Bluepad | Bluepad
Bluepad
इतिहासातुन वाद नाही तर बोध शोधायचा असतो
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*इतिहासातुन वाद नाही तर बोध शोधायचा असतो*
जशी आपली दृष्टी असते तशी आपल्याला सृष्टी जाणवते दिसते हे अगदी सत्य आहे. वातावरण निर्मिती करून सनसनाटी निर्माण करत चुकीच्या पद्धतीने मांडणी करून स्वतःच व्यक्तिमत्त्व लोकांच्या नजरेस आणणं हा जरी संवग लोकप्रियतेचा एक भाग असला तरी पण हा प्रकार म्हणजे फार फार क्षणिक समाधान प्रकार ठरू शकतो .यामधुन फार काही साध्य होईल नसतं . कारण याचा पाया मजबूत नाही . जिथे पाया मजबूत नाही तिथे इमारत भक्कम कशी असेल म्हणून हि पद्धत अथवा प्रकार म्हणजे वैचारिकता ठरत नाही. मान्य करण अथवा न करण हा व्यक्तिगत प्रश्न असतो. वैचारिकता हि विराट असते .सत्य शोधण सत्याचा वेध घेणं आणि घटनेतील घडामोडी मधील बोध शोधण म्हणजे वैचारिकता असते.एखादा विषय चुकीच्या पद्धतीने मांडणी करून सार्वजनिक करणं अथवा वास्तव सत्य शोधून बोध पुर्ण मांडणी करणं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत तथा व्यक्तिस्वातंत्र्याचा त्याच बरोबर दृष्टीचा भाग आहे अधिकार आहे.लोकांनी काय स्वीकारलं पाहिजे हे महत्वाचं आहे. लोक चुकिच स्वीकारत असल्याने चुकीच्या पद्धतीने मांडणी होतेय असंच काहीसं चित्र साध्य दिसतं आहे. ज्यावेळी सर्वसामान्य लोक जागृत होतील आणि सत्य स्वीकारतील त्यावेळी असत्य आपोआप मागे पडेल या मध्ये शंका नाही.इतिहास हा नेहमीच विचारवंत जन्मला घालत असतो .कारण सत्य शोधण्यासाठी बुद्धीचा कस लागतो .इतिहास हा बोध शोधुन पुढे जाण्यासाठी असतो पण हल्ली बोध शोधण्या ऐवजी इतिहासावर वाद कसा निर्माण करता येईल हाच खास आणि विशेष प्रयत्न होताना दिसतो आहे.हा वाद निर्माण करणं खरंच गरजेचं आणि हितार्थ आहे का ?तर वास्तविक विचार केला तर हे अजिबात हितार्थ नाही.इतिहासाची सोनेरी पानं हि नवीन पिढीसाठी दिशा दर्शक बोध घेण्यासाठी असतात.ऐतिहासिक घटना कोणतीही असो कशीही असो ती त्या वेळेच प्रतिक असते. प्रत्येक घटनेत एक बोध लपलेला दडलेला असतो .तो बोध शोधणारा जाणकार असतो .इतिहासातील ऐतिहासिक घटना या मध्ये जो काही वास्तविक बोध दडलेला असतो .तो मुख्य बोध हेरता आला पाहिजे. घटना कोणतीही असु द्या त्या मध्ये जीवनबदलणारा घडवणारा बोध हा नक्कीच असतोच .पण आपण बोध शोधण्या ऐवजी त्या मध्ये वाद शोधतो आणि त्या वरून वाद कसा निर्माण होईल हाच मुख्य प्रयत्न करतो म्हणून इतिहासाची उपलब्धी ज्यामध्ये बोध मिळणार आहे त्यापासून आपण वंचित राहतो.आणि आपले समर्थक हितचिंतक आणि आपल्याशी जोडलेल्या संबंधीतांना देखिल वंचित ठेवतो . सत्य वास्तव हे समाज घडवणार असतं पण आजकाल सत्य घडविण्यासाठी फार प्रयत्न होत नाहीत .सत्य शोधण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात हि कष्ट घेण्याची सवय दिवसेंदिवस लुप्त होत चालल्याने सत्या पासुन दुर राहण्यास जास्त पसंती आहे. असत्य सहज उपलब्ध असतं त्यासाठी फार काही यत्न, प्रयत्न करावे लागत नाहीत म्हणून असत्याला मोठी पसंती मिळताना दिसत आहे. पण खरया अर्थाने त्यामधुन होणारा लाभ हा शुन्य असतो . प्रबोधन हे जागृती साठी असतं . प्रबोधन सत्य शाश्वत असेल तर होश जागृती निर्माण होते .आणि उलटपक्षी असत्य पाया असेल तर सगळीकडे बेहोशी निर्माण होईल.मग बहोशी असताना काय घडेल अथवा बहोशी हि कधीच हितकारक नसल्याने अंतिमतः निरूपयोगी ठरेल. या मध्ये मग नेमका दोष कोणाचा आहे याचा विचार केला तर आपण चुकीचं पचवतो म्हणून आपल्याला ते त्या पद्धतीने खाऊ घातलं जातं ज्या दिवशी आपण चुकीचं पचवणार नाही त्या दिवशी पासुन चुकीचं खाऊ घालणं आपोआप बंद होईल. वैचारिक प्रगल्भता विवेकशील वृत्ती आणि जागृत अवस्था हि सदैव क्षणोक्षणी असली पाहिजे.आपली जागृती हिच महत्वपूर्ण आहे.आपण जागृत असु तर असत्य आपोआप गायब होईल आणि जितकं सत्य आहे तेच समोर येईल आणि सत्य समोर आल्यावर त्या पासुन आपला उत्कर्ष नक्कीच होईल. वास्तविक असत्य हे कोणासाठी हि लाभदायी नसतं .ते क्षणिक असल्याने भ्रमक, आकर्षक, सुंदर भासत पण शेवटी ते तसं नसतं म्हणून सत्य स्वीकारलं पाहिजे.इतिहास हा कसाही असला तरी त्या मधील बोध शोधुन तो स्वीकारण्यासाठी असतो . म्हणून त्यामध्ये मिळणारा बोध हा आपल्या जीवनात जीवन हितार्थ असतो .पण आपण हितार्थ बोध घेण्या ऐवजी चुकीच्या पद्धतीने मांडणी करून त्या मध्ये वाद शोधतो . इतिहासात बोध शोधला तर निश्चितच लाभ होईल आणि वाद शोधला तर हानी निश्चित आहे. काय शोधायचं काय घेयच हे आपल्याला समजलं पाहिजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad