*सदाचार सद्गुण शिकावावे लागतात तर दुर्गुण हे सहज स्वीकारले जातात*
प्रत्येक युगाचा विशेष असं लक्षणं असतं विद्यमान युग ज्याला आपण कलयुग संबोधतो या कालयुगाच देखिल प्रमुख लक्षण हेच आहे कि दुर्गुणांचा प्रचंड आकर्षण या युगात आपल्याला सगळीकडे थैमान घालताना दिसत आहे . जीवनातील चांगल्या वाईट बाबी ह्या प्रत्येकाला समजता असतात तरी सुद्धा चांगल्या बाबी पेक्षा वाईट बाबींच आकर्षण जास्तच असतं हे जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य म्हटले तरी वावगे ठरणार नाही.समाजिक पातळीवर पाहिलं तर वयोगट कोणताही असो त्या त्या वयोगाटात दुर्गुणांचा आकर्षण हे प्रमुख लक्षण दिसतच. साधारणता दहा पंधरा वर्षं वय होईपर्यंतची लहान मुलं वगळली तर प्रत्येकाला चांगलं काय वाईट काय आपल्या फायद्याचे काय नुकसान दायाक काय हे कळत पण वळत नाही .असंच म्हणावं लागेल कारण चांगल्या हितकारक बाबी शिकवाव्या लागत .परंतु ज्या बाबींमुळे आपलं अहित होणार आहे ते माहित आहे शिकावायला कोणी नाही तरी आपण त्या सहज आत्मसात करतो .स्वतः च्या जीवनाच कल्याणा होण्यासाठी उपयोगी असणारे सद्गुण व सदाचार हा आपल्याला शिकावाव लागतो. मात्र ज्या वाईट घडत ते अवगुण मात्र आपोआप आत्मसात होतात हे सध्याच्या काळातील सगळ्यात भायनक असं वास्तव आहे .सृष्टीवरील सगळे चांगले सदगुण सात्विक हितकारक बाबी ह्या शिकवण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शक म्हणून प्रयत्न करत असत .तरी सुद्धा अनेक वेळा शिकावले तरी त्या बाबी आत्मसात होताना अडचणी येतात .आणि यदाकदाचित त्या आत्मसात झाल्या तरी त्या टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा नियमित प्रयत्न कारावे लागतात . हितकारक बाबींसाठी अनेक मार्गदर्शक वेगवेगळे धार्मिक ग्रंथ तत्वज्ञान वेळेनुरूप अनेक महापुरुष कार्य करत असतात .तसेच समाजाच्या पातळीवर सुद्धा कुटुंबा पासुन अनेक घटक यासाठी कार्यरत असतात.या उलट वाईट अहितकारक कार्य करण्यासाठी मात्र कोणत्याही प्रकारच मार्गदर्शक तत्वज्ञान असं काहीही लागत नाही अहितकारक कार्यचा कोणी मार्गदर्शक आहे असं आपण कधी ऐकलं आहे का?. अगदी सहज चालता बोलता आपण वाईट बाबी आत्मसात करतो आणि म्हणूनच अवगुण प्राप्त करण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केल्याचं आज पर्यंत तरी ऐकिवात नाही . कारण वाईटाच आकर्षण जास्त प्रमाणात असत .बहुतांश लोक अहितकारक बाबीच आत्मसात करतात हे दुर्दैव आहे .मानवी जीवन आणि जीवनातील काही दैनंदिन बाबी ज्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या जीवनातील परिणामांना प्रभावित करत असतात यातील काही बाबी ह्या हितकारक असतात तर काही अहितकारक असतात.जीवनातील कल्याणकारी बाबी ह्या करण्यासाठी मन बुद्धी यावर वारंवार नियंत्रण प्रस्थापित कराव लागत .आपण सजग असतो.तरी सुद्धा आपण कधी रस्ता चुकतो आणि अहितकारक बाबी आपण किती सहजपणे अंगिकारतो ते कळत सुद्धा नाही. कारण अहितकारक बाबींच आपल्यला किती प्रचंड प्रमाणात आकर्षणं असतं किती उत्सुकता असती किती गोडी असते .अगदी आयुष्याची वाट लागली तरी चालेल पण अहितकारक बाबींच आकर्षण आपण सोडत नाही. जीवनाच वाटोळं करणार्या बाबी ह्याच आपल्यला योग्य वाटतात चांगल्या वाटतात या पेक्षा वाईट बाब काय असु शकते .आणि म्हणूनच अहितकारक बाबींच प्रचंड आकर्षण हे सध्याच्या काळातील सगळ्यात मोठे आश्र्चर्य आहे. तसं पाहिलं तर आकर्षण हा मानवी स्वभावाचा मुख्य गुण दोष असतो. पण यामध्ये सुद्धा चांगल्या, सात्विक, धर्म शास्त्रानुसार मान्य बाबी, सद्गुणी, समाज हितकारक, लोक उपयोगी, सदाचारी बाबींच आकर्षण असल पाहिजे. पण जीवनातील कल्याणासाठी आवश्यक अशा ह्या बाबी सहजासहजी कोणीही स्वीकारत नाही. त्यासाठी अनेक घटक सक्रिय प्रयत्न करत असतात. तरी सुद्धा लोक या मार्गावर स्व इच्छेनुसार फार कमी प्रमाणात सहभागी होतात .आणि सहभागी झाल्यानंतर सुद्धा वांरवार मार्गदर्शन उपयोगी साहित्य विचार प्रवाह सुविचार, आणि चांगल्या बाबींच मार्गदर्शन करणारे अनेक दृश्य अदृश्य मार्गदर्शक असताना सुद्धा त्यापैकी खुप कमी लोक शेवटपर्यंत या मार्गावर टिकतात .चांगलं वागण्यासाठी चांगलं घडण्यासाठी जगातील सगळे मार्गदर्शक तत्वज्ञान धर्म ग्रंथ साहित्य प्रयत्नशील असतात .तरी सुद्धा या मार्गावर लोकांना ओढुन ताणुन आणावं लागतं हे दुर्दैव महणाव लागेल. परंतु यांच्या उलट समाज विघातक , धर्म शास्त्रानुसार अमान्य, बाबी तसेच स्वतः च व कुटुंबांचे नुकसान होईल अशा अहितकारक बाबींच्या अनुषंगाने कोणीही मार्गदर्शक नसताना तसेच वाईट बाबी संदर्भात कुठलंही तत्वज्ञान उपलब्ध नसताना विना मार्गदर्शक अहितकारक मार्गावरून बहुतांश लोक किती व्यवस्थित आणि शेवटच्या टप्या पर्यंत सुद्धा सहज प्रवास करतात ह्या वाईट बाबींच आकर्षण किती सहज किती विराट असत त्यासाठी कुठलेही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. हे जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. चांगलं कार्य करण्यासाठी वारंवार सांगावे लागते. पण वाईट हे रूचकर असल्याने अहिताचे कार्य करण्यासाठी कुणीही मार्गदर्शन नसल तरी देखील मृगजळ पाहुण माणसं तिकडं च फिरवतात म्हणजे एकंदरीत वाईट बाबी किती गोड मधुर आणि फायदेशीर वाटतात . म्हणून त्याच आकर्षण जास्त प्रमाणात असत .आध्यत्मिक ज्ञान यावर प्रभावी उपाय आहे. आध्यत्मिक ज्ञाना च्या माध्यमातूनच अहितकारक बाबीवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं म्हणून दैनंदिन जीवनात वारंवार आध्यत्मिक ज्ञान हे महत्त्वाचे आहे .जेणेकरून आपल्या मनात सकारात्मक विचार संचय होऊन अहितकारक बाबीचा शिरकाव होणार नाही.आणि आपण यापासून स्वतःचा बचाव करत स्वहित करण्यासाठी योग्य उपयोग होईल.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301सदाचा