*सद्गुणांचा विकास होण्यासाठी अध्यात्माची कास धरली पाहिजे*
अध्यात्म हे जीवन उत्थानाच प्रभावी माध्यम आहे. हा मार्ग चुकला तर अपघात होऊन जीवन प्रभावित होण निश्चित आहे.पण हा मार्ग अंवलबुन या मार्गावर मार्गक्रमण केल तर आपोआप आपल्या सद्गुणांचा चौफेर विकास होतो .या मार्गावरून आपण यत्किंचितही दुर गेलो नाहीत तर दुर्गुण आपलं काहिच नुकसान करू शकत नाहीत.सद्गुणांचा विकास झाला तर जीवनाचा उत्कर्ष होतो. दुर्गुण,मोह,माया स्वार्थ,हे नेहमीच सदगुणांचे शत्रु असल्याने ते वारंवार आपल्या जीवन मार्गावर मृगजळ निर्माण करतात . ज्या मध्ये आपण अलगद फसतो . आणि शेवटी आपण दुर्गुणांचे शिकार होतो . मुळात आयुष्यभर दुर्गुण मुक्त राहायचं असेल तर एक क्षण सुद्धा आध्यत्मिक ज्ञान मार्ग सोडता कामा नये आध्यत्मिक ज्ञान मार्ग सोडला कि दुर्गुणांच्या डोहात बुडणे निश्चित आहे.जीवन वाटेवर सद्गुणांचा विकास होण्यासाठी अध्यात्म हाच मार्ग आहे.जीवनात सद्गुणांचा विकास झाला पाहिजे हि प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. पण फक्त इच्छा असुन चालत नाही .कधी कोणता दुर्गुण आपल्यावर फासा टाकेल आणि आपण त्या मध्ये फसु हे कोणालाही खात्रीने सांगता येत नाही. मात्र कोणत्याही दुर्गुणांनी टाकलेल्या जाळ्यात आपण अडकु नयेत हि जर मनोमन इच्छा असेल तर अध्यात्मिक ज्ञान मार्गा हाच उत्तम आणि सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.आयुष्यात सद्गुणांचा जलद गतीने विकास होण्यासाठी अध्यात्माची कास धरली पाहिजे. अध्यात्माची कास धरली तर आपल्या मनाने आपल्याला कितीही दुर्गुणांकड आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले तरीही आध्यत्मिक ज्ञाना समोर हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात.आपलं जीवन सद्गुणांनी भरलेलं असावं हि प्रत्येकाची मनोमन इच्छा असते परंतु मानवी मनाला दुर्गुणांच प्रचंड मोठ असं आकर्षण असतं .आपण सद्गुणी राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही मन मात्र दुर्गुणांकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी अतुर , उतावीळ असतं .याचा प्रत्यय जीवनात बहुतांश वेळा सगळ्यांनाच आलेला असतो . आपण दुर्गुणी व्हावं असं मनोमन कोणालाही वाटत नसतं . पण तसं मृगजळ भासत ज्या मध्ये आपण आपसुक अडकतो . यापासून मुक्त होण्यासाठी आपण अध्यात्म मार्गावर असल पाहिजे. जसं मन तसं जीवन असतं . मन प्रदुषण मुक्त राहण्यासाठी आध्यत्म हाच उपाय आहे.मन प्रदूषण मुक्त राहिल कि आपसुकच सद्गुणांचा विकास होतो अथवा सद्गुण वृद्धिंगत होतात. हित आणि अहित ह्या जीवनातील परस्पर विरोधी बाबी भोवती संबंध जीवन फिरत असत.पण आपलं हित आणि अहित हे मुख्यत्वे सद्गुण आणि दुर्गुण यावर अवलंबून असतात . दुर्गुण हे सहज अंगवळणी पडतात त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता भासत नाही. वातावरण, प्रभाव, आजुबाजुचा परिसर ,संगती अनियंत्रित मन ,हे विशेष करून दुर्गुण निर्मिती चे प्रमुख केंद्र आहेत .सद्गुण हे जीवनात हितार्थ असतात पण सद्गुण हे सहजासहजी अंगवळणी पडत नाहीत. त्यासाठी अनंत प्रयत्न आणि स्वतःवर प्रचंड नियंत्रण निर्माण करावं लागतं.जीवनाच हित होण्यासाठी सद्गुण हे खुप महत्वपूर्ण असतात.वाईट गुण दुर्गुण हे शिकण्याची आवश्यकता लागतं नाही.दुर्गुण हे सहज जीवनात प्रवेश करत.सद्गुण आणि दुर्गुण या भोवतीच मानवी जीवन फिरत असतं .आपण आध्यत्मिक ज्ञान मार्गावरून भटकलो कि आपल्या जीवनात दुर्गुण कळत न कळत जीवनात प्रवेश करतात. त्याच रूप आणि आकारमान वृद्धिंगत झाल कि मग आपोआपच त्याचे परिणाम देखील आपल्याला जाणवतात . ज्यामुळे अनेकदा पश्चात्ताप करण्याची देखिल वेळ येते .पण जीवनात सात्विक दृष्टी, न्याय, धर्म,निती, सत्यनिष्ठ आचरण आणि आध्यत्मिक गोडी असेल अथवा दैनंदिन टिकवून ठेवली तर दुर्गुण कितीही प्रयत्न करून सुद्धा आपल्यावर प्रभाव अभाव निर्माण करू शकत नाहीत. म्हणून आध्यत्मिक ज्ञान हाच एकमेव मार्ग प्रभावी उपाय आहे ज्यामुळे जीवनात सद्गुणांचा विकास होऊ शकतो. नश्वर जीवन समजलं तर खुप सोप आहे आणि नाही समजलं तर खुप कठिण एकंदरीत जीवनचक्र हे गुण अवगुण या भोवतीच फिरत असतं . त्यामध्ये हि अवगुण मोफत असतात काही न करता अवगुण लागतात मात्र सद्गुण लागण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करावा लागतो आणि हाच संघर्ष अध्यात्माचा मार्ग स्वीकारला तर यशस्वी होतो .
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301