Bluepad | Bluepad
Bluepad
सांस्कृतीक अतिक्रमणाचा वाढता प्रभाव कुटुंब संस्था व नाते संबंध धोक्यत
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*सांस्कृतीक अतिक्रमणाचा वाढता प्रभाव कुटुंब संस्था व नाते संबंध धोक्यत*
सांस्कृतीक अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि हे अतिक्रमण रोखण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय.तंत्रज्ञान युगातील प्रगती अगदी कौतुकास्पद आहे.गृह तारे यांचा शोध घेणारा मानव खरया अर्थाने माणुसकीचा वेध घेण्यात मात्र स्पेशल अपयशी ठरतो आहे. सध्याच युग हे विज्ञान तंत्रज्ञान युग म्हणून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे .हि कौतुकास्पद अभिनंदनीय बाब आहे . अगदी प्रत्येकाला कौतुक वाटेल या वेगाने आपली प्रगती होत असताना या प्रगतीला गालबोट पण खूप वेगाने लागताना दिसत आहे .दिवसेंदिवस नात्यांतील विभक्ती करणं झपाट्याने वाढत आहे हे अगदी सत्य असुन सामाजिक दृष्ट्या हि अधोगती आहे.अस म्हटलं तरी अयोग्य होणार नाही.प्रत्येक व्यक्ती किंवा जीव हा स्वतंत्र अस्तित्व म्हणून जन्माला येत असतो. म्हणून नैसर्गिक दृष्ट्या कोणीही कोणावर जबरदस्ती अथावा अन्याय करू शकत नाही .जीवन जगण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे.परंतु हे जीवन जगत असताना नैसर्गिक धर्म पालन झाले पाहिजे. नैसर्गिक धर्मात कुटुंब हि संकल्पना समाविष्ट होते .कुटुंब या संज्ञेला शक्य तेवढा तडा न जाऊ देता प्रत्येकाने आपल्या स्वतंत्रयाचा योग्य वापर करून जीवन व्यतित केले पाहिजे . जेणेकरून आपल्याकडून इतरांना त्रास होणार नाही. तसेच आपल्या अधिकारावर अतिक्रमण हि होणार नाही याची परिपुर्ण दक्षाता घेतली गेली तर नात्यांतील विभक्ती करणं न होता प्रत्येकाला आप आपल्या विवेकानुसार जीवन जगण्यात अडचण निर्माण होणार नाही .व कुटुंब हि संकल्पना मजबुत होईल.कुटुंब हि संकल्पना तशी विस्तृत असते .अगदी पंचवीस तीस वर्षे अगोदरच पाहिलं तर कुटुंब म्हणजे चुलते चुलती आजी आजोबा सख्खे भाऊ चुलत भाऊ असा विस्तृत दांडगा समुदाय म्हणजे कुटुंब असायचं .तरी देखील खुप आपुलकी प्रेम जिव्हाळा असायचा तो वरकरणी नाही. अंतःकरणातुन असायचा आणि तो अगदी कृतीतून दिसायचा. पण सध्या कुटुंब म्हणजे फक्त पती पत्नी आणि मुलं इथपर्यंत आलंय अलिकडच्या काळात तर आई वडील पण या संकल्पनेतून बाहेर पडले. फक्त पती पत्नी म्हणजे कुटुंब झालं. आणि खरी गंमत इथंच आहे .पती पत्नी एवढं लहान कुटुंब होऊन सुद्धा यांच्या मध्ये वारंवार वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने मतभेद निर्माण होत आहेत. आणि याचा शेवट विभक्ती करणात होत आहे .मग नेमकं हे सगळं काय चाललंय. आणि हे कुठपर्यंत जाऊन थांबणार आहे .आणि मग सगळ्याला नेमकं जबाबदार कोण आहे. सध्याच्या युगातील होणा-या घडामोडी वर चिंतन मंथन करण क्रमप्राप्त आहे.सगळयात विचित्र बाब तर हि आहे कि ती म्हणजे पती, पत्नी आई-वडील यांच्या पासुन मुलं तसेच अनेक जीवाला जीव देणारे मित्र हे सगळे कसे क्षणार्धात विभक्त होत आहेत. हे सध्या च्या युगातील सगळ्यात विदारक चित्र आहे. याला कारणीभूत नेमकं कोण आहे. याचे समजिक परिणाम आणि त्यावरील उपाययोजना भविष्यातील समाज व्यवस्था टिकण्यासाठी आवश्यक आहेत. मोह,माय,लोभ वृत्ती या अवगुणांचा वाढता प्रभाव तसेच , भौतिक संसाधन यांचं वाढत महत्व दिवसेंदिवस ढळत चालेली नितिमता ,संयमाचा अभाव ,अफाट वेगाने ,वाढत असलेला अंहकार आणि दुर्बल होत चाललेले धर्म संस्कार दुरदृष्टी चा अभाव या सगळ्या बाबी मुळ कोणाचेही महत्व कोणाच्या लेखी राहिलेल नाही. मी स्वतः योग्य आहे बरोबर आहे. आणि मला खूप ज्ञान आहे मी एकटाच खुप हुशार चाणक्ष आहे .या आविर्भावात होत असलेल आचरण आणि छोट्या छोट्या गोष्टी मुळे होणारे मनभेद त्यातुनच उचल जाणार टोकच पाऊल . आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान होण्यासाठी किंवा दोन पावलं मागे येण्यासाठी कोणीही तयार नाही .मग मार्ग कसा निघणार . आणि मग शेवटी त्याची परिणिती हि विभक्त करणात होणारच . हे वास्तविक सत्य आहे. निसर्गाने दिलेल जीवन शांततामय मार्गाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे .समाज व्यवस्था बंधनं ह्या बाबी पेक्षा नैसर्गिक न्याय हा खुप महत्वाचा आहे.ज्ञान वृध्दींगत होऊन प्रत्येक व्यक्तीला संयमित होण्याची आवश्यकता आहे . स्वतः हुन कोणीही कोणाच्याही नैसर्गिक अधिकारांवर गददा आणता कामा नये.आणि नैसर्गिक न्याय स्वातंत्र्य वापरताना सद्सद विवेक बुद्धी जागृत असली पाहिजे .जेणेकरून आपलं स्वातंत्र्य हे इतरांना त्रासदायक होणार नाही . प्रत्येकाने आपल्या आचरणात खुप लवचिकता हि दैनंदिनी जीवनात कृतीतून दाखवली पाहिजे. स्वार्थचा लवलेशही नसला पाहिजे. कुठल्याही नातेसंबंधां मध्ये स्वार्थाने प्रवेश केला .कि नातं संपुष्टात आलं म्हणून समजा . म्हणून नातेसंबंध कोणतेही असु द्या त्यामध्ये प्रचंड विश्वास ,असला पाहिजे. परोपकार, निष्ठा , प्रमाणिकता जोपासली पाहिजे , समजुतदार वृत्ती,संयम , आवश्यक आहे आणि , अहंकार , तुलनात्मक अभ्यास, करण्याची वृत्ती,नसली पाहिजे. आपल्या सहकाऱ्याचा एखाद्या निर्णय आपल्यला आवडला नाही योग्य वाटला किंवा तो आपल्या मनाविरुद्ध आहे किंवा आपल्यावर अन्यायकारक आहे असं आपल्याला वाटत असेल तर मग अशा वेळी आपण आपल्या ज्ञानावरून लोकशाही पद्धतीने आपलं मत त्या व्यक्तीला सांगु शकतो. त्यासाठी टोकाचा निर्णय भुमिका घेण्याची आवश्यकता अजिबात नाही .कारण जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने अनेक असे नातेसंबंध निर्माण होत असतात .मग यापैकी किती नातेसंबंध शेवटच्या श्वासापर्यंत टिकतात तर अगदी नगण्य कारण कुठलेही नातेसंबंध हे ज्ञानावर आधारित असले पाहिजे .आणि नातेसंबंध हे जर ज्ञानावर आधारित असतील तर मतभेद होतील. परंतु कटुता निर्माण होऊन मनभेद निर्माण होणार नाहीत .आणि विभक्ती करणही होणार नाही . म्हणूनच नातेसंबंधात भावनिकतेपेक्षा ज्ञानला खुप महत्व आहे.ज्ञान हे नातेसंबंध टिकण्याचा आधारस्तंभ आहे. म्हणून ज्ञानावर आधारित कोणतेही नातेसंबंध कधीच खंडीत होऊ शकत नाही. समाज व्यवस्था टिकण्यासाठी नात्यांचे विभक्ती करणं कमी झालं पाहिजे .हि आजच्या समाजाची खरी गरज आहे.
*गणेश खाडे*
विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य*
90116343001सा

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad