Bluepad | Bluepad
Bluepad
राष्ट्रीय चरित्र निर्माण होण्यासाठी स्वयंस्फुर्तीने योगदान दिलं पाहिजे
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*राष्ट्रीय चरित्र निर्माण होण्यासाठी स्वयंस्फुर्तीने योगदान दिलं पाहिजे*
शिस्त हि मानवी जीवनाचं भुषण असते .पण हेच भुषण आपल्याला नकोस असतं म्हणून अनेक नियम कायदे निर्माण होतात.पण सगळ्याच क्षेत्रात स्वयं शिस्त निर्माण झाली तर आदर्श राष्ट्र निर्माण होण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. म्हणून राष्ट्रीय चरित्र निर्माण होणं हि वेळेची गरज असुन त्यासाठी प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे स्वयंस्फुर्तीने योगदान दिलं पाहिजे.सार्वजनिक ठिकाणी आपण जेव्हा वावरतो तेव्हा आपण जाणिव पुर्वक सार्वजनिक शिस्तीला महत्व देऊन ती स्व इच्छेने पाळली पाहिजे जेणेकरून आपल अनुकरण इतर करतील व राष्ट्रीय चरित्र निर्माण होण्यासाठी योगदान मिळेल.आपल व्यक्तिगत चरित्र निर्माण व्हावं म्हणून आपण प्रयत्न करत असतो त्याच प्रमाणे राष्ट्रीय चरित्र निर्माण होण्यासाठी देखिल आपण योगदान दिलं पाहिजे हि वेळेची आणि काळाची गरज आहे. राष्ट्रीय चरित्र निर्माण होण्यासाठी समाजिक पातळीवरील सार्वजनिक शिस्तीला खूप महत्त्व आहे.प्रत्येकजण स्वतः च व्यक्तिगत चरित्र निर्माण करण्यासाठी नावलौकिक निर्माण करण्यासाठी अहोरात्र कष्ट मेहनत घेत असतो .धडपड करत असतो या मध्ये काहीच गैर नाही परंतु जसं आपण स्वतः साठी प्रयत्न करतो .तसं आपण आपलं गाव आपला जिल्हा राज्य व पर्यायाने देशाच नावलौकिक करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे .परंतु असे प्रयत्न करताना आपल्या कडुन होत नाहीत. अथवा तशी कल्पना सुद्धा आपल्या मनात निर्माण होत नाही. खरया अर्थाने हि आपल्या सगळ्यांसाठी खेदाची बाब आहे .वेळोवेळी येणारी शासन व्यवस्था अनेक असे नियम तयार करुन राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात .परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही उलटपक्षी त्याला अनेक वेगवेगळ्या पद्धतीने खो देण्याचा पळवाट काढण्याचा प्रयत्न आपणच करत असतो .परंतु कोणत्याही व्यवस्थेवर अवलंबून न राहता आपण नागरिक म्हणून आपल्या देशाचं राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्यासाठी योगदान दिले पाहिजे .
व्यक्तिगत चरित्र निर्माण झाल्याने व्यक्तिसह देशाचा नावलौकिक होतो . मागिल कालखंडात आपल्या देशात अनेक असे व्यक्तिगत चरित्र निर्माण झाले त्यांनी जागतिक पातळीवर वेगवेगळे किर्तीमान स्थापित करून राष्ट्र गौरव वाढवलं . त्यामुळे जागतिक स्तरावर आपला वेगळा ठसा निर्माण करत विविध क्षेत्रात भारतीय व्यक्तिंनी आपलं नाव लौकीक निर्माण केल. ज्या पद्धतीने व्यक्तिगत चरित्र निर्माण झाले आहेत त्याच तुलनेत राष्ट्रीय चरित्र सुद्धा निर्माण होणं अपेक्षित होते .सार्वजनिक ठिकाणी वावरताना जी समय सुचकता आणि विवेक यानुसार आचरण होणं अपेक्षित असतं तसं आचरण आपणं करत नाही.आपण जसं स्वतःच्या घराची काळजी घेतो. शिस्त पाळतो म्हणजे शिस्त बद्ध आचरण करतो परंतु हिच बाब आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी वावरत असतो . तेव्हा मात्र आपण कळत न कळत पाळत नाही . किंवा तसं आपल्या कडुन काटेकोर पालन होत नाही जसं बस किंवा ट्रेन मध्ये चढताना उतरताना जागा मिळेल किंवा नाही मिळणार पण प्रत्येकाने स्वयंशिसत म्हणून अगदी रांगेत कुठल्याही परिस्थितीत रंग न तोडता चढ उतार केला पाहिजे. आणि याच पद्धतीने धार्मिक ठिकाणी , मॉल्स मध्ये तसेच वेगवेगळ्या ठिकाणी स्वयं शिस्त निर्माण होण्यासाठी प्रयत्न होण गरजेच आहे.आणि यासाठी राष्ट्रीय चरित्र महत्वाचं आहे.राष्ट्रीय चरित्र म्हणजे काय तर एखाद्या देशातील सर्व नागरिक देशहिताच्या दृष्टीने देशाच्या गौरवशाली परंपरेत भर घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी आचरण करत असताना अलिखित अशी एखादी सवय नियम ज्यांचं पालन करताना कुठलाही कायदा नियम किंवा बंधन नसताना देखील स्वयं स्फूर्तीने आचरण करत असतात अगदी देशातील वेगवेगळ्या प्रांतातील नागरिक जे वेगवेगळी बोलीभाषा बोलताना दिसतात परंतु सार्वजनिक ठिकाणी वावरताना अगदी स्व इच्छेनुसार कुठल्याही नियामाची भिती न बाळगता कर्तव्य म्हणून पालन करतात याला राष्ट्रीय चरित्र म्हटलं जातं आणि ह्या पद्धतीच राष्ट्रीय चरित्र आपल्यला जगातील अनेक देशांमध्ये भ्रमण केल्यानंतर लक्षात येईल थोडक्यात काय तर प्रत्येकाला सार्वजनिक ठिकाणी स्वयं शिस्त हि लागली पाहिजे . परंतु या मध्ये आपण कुठेतरी अजुनही आपल्याकडे सुरवता झालेली नाही किंवा तशा पद्धतीच्या संकल्पना अनेक पुढे आल्या परंतु दुर्दैवाने याला शंभर टक्के यश मिळालं नाही हे आपल्या सगळयांच दुर्भाग्य म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.व्यक्तिगत चरित्र निर्माण होणं गरजेचं असत. कोणत्याही लोकशाही व्यवस्था असणार्या देशातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी स्वयं शिस्त निर्माण होणं हे त्या त्या देशाच जागतिक पातळीवर एक वेगळ्या प्रकारच नावलौकिक होत असत.महणुन देश हितासाठी प्रत्येकानं आपापल्या जीवनात कायदा नियम यापलिकडे जाऊन काही शिस्ती स्वयं शिस्त म्हणून स्वीकारल्या पाहिजेत हि वेळेची आवश्यकता पण आहे .म्हणून प्रत्येकाने राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad