जीवनातील स्थैर्य हे कर्म फळाच्या अभिलाषेनुरूप ठरत असतं
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023
Share
*जीवनातील स्थैर्य हे कर्म फळाच्या अभिलाषेनुरूप ठरत असतं*
जीवनातील स्थिरता ज्याला आपण स्थितप्रज्ञ अवस्था समजतो .जिथे दुःख आनंद समान असतो अशी अवस्था प्राप्त व्हावी हि आपली मनोमन इच्छा असते . परंतु हि इच्छा आपण कर्म फल अभिलाषा कशा पद्धतीने करतो आहेत त्यावर अवलंबून असते . कर्म फल अभिलाषा ज्ञान सदृश ठेवली तर जीवनात नक्कीच स्थैर्य प्राप्त होते.कर्म करून फळाची अपेक्षा करणं या मध्ये गैर असं काहीच नाही .परंतु हिच अपेक्षा दुःखांच मुळं कारण ठरत असेल तर मग मात्र हि कठीण बाब आहे ? आणि असं होतं असेल तर मग यावर उपाय काय आहे ? हा देखिल प्रश्नच आहे? म्हणून सर्वसाधारणपणे कर्तव्य म्हणूनकर्म करून जो फळाची अपेक्षा बाळगत नाही. आणि फळ मिळालेच तर तो ते अगदी सहजपणे स्वीकारतो. आणि जर यदाकदाचित जर फळ मिळालं नाहीतर निराश खिन्न होत नाही दुःख व्यक्त करत नाही .तो साहसी धाडसी मजबूत असतो. आणि या उलट जो कर्म करून फळाची अपेक्षा करतो. त्याला फळ मिळालं तर उत्तम परंतु यदाकदाचित फळ नाही मिळालं तर मग मात्र तो खिन्न होतो तणाव घेतो दुःखी होतो. म्हणून कर्म करून फळाची अपेक्षा करतो तो कमजोर दुबळा कमकुवत ठरवते . म्हणून सदैव साहसी असणं हे सुखी समाधानी आनंदी जीवनाचे लक्षण आहे . सुख आणि दुःख ह्या जीवनातील न टाळता येणारया परस्पर विरोधी क्रमप्राप्त घटना आहेत . म्हणून आपण याकडे वरकरणी पाहुण चालणार नाही . मुळात आपण याच सखोल अध्यान देखिल करत नाही. म्हणून संसारीक जीवनातील सुख दुःखाच्या वादळाचे तडाखे हे आपल्याला बसतात. आणि या तडाख्याने अनेकदा आपण कोलमाडुनही जातो . मुळात हे तडाखे बसु दयाचे कि नाही हे सर्वस्वी आपल्यवर अंवलबुन असत . आणि म्हणून आपण शक्यतो साहसी असलाच पाहिजे . कुठल्याही परिस्थितीत आपण कमजोर असता कामा नये .जर आपण कमजोर असु तर सुख दुःखाची वादळ आपल्या जीवन रूपी नावेला पाण्यात वारंवार डुबवण्याचा प्रयत्न करतीलच या मध्ये शंका नाही. आणि म्हणूनच यामधुन आपली कायमची सुटका होण्यासाठी आपण साहसी होण्याची नितांत आवश्यकता असुन ती काळाची ची गरज आहे . जीवनातील प्रत्येक घडामोड आणि सुख दुःख याचा आपल्या कर्माशी घनिष्ठ असा संबंध असतोच. कर्म म्हणजे नशिब वगैरे असं काही नाही तर आपण जे जे कार्य करतो. ते कार्य म्हणजेच वास्तविक कर्म आहे .आणि हेच कर्म आपल्या जीवनातील सुख दुःख निश्चित करत असत . त्याची तीव्रता ठरवतं असतं . वास्तविक पाहता जीवनात कर्म हे अनिवार्य बाब आहे . म्हणून कर्म हे करावेच लागणारच आहे. पण हे कर्म करत असतानाच जर जबाबदारी कर्तव्य म्हणून ज्ञानावरून निष्ठा पुर्वक प्रामाणिक न्याय सुसंगत कर्म करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे. याची जाणीव जागृती हि सदैव ठेवली तर दुःख शिल्लक उरत कुठे आणि कशासाठी.पण आपण मुळात हेच विसरतो. आणि मग इथंच आपण भरकटतो. आणि खरंया अर्थाने दुःखाची सुरुवात किंवा दुःखाचा पाया इथंच रचला जातो. आणि बघताबघता कळस कधी पुर्ण होतो .ते कळत सुद्धा नाही. म्हणून दैनंदिन जीवन जगण्यासाठी कर्म करत असताना जागरूकता बाळगून कर्तव्य म्हणून कर्म केले. आणि आणि फळाची अपेक्षा केली नाही .तर दुःख आपल्याकडे फिरकाणार सुद्धा नाही . दैनंदिन जीवनातील विविध व्यवहारातील आणि दैनंदिन बाबींच्या अनुषंगाने प्रत्येक घटनेत घडामोडीत विषयामध्ये आपण आपलं कर्म करत असताना अगदी निष्ठा पुर्वक पार पाडलं पाहिजे. आणि त्या कर्म तुन फळ मिळाले तर आनंदच आणि जर नाही मिळाले तरीही सुद्धा आनंदच या पद्धतीने साहसी माणसं जीवन जगत असतात.महणुन साहसी माणसाच्या आयुष्यात दुःख आपलं स्थान निर्माण करू शकत नाही. आणि या उलट कमजोर व्यक्ती कर्म करण्याची सुरुवात केल्यापासूनच म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळापासून फळाची अपेक्षा महत्वकांक्षा बाळगुन असतो . अणि मग जर फळ मिळाले नाही तर मग मात्र दुःख व्यक्त करतो . निराश होऊन हताश होतो.निष्ठा पुर्वक कर्म करण हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कर्म केल्यानंतर फाळाची अपेक्षा साहसी व्यक्ती कधीही करत नाही तो कर्तव्य म्हणून कर्म करतो . आणि फाळची अपेक्षा नसल्याने सुख दुःख त्याच्या कडे फिरकत नाहीत .आणि त्या मुळे निसर्गातील कोणतीही शक्ती अशा व्यक्तिवर परिणाम करत नाही .अघात करू शकत नाही.तसेच भौतिक मोहाच्या जाळ्यात अशा व्यक्तींना खेचु शकत नाही म्हणून कर्म करा पण फळ मिळेल किंवा नाही मिळेल.या मध्ये फार स्वारस्य बाळगु नका . तसेच कर्म करण्यामध्ये कोणताही निष्काळजीपणा करू नका .आपलं कर्म हेच आपल्या जीवनातील सुख दुःखांच भुंकप केंद्र असतं ते जेवढं संवेदनशील तेवढे धक्के जास्त . आणि म्हणून आपल्या जीवनातील सुख दुःख निर्मिती चे शिल्पकार हे आपण स्वतःच आहेत हेही विसरून चालणार नाही. आपण कर्म करताना जो भाव निर्माण केला आहे.किंवा जो भाव ठेवाला आहे. त्या नुसार तसंच सुख दुःख मिळणं हे निश्चित आहे.महणुच साहसी व्यक्तिमत्त्व होऊन कर्म करा. आणि सुखी समाधानी आनंदी निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करा . हेच जीवनातील महत्वपूर्ण ज्ञान आहे. म्हणून कर्म फलापेक्षा निसंदेह कर्म करा. ज्ञान युक्त कर्म करा .ताण तणाव मुक्त होऊन सकारात्मक पद्धतीने जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करण्यासाठी साहसी पद्धतीने पुढे चालण्यासाठी ज्ञान हे शास्त्र महत्वपूर्ण आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301
0
Share
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य