Bluepad | Bluepad
Bluepad
आपल्या भावनांचा लगाम हा आपल्याच नियंत्रणात असला पाहिजे
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*आपल्या भावनांचा लगाम हा आपल्याच नियंत्रणात असला पाहिजे*
आत्म नियंत्रण हि शक्ति आहे आणि हिच शक्ति जीवनात अर्जित करता आली पाहिजे.जेणेकरून इतरांना आपली दिशा ठरवता आली नाही पाहिजे.आपलं जीवन भावनांच्या लाटांवर आरूढ नसलं पाहिजे.तरच स्थिर शांत आणि समुद्रा सारखं संयमी जीवन यशस्वी होऊ शकत.भावना आणि जीवन हे अविभाज्य आहे.भावना वगळता जीवन पुर्ण होऊ शकत नाही.पण आपल्या भावना ह्या इतरांच्या नाही तर आपल्या नियंत्रणात असल्या पाहिजेत जेणेकरून त्या आपल्यासाठी हितार्थ ठरतील अन्याय अनर्थ कारी ठरतील.पण भावनिकदृष्ट्या आपण कसे यानुसार आपलं जीवन ठरत.भावनात्मक दृष्टीने जीवन सक्षम आणि मजबूत असलं पाहिजे.जीवन म्हटलं कि भावनांच्या लाटा निर्माण होणं स्वाभाविक आहे पण आपलं भवितव्य भावनांच्या लाटांवर आरूढ नसलं पाहिजे.जीवनाच्या पटलावर अनेक ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या विषयाशी बाबींशी भावनिकतेचा दैनंदिन जीवनात संबंध कळत न कळत येतच असतो .आणि मग अशा वेळी तो प्रभाव अभाव आपल्यावर किती प्रमाणात होऊ देयचा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं.आपण जेवढे भावनिक तेवढाच त्या त्या विषयांशी आपला संबंध आहे.महणुन सध्या सामाजिक, राजकिय भावनिकतेची दुकान सगळीकडे जोरदार सुरू आहे. पण या सगळ्यात आपली भावनिक कृती हि आपल्या नियंत्रणात असली पाहिजे .जेणेकरून इतर त्याचा गैरफायदा घेणार नाहीत. मनुष्य कोणीही असला तरी तो तसं भावना प्रदान असतोच .आणि भावनांच्या ओंडक्या वर तरंगत तरंगत या भवसागर रूपी संसाराला समोरे जाण्याचं काम जवळपास प्रत्येक व्यक्ती ला करावच लागत . आपल्या भावना इतरांना समजतील च असं नाही . माझ्या भावना कोणीही समजुन घेत नाही असंच काहीसं प्रत्येकाच मत आणि अंतिम निष्कर्ष असतो . परंतु भावना विवश जगात जीवन जगत असताना मात्र मनुष्य इतरांच्या मतानुसार आपलं सुख दुःख ठरवत असतो .इतरांनी आपल्यला विषयी आपल्या समोर किंवा आपल्या पर्यंत पोहचेल अशा पद्धतीने जर काही चांगलं उत्साह वर्धक म्हटलं सकारात्मक चर्चा केली किंवा खोटी खोटी स्तुती केली तर आपण नक्कीच आनंदी होतो .आणि जर इतरांच्या प्रतिक्रिया मत आपल्या विषयी समोर किंवा आपल्या परोक्ष चुकीचे , निंदानालस्ती आतमक अथवा विशिष्ट हेतूने प्रेरित होउन आपल्यावर टिका टिप्पणी करण्यात आली तर आपण लगेच दुःखी होतो .म्हणजे एकंदरीत आपल सुख व दुःख हे लोकांच्या मतानुसार ठरत असेल तर मग आपण सक्षम व्यक्तिमत्व आहेत का ? आणि आपल्या सुख दुःख वर इतरांच्या मतांचा प्रभाव असावा हे सुयोग्य लक्षण नाही .आपल्या भावनांचा रिमोट कंट्रोल हा आपल्या हातात असला पाहिजे .म्हणजे लोकांच्या मतानुसार आपल सुख दुःख ठरणार नाही आणि त्याचा परिणाम हि आपल्या वर होणार नाही . एकंदरीत आपल जीवन आपण आपल्या ज्ञान , विवेक बुद्धी नुसार जीवन व्यतीत केले पाहिजे त्यामध्ये असणारा भवनिकतेचा संबंध हा आपल्या ज्ञान उंची वर अवलंबून असतो.आपण आपल्या ज्ञानाने सक्षम असु तर आपल्या भवनिकतेचा लगाम इतर कोणीही काबीज करू शकत नाही किंवा त्यावर ताबा मिळवु शकत नाही आणि एकदा का इतर कोणी आपल्या भावनिकतेचा लगाम ताब्यात घेतला तर मग मात्र आपल्याला आपला लगाम ज्यांच्या ताब्यात आहे त्याच्या मतानुसार जीवन जगावे लागेल आणि आपल्या जीवनातील क्षणोक्षणी होणारे निर्णय हे लगामधारी चया मतांवर अवलंबून असतील लगामधारी सुयोग्य असेल तर फार काही अडचण येणार नाही परंतु आपला भावनिक दृष्ट्या लगामधारी जर महा विचित्र असेल तर मग मात्र आपलं काही खरं नाही म्हणून भावनिकदृष्ट्या आपण किती मजबुत असलं पाहिजे किती सवलंबी व किती परावलंबी असला पाहिजे याला खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण आपल्या भावनिकतेचा लगाम हा इतरांच्या ताब्यात न देता सद्सद्विवेक आणि ज्ञानानुसार आपल्या संनियंत्रण ठेवल पाहिजे आणि ठेवण्याची कला ज्यांना अवगत झाली त्यांना जीवनाचा सुयोग्य मार्ग सापडला ज्या मार्गावर कुठल्याही धोक्या शिवाय ते योग्य प्रवास करू शकतील . मुळात जीवन घडविणारया बिघवणारया भावना आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आपला विवेक मजबूत असला पाहिजे त्याच बरोबर अध्यात्मिक ज्ञान मार्गावर आपला वावर असेल तर मग मात्र आपल्याला आपल्या भावना नियंत्रित करण फार कठिण जात नाही.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक , अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad