Bluepad | Bluepad
Bluepad
कर्म हेच आयुष्यात न बदलणार दंड विधान असत
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*कर्म हेच आयुष्यातील न बदलणार दंड विधान असत* ‌‌ ‌ आपण जे पेरतो तेच उगवत असत. कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा जे पेरल त्याव्यतिरिक्त दुसरं उगवत नाही तसंच जीवनाचं देखिल असतं .आपण जसं कर्म केल तसंच फळ आपल्याला अनुभवायला येते .उचित कर्म सार्थक जीवन अनुचित कर्म पश्चात्ताप युक्त जीवन कारण जसं कर्म तसं जीवन असल्याने आपल्या कर्माला निसर्ग साक्षीदार असला पाहिजे.बळ शक्ति ताकद आहे म्हणून अनितीने केलेल्या कर्माचे फळ योग्य वेळी टाळता येत नाही. म्हणून असं कर्म करा कि कर्म फळ स्वीकारताना पश्चात्ताप होणार नाही. दैनंदिन जीवनात आपण क्षणोक्षणी जे कार्य अथवा क्रिया करतो ते कार्य, क्रिया म्हणजे कर्म आणि दैनंदिन जीवनातील कर्म करताना जो भाव आपल्या मनात असतो. त्यानुसार त्या कर्माच फळ आपल्याला चांगल्या अथवा वाईट स्वरूपात निश्चित प्राप्त होत असत.आपली इच्छा असो वा नसो कर्म फळ सोडत नाही.ते गृहण करावच लागतं.कारण कर्म फळांपासून कोणीही अपवाद नाही.शरिर हे नश्वर असुन आत्मा अमर आहे. पण आपण जोपर्यंत शरिर रुपाने अस्तित्वात आहेत तोपर्यंत आपल्यासाठी कर्म हेच महत्वपूर्ण आहे म्हणून कर्म समजलं पाहिजे .कारण कर्माचे फळ भोगुनच या जगाचा निरोप मिळतो म्हणून आपलं प्रत्येक कर्म पारदर्शक स्वच्छ सत्यनिष्ठ धर्मनिष्ठ सात्विक आणि न्याय निती सुसंगत असलं पाहिजे.निसर्गाने खुप काही आपल्या अखत्यारीत दिलं असलं तरी सुद्धा कर्माच दंड विधान आपल्या अखत्यारीत दिलेलं नाही पण चांगलं कर्म करून आपण स्वतःचा बचाव मात्र नक्कीच करू शकतो.हे मात्र आपल्याला हातात नक्कीच आहे.कर्माला नितीचा आधार असेल तर हित होण निश्चित आहे पण कर्माला नितिचा आधार नसेल अथवा अनितीच कर्म असेल तर एक दिवस त्याचा दंड निश्चित आहे.चांगल वाईट कर्म कोणालाही चुकल नाही चुकणार नाही. म्हणून कर्माच दंड विधान समजलं तर जीवन समजलं. सुखी समाधानी आनंदी जीवनाचे शिल्पकार आपण स्वतः असतो आपलं कर्म आपल्या जीवनातील सुख दुःख निश्चित करत असत .आपण आपलं दैनंदिन जीवनात निहित कर्म करताना कर्म सिद्धांत पालन करत निति न्याय सुसंगत आचरण केले तर निश्चितच जीवन हित घडेल.जीवनात येणारे चांगले वाईट दिवस हे आपल्याच संचित कर्माची फळं असतात.आपण हे मान्य करत नाहीत हा विषय वेगळा आहे शेवटी ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत ज्ञानाचा तो विषय आहे पण कर्म हेच अंतिम दंड विधान आहे.चांगलं कर्म चांगलं फळ वाईट कर्म वाईट फळ पण हा नियम पुर्व लक्षी प्रभावाने नाही तर थोडा दिंरगाईने लागु होतो. म्हणजे कर्म अनितीच असेल तर दंड मिळतो पण आपण केलेल्या कर्माचा विसर पडल्यावर म्हणून आपण कर्म करताना गंभीर नसतो .योग्य वेळी कर्म कोणालाही सोडत नाही हेच कर्माच दंड विधान आहे.आपणच सगळं काही आहोत या आविर्भावात आपण वागत असतो .पण निसर्ग आणि नियती फिरली तर भल्या भल्याची क्षणात माती होते .कोणाची ताकद बळ किती आहे किंवा नाही हे महत्वाचं नसुन कर्म चांगलं कोणाच आहे हेच शेवटी महत्वपूर्ण ठरत .जसं कर्म तसं फळ आपण जसं कर्म केल आहे तसं फळ भविष्यात मिळण निश्चित आहे.पण त्या साठी कर्म समजलं पाहिजे.अहंकार स्वार आहे म्हणून सत्य समजणार नाही पण योग्य वेळी पश्चात करून अर्थ नाही म्हणून विचार पुर्वक कर्म केल पाहिजे. आपलं कर्म चुकलं तर त्याचा फटका निश्चित आहे.कारण कर्माचे दंड विधान कोणालाही बदलता येत नाही ते बदलत नाही.जीवनात मानलं तर सर्व काही असतं आणि नाही मानलं तर मग मात्र काहिच नसतं . शेवटी आपण आस्तिक आहेत नास्तिक या नुसारच आपण आपली विचारसरणी विकसित होत असते .या त्यानुसारच आपण निकष निष्कर्ष लावतो काढतो .पण शेवटी आस्तिक असो कि नास्तिक जसं कर्म केल आहे तसं फळ निश्चित आहे कर्माच फळ कोणालाही बदलता येत नाही.मग संबंधित व्यक्ती हा कितीही बलाढ्य शक्तिशाली शक्तिमान असला तरी सुद्धा कर्माच दंड विधान हे सगळ्यांना सम प्रमाणात लागु आहे त्या मध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही . लहान मोठा छोटा असं काही नाही ज्याचं कर्म उत्कृष्ट त्याला फळ उत्कृष्ट ज्याचं कर्म निकृष्ट त्याला फळ निकृष्ट हे निश्चित आहे या मध्ये बदल होत नाही म्हणून कर्म करताना सदैव सावध जागृत असल पाहिजे जेणेकरून करून आपल्या कडुन कर्म करताना चुक होणार नाही.याची जाणिव ठेवून कर्म केल तर जीवन सार्थकी लागत . आणि वास्तविक पाहिलं तर याच वेगळं असं समाधान असतं पण जीवनात योग्य वेळी योग्य बाबी लक्षात येत नाहीत हेच दुर्दैव आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad