*अज्ञानाच्या विळख्यातून मुक्ति होईल एवढं ज्ञान जीवनावश्यक*
जीवनाची फसगत हि अज्ञानामुळे होत असते.अज्ञान समुळ नष्ट झाल्या खेरीज गत्यांतर नसतं .ज्ञान समुद्रातील एक प्याला ज्ञान मिळविण्यासाठी कित्येक जन्म अपुरे पडतील ज्ञान आणि जीवनाची गरज पाहता वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानापैकी अज्ञाना च्या समुद्रातील नौका पैलतीरावर घेऊन जाईल एवढं ज्ञान तर आपल्यासाठी जीवनावश्यक आहेच .पण जशी अडचण तशी ज्ञानाची आवश्यकता असते. म्हणून प्रत्येकाच्या जीवनातील ज्ञानाची गरज हि वेगवेगळी असु शकते . व्यक्तीपरत्वे हि गरज आणि मर्यादा बदलत असते . ज्ञानाची उपलब्धता पाहता व्यवस्थित जीवन व्यतित करण्यासाठी अज्ञानाचा समुळ नाश होईल एवढं ज्ञान पुरेसं असु शकत. सर्वसाधारण जीवनात किती ज्ञान अपेक्षित आहे.याचा सारासार विचार केलातर आपण आयुष्यभर ज्ञान अर्जित केले तरी ज्ञान संपणार नाही. एवढी ज्ञानाची प्रचंड मोठी व्याप्ती आहे .ज्ञान हे अमर्याद असतं जसा समुद्र विशालकाय आहे.तसंच ज्ञान पण विशालकाय असतं म्हणून किती हि ज्ञान मिळवलं तरी आपली ज्ञान भुक पुर्ण होऊ शकत नाही. एवढी ज्ञानाची अमर्याद अवस्था आहे .परंतु जीवनाच्या रंगमंचावर अज्ञानाचा समुळ नाश होईल एवढं ज्ञान मिळाल तरी पुरेसं आहे .ज्ञानी होण्यासाठी फार काही करण्याची आवश्यकता नसते .ज्ञान आणि अज्ञान यातील फरक समजला पाहिजे .अज्ञानाला समुळ नष्ट करता येईल एवढं माफक ज्ञान असल तरी पुरेसं ठरतं. आपल्या जीवनातील अज्ञान रूपी जळमटं दुर करण हि काळाची गरज असते . गर्द अशा काळोखाच्या रात्री येणार्या अंधाराचा समुळ नाश झाल्यानंतरच भव्य दिव्य अशा नव्या किरणांची सकाळ होऊन स्वच्छ असा सुर्य प्रकाश दिसतो जस सुर्याच्या मधे येणारा ढग बाजुला झाल्यानंतरच आपल्याला सुर्यच अ प्रतिम तेज दिसते . याच प्रमाणे अज्ञानाचा समुळ नायनाट झाल्याखेरीज किंवा अज्ञान हे मुळा सकट संपुष्टात आल्यखेरीज व्यवस्थित जीवनाचा मार्ग दिसत नाही. म्हणून मुख्यत्वे ज्ञान म्हणजे काय हा जरी विशालकाय प्रश्न असला आणि प्रत्येक व्यक्ती परत्वे ज्ञानावरील मत हे जरी वेगवेगळ असल अथवा तसं असणं हि स्वाभाविक नैसर्गिक आहे .कारण ज्ञानाची असी निश्चित व्याख्या करता येत नाही. ज्ञान हे अमर्याद आहे. जसं समुद्राची लांबी रुंदी आणि खोली मोजता येत नाही. त्याच बरोबर सुर्याचे तेज देखिल मोजता येत नाही .तसंच ज्ञानाच आहे ज्ञान हे अमर्याद स्वरूपात आहे . कारण ज्ञान हे जीवनाच्या रंगमंचावर जीवना रुपी नावेतुन पैलतीरावर जात असताना जो अज्ञान रूपी अंधकार भ्रम वादळं निर्माण होत.आणि या वादळाने अज्ञानाने जीवनात अनेक प्रिय अप्रिय घटना घडामोडी घडतात. किंवा अशा घटनांना आपल्यला सामोरे जावे लागत असते. मुळात जीवनाला अस्थिर करणार हे अज्ञान समुळ नष्ट होण म्हणजेच ज्ञान सत्याचा बोध होणं व सत्य स्वीकारण म्हणजे ज्ञान मुख्यत्वे अज्ञानाचे दोन प्रकार आहेत त्यातील एक म्हणजे व्यक्तिगत अज्ञान ज्या मध्ये सत्या पासून दुर जाण तसेच अनेक भ्रम निर्माण होऊन जीव दुःखाच्या चक्रव्यूहात आडकण म्हणजे अज्ञान, भ्रमाचा मृगजळ भासण व दिसण म्हणजे अज्ञान, सद्सद्विवेक जागृत नसणं म्हणजेअज्ञान ,दुःखाच्या छायेत जाण म्हणजे अज्ञान, शाश्वत आणि भौतिक यामधील अंतर न कळण म्हणजे अज्ञान, एकंदरीत जीवनाच्या वाटेवर नको असलेल्याला किंवा यशस्वी जीवनासाठी हानिकारक बाबींच गाठोड ओझ घेउन फिरणं म्हणजे अज्ञान आणि या ओझ्याखाली आपण इतकं डुबतो कि पुन्हा उभा राहण्याची ताकद शक्ती राहत नाही.हे असणार अज्ञान आणि या अज्ञानाचा समुळ नायनाट कराता येण म्हणजेच ज्ञान तसंच दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक स्तरावरील अज्ञान ज्या सामाजिक अज्ञान ,रूढी परंपरा , धार्मिक अज्ञान, व्यवहारातील अज्ञान , नातेसंबंधातील अज्ञान म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक बाबी मध्ये ज्ञान आणि अज्ञान अशा दोन बाबी सामावलेल्या आहेत . त्यापैकी एक बाजू म्हणजे अज्ञान ती समुळ नष्ट होण किंवा ती आपल्याला न जाणवण दिसण म्हणजेच ज्ञान पण हे ज्ञान एवढं सहज उपलब्ध आहे का ,? तर होय हे अज्ञान समुळ नष्ट होण फार अवघड गोष्ट नाही किंवा अशक्य प्रायः तर नक्कीच नाही.म्हणून जीवनात आपल्या मन बुद्धी वर अज्ञान प्रभावित होणार नाही एवढं ज्ञान सर्वसामान्य माणसाला माफक पुरेस आहे . आपल्याला आध्यत्मिक साहित्या मधुन हे ज्ञान सहजपणे मिळेल एवढं आध्यत्मिक साहित्य महाराष्ट्र राज्यातील संत मंहतानी निर्माण केले आहे .हे आपलं परम भाग्य आहे पण आपण याकडे डोळेझाक करतो हे आपलं दुर्भाग्य. म्हणून अज्ञानाचा समुळ नायनाट करून योग्य अशा ज्ञाना मार्गावर चालण हे प्रत्येक जीवांसाठी हितकारक आहे .
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301