Bluepad | Bluepad
Bluepad
निषठेच्या बाजारात स्वार्थाचा बोलबाला निष्ठावंत उपाशी तर तोतया तूपाशी
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*निष्ठेच्या बाजारात स्वार्थाचा बोलबाला निष्ठावंत उपाशी तर तोतया तुपाशी*
सगळ्याच क्षेत्रात खरी माणसं दुर आहे पण जि माणसं क्षणिक मळभ निर्माण करुन गवगवा करतात तिचं सगळ्यात जास्त लाभानवित असतात.लाभ संपलं क्षणिक निष्ठा संपली हा नवीन अध्यया म्हणजे तोतया निष्ठावंत निष्ठावान असंच काहीसं सध्या तरी चालेल आहे. स्वार्थ हे कधीच एकत्र नसतात मतलब स्वार्थ ठेवून निर्माण झालेला आदर निष्ठा नाही तर वेळेनुसार तात्पुरत्या स्वरूपात स्वार्थ लाभ मतलब आहे तोपर्यंत अथवा तो साधे पर्यंत फक्त घनिष्ठता दाखविण्याचा प्रयत्न असतो त्याला निष्ठा हे नामकरण केलं जातं पण वास्तविक हा निष्ठा या शब्दाचा अवमान आहे.मुळात निष्ठा हि निस्वार्थ असते .पण सध्या निष्ठेचा व्यापार चरण सिमेवर असुन जितकं मतलब तितकी आणि तोपर्यंतच निष्ठा हा नवीन निष्ठेचा प्रकार अस्तित्वात आला आहे .खरा निष्ठावंत हा नेहमीच उपशी असतो .सृष्टीवर अस्तित्वात असणार्या सर्वच क्षेत्रात आणि वेगवेगळ्या व्यवहारातील संबंधात खरा हा दुर असतो .तर नकली हा नेहमीच जवळीक साधुन लाभ करून घेऊन पुन्हा शत्रू यादीत समाविष्ट होतो .हे सध्याच्या काळातील निष्ठेच्या व्यापारातील वास्तविक फलित आहे ‌.नाव फक्त निषठेच आहे. पण अडुन व्यापार चालु आहे. कोण गृहक? कोण व्यापारी ?हे गुपित उशिराने कळते हेच या व्यापारातील गमक आहे.पण तो पर्यंत खरा निष्ठावान हा अक्षरशः पायदळी तुडवला जातो . परंतु खरा निष्ठावान हा या व्यापाराचा घटक नसल्याने तो सदैव आत्मियतेने निष्ठावान च असतो . सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात आपण किती निष्ठावान आहेत हेच दाखवण्याचा प्रयत्न सगळ्यांचं क्षेत्रात होत आहे .पण या निष्ठे आड स्वार्थ नसेल तर अभिनंदनच आहे. निष्ठे आड जर स्वार्थ असेल तर मग ती निष्ठा कसली तो चक्क व्यापार आहे . हल्ली निष्ठा हि कशी मोजायची हाच खुप मोठा गहण प्रश्न आहे.स्वार्थ किंवा विशिष्ट हेतूने प्रेरित होउन आपल्या सोबत जोडला गेलेला व्यक्ती हा निष्ठावंत या गोंडस नावाखाली आपल्या सोबत असतो.खरा पण तो आत्मियतेने कधीचं आपला नसतो .हि बाब आपल्याला कळत नाही कि कळुन वळत नाही अथवा हा वेळेचा प्रभाव आहे. हे मात्र वेगळं गणित आहे.जस गुळाची ढेप आहे तोपर्यंतच मुंगळे असतात. आणि ढेप संपली कि ते दुसरी ढेप शोधतात.या मध्ये मुंगळयांचा दोष अजिबात नाही. ते ढेपी शिवाय राहु शकत नाहीत .आणि नविन ढेप शोधण्यासाठी निष्ठावंत होण्याशिवाय पर्याय नसतो.महणुनच तर मी खूप निष्ठावान आहे .हे वरकरणी दाखवून द्यावे लागते . म्हणुन च स्वार्थासाठी निष्ठावंत होणारांचा सगळीकडे बोलबाला आहे. असंच चित्र आपण सध्या सर्वत्र पाहतोय. मात्र आपल्या स्व स्वार्थासाठी क्षणिक निष्ठावंत होऊन स्वतःला आणि ज्यांच्या साठी आपण क्षणिक निष्ठावंत होऊ त्यांना देखिल अंधारात ठेवण म्हणजे आपण आपल्या स्वतःलाच कुठेतरी फसवतोय .पण हे कळण्याची समज आणि उमज हि त्या क्षणाल आपल्याकडं नसते. म्हणून आपल्याला आपण आपण केलेल ते कृत्य त्या तात्कालिक क्षणी योग्य आहे. असंच वाटतं असत . परंतु अशा पद्धतीने स्वार्थासाठी निष्ठावंत होण्यापेक्षा दुर्लक्षित एकनिष्ठ असलेल कधींही उत्तम नैसर्गिक न्यायाला धारूण आणि आत्मिक दृष्या योग्य आणि समाधान कारक समाधान देणारं असत . नात्या पासुन गोत्या पर्यन्त, व्यापारा पासुन उदयोगा, पर्यन्त समाजकारण पासुन, राजकारणा पर्यन्त ,कले पासुन क्रिडे पर्यंत जवळपास सगळ्याच क्षेत्रात जो प्रामाणिक आहे.निस्वार्थी निष्ठावंत आहे. तो दुर्लक्षित आहे हे अगदी वास्तव व कटु सत्य असुन जो स्वार्थी आहे तो अगदी तळहातावर आहे. त्याचा सगळीकडेच बोलबाला आहे . हे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक संबंधात नात्या मध्ये स्वार्थी आणि संधी साधु निषठवंताचा बोलबाला झाला आहे . त्यामुळे खरे प्रमाणिक आणि मी निस्वार्थी निष्ठावंत पायदळी तुडवले जातात. मग हे नेमकं दुर्भाग्य कोणाच .ज्याला सत्य असत्य खरा खोटा स्वार्थी निस्वार्थी लक्षात येत नाही त्याच कि ज्याच्या संदर्भात हे सगळं घडलं आहे त्याचं. शेवटी महत्वाचं हेच आहे कि जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या घटना घडामोडी व सार्वजनिक जीवनातील सुद्धा वेगवेगळ्या बाबी या अनुषंगाने कित्येक लोक हे आपल्या जीवनातील सगळ्यात जवळचे आणि प्रमाणिक हित चिंतक आहेत.आपले हितेषी आहेत असं भासवतात पण या पाठिमागे स्वार्थ आहे. कि निस्वार्थी आहे. हे आपल्याला न समजणं म्हणजे आपलं भविष्यात खुप मोठा नुकसान करून घेणं आहे. म्हणून नातं असो किवा सार्वजनिक जीवन किंवा व्यवहार व्यापार समाजकारण, राजकारण कोणत्याही क्षेत्रातील आपला निष्ठावंत समर्थक शोधता येण आवश्यक आहे .आणि त्यासाठी आवश्यक अशी दिव्य दृष्टी लाभण्यासाठी ज्ञान हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्याच बरोबर आपलं भविष्यात होणार अहित टाळण्याचा अ प्रतिम मार्ग म्हणजे खरा निष्ठावंत भेटणं आणि ओळखण .पण निष्ठे बाजारात व्यापारात स्वार्थाचा बोलबाला हा शेवटी निष्प्रभ ठरतो पण तो पर्यंत खरा निष्ठावंत पायदळी तुडवला जातो . म्हणून उचित समयी खरा खोटा ओळखता येणं हे आपल्या साठी लाभदायक असत.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad