*नदी प्रमाणे उथळ नाही तर समुद्रा सारखं विराट अथांग होता आलं पाहिजे*
उथळपणा हा सद्गुण नाही तर जीवन प्रभावीत करणारा अवगुण अहितकारक आहे आणि या अवगुणापासुन स्वतःला दुर ठेवण्यासाठी स्वतः मध्ये अथांग वृत्ती विराटत्व धारण करा जेणेकरून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्याचा आपल्याला योग्य लाभ होऊन आपल हित होईल.जीवनाचं मर्म कळलं तर सत्य उमजत.आणि सत्य उमजलं तर जीवनात मान सन्मान अपमान, मोठेपणा छोटेपणा संपुष्टात येतो.मग आपोआप आपल्या मध्ये असणारा विराट तत्व प्रकट होत .विराटत्व प्रकट होण्यासाठी जीवन असतं पण आपण नदीपलिकड जातंच नाहीत. अथळ आहे त्याला खळखळाट निश्चित असतो . म्हणून उथळ नाही तर अथांग विशाल होता आलं पाहिजे.जे उथळ असत त्याला खळखळाट असतोच तो नैसर्गिक आहे .जो अथांग असतो तो स्थिर शांत समुद्रा सारखा विशाल असतो.जीवनात नदी होणं कठीण नाही नदी कोणालाही होता येईल .पण समुद्र होणं खुप कठिण आहे. आयुष्याच्या वाटेवर आपण ज्या क्षेत्रात मार्गक्रमण करतोय त्या क्षेत्रात नदी सारखं उथळ नाही तर समुद्रा सारखं विराट विशाल अथांग व्यक्तिमत्त्व निर्माण करा. नदी होऊन खळखळाट करण्या ऐवजी अखंडित समुद्रा सारखं अथांग विशाल होता होता आलं तर जीवनाच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संकट ,वादळ, हि निसर्गाला चुकली नाहीत, चुकणार नाहीत. तर मग ती मानवाला कशी चुकणार .परंतु वादळाने ,संकटाने जो आपली शांतता भंग होऊ देत नाही तो म्हणजे समुद्र असतो त्याच प्रमाणे जीवन म्हटलं कि अनेक वेगवेगळ्या प्रकारची वादळं हि घोंगावणारच त्या मध्ये शंका नाही पण या वादळांना पुरून उरतो तो समुद्र समुद्राची शांतता हि निरंतर असते . अनेक वारे ,वादळ, पाऊस, नैसर्गिक, अनैसर्गिक संकटाचा समाना करताना देखील समुद्र आपली शांतता टिकवून ठेवतो .हा समुद्राचा सर्व उत्कृष्ट गुण आहे आणि हाच गुण आपण आपल्या जीवनात स्वीकारला पाहिजे. जेणेकरून आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळेल. निसर्गा मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जीव सजीव आहेत. संकटं वादळ यांचा तडाखा निसर्गासह अनेक जीव सजीव यांना वारंवार बसत असतो . परंतु हि जी संकट,वादळ , आहेत याचा प्रभाव झाल्यानंतर सुद्धा शांतता हि टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करता आला पाहिजे .समुद्रात अनेक प्रकारची वेगवेगळी वादळे निर्माण होतात .कधी नियोजित वादळं येतात तर कधी कधी अचानक नैसर्गिक बदलानुसार वादळ येतात . त्यातील काही वादळ लहान असतात आणि काही वादळ मध्यम तर कही वादळ हि भव्य आणि विराट स्वरूपाची असतात . परंतु या सगळ्या वादळाला समुद्र पुरूण उरतो . मात्र समुद्र कधीच आपली शांतता सोडत नाही किंवा आपल्या शांततेवर परिणाम होऊ देत नाही. मानवी जीवनात देखिल असंच असतं काही घडण अपेक्षित असतं तर काही अनपेक्षित देखिल घडत अथवा अनुभवास येत. म्हणून समुद्र आणि मानवी जीवन हे जवळपास सारखेच असलं पाहिजे.समुद्र अनेक वादळं येऊन सुद्धा आपली शांतता भंग होऊ देत नाही .तसंच मानवी जीवन आणि संकटं ,वादळ यांची मालिका हि सुरूच असती . वेगवेगळी संकट जेव्हा जीवनात आगमन करतात तेव्हा सगळ्यात प्रथम आपण आपली शांतता भंग होत असते . आणि शांतता भंग झाली कि मग मात्र वादळाने जेवढं नुकसान होणार नाही त्यापेक्षा जास्त आपलं नुकसान आपण आपली शांतता भंग झाल्याने करून घेतो. मुळात जीवन म्हटलं कि नदी सारखं नाही तर समुद्र सारखंच असावं .वादळ समुद्रात पण येतात आणि जीवनात पण येतात आणि समुद्र वादळांना पेलुन नेताना आपली शांतता यत्किंचितही डळमळीत होऊ देत नाही. आणि म्हणूनच वादळ समुद्राच काही च बिघडवू शकत नाहीत. तसंच आपण आपल्या जीवनात संकट,वादळ आल्यानंतर आपली शांतता भंग होऊ दिली नाही .तर किती ही मोठं ,संकट ,वादळ हे आपलं काहीच बिघडवु शकणार नाही .म्हणून सगळ्यात महत्त्वाच आहे ते शांतता हा गुण समुद्रा कडुन आपल्याला शिकता आलापाहिजे. आणि हा गुण आपण शिकलो तर आपलं जीवन सुद्धा नक्कीच समुद्रा सारखं स्थिर शांत होईल या मध्ये यत्किंचितही शंका नाही. पण आपण समुद्र नाही तर नदी होण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपलं गणित गडबडत यासाठी महत्वाची बाब आहे ती म्हणजे अध्यात्मिक ज्ञान . अध्यात्मिक ज्ञान कितीही मोठ्या वादळानंतर आणि संकटानंतर जीवनातील शांतता भंग न होऊ देत नाही जीवनातील शांतता कायम ठेवण्यासाठी अध्यात्माच्या शिवाय दुसरा अन्य पर्याय नाही . म्हणून वादळाने ज्याची शांतता भंग होत नाही तो कोणीही असला तरी तो म्हणजे समुद्रच असतो . म्हणून आपलं जीवन सार्थक होण्यासाठी जीवनात नदी सारखं उथळ नाही तर समुद्र सारखा विशाल विराट आणि अथांग होता आलं पाहिजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301