याला लक्षात येईल .आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून घेता येईल. त्याला वेळेचा आणि ज्ञानाचा योग्य फायदा होईल .आपलं वय अनुभव काळ आणि वेळ हेच खरे विचारांचे पोषक असतात आपल एखाद्या विषयावर जे मत आहे. ते योग्य आहे कि योग्य आहे हे वेळेनुसार ठरत . योग्य वेळी योग्य समज येण महत भाग्य बालपणी असणारे विचार तरूण पणी निरर्थक वाटतात तर तरूण पणी आपण ज्या विचारांचा पाठलाग करतो ते विचार म्हातारपणी निरर्थक वाटतात मग असं का होतं .पण हे ज्या त्या वेळेमध्ये लक्षात येत नाही .यालाच जीवन म्हणता वेळेची आणि विचारांची समज अपवादानेच एखाद्याला येते . आणि वेळेची व विचारांची योग्य वेळी समज येण्या मध्ये आध्यत्मिक ज्ञान मार्ग वरून चाललं तर नक्कीच उपयोग होऊ शकतो. म्हणून वेळेचं महत्त्व जाणून घेऊन आपल्याला त्याचा आपल्या जीवनासाठी योग्य उपयोग योग्य वेळी करून घेता आला पाहिजे यासाठी आध्यत्मिक ज्ञान संपन्नता हाच एकमेव प्रभावी आधार मार्ग आणि उपाय आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य*
9011634301
0
Share
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य