Bluepad | Bluepad
Bluepad
स्वप्न पुर्ण होण्यासाठी शक्तिला योग्य दिशा देणं आवश्यक आहे
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*स्वप्न पुर्ण होण्यासाठी शक्तिला योग्य दिशा देणं आवश्यक आहे*
जीवनात प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं आणि हेच स्वप्न उराशी बाळगून प्रत्येकजण आयुष्यात मेहनत घेत असतो .स्वप्न बाळगण गैर नाही पण नुसत स्वप्न बाळगून चालतं नाही तर त्यासाठी आपल्या मध्ये असणाऱ्या शक्तिला योग्य दिशा देऊन गतिमान करता आलं पाहिजे जेणेकरून आपण पाहिलेल स्वप्न हे सत्यात उतरेल.आपण किती धावतोय अथवा आपला वेग किती सुसाट आहे .किंवा मंद आहे यावर आपलं यश अपयश ठरत नाही त्यासाठी स्पष्ट उदेश आणि योग्य दिशा हे महत्वपूर्ण व निर्णायक ठरतात. म्हणून स्पष्ट उदेश आणि योग्य दिशा याला खुप महत्व आहे . जगातील सगळ्यात शक्तिशाली वेगवान बाब सुद्धा अयोग्य दिशेने गतिमान झाली तर सुयोग्य ठिकाणी पोहचण्याची सुताराम शक्यता नसते .जीवनाच्या संघर्षमय प्रवासात आपल्या सोबत कोण आहे किंवा नाही तसेच आपल्या कडे काय सेवा सुविधा आहेत किंवा नाहीत याचं बरोबर आपली परिस्थिती अथवा स्थिती कशी याला पण शुन्य महत्व आहे .दिशा योग्य आणि स्पष्ट उदेश असल्यावर आपल्या साथीला सोबत कोणीही नसलं तरीही फार फरक पडत नाही.जस पांडव फक्त पाच होते तरी पण हजारो कौरवांना पुरून उरले.महणुन विजयासाठी बळ महत्वाचं नाही तर रणनिती महत्वाची आहे.आणि रणनिती हि स्पष्ट उदेश आणि योग्य दिशा यांवरच ठरत असते . आजुबाजूच्या संख्याबळाकडं पाहुण चालणार नाही..आपण एकटे जरी असलो तरी सुद्धा आपण मनोवांछीत धेय्य अथवा ठिकाण हे यशस्वी पणे गाठणारच आहेत या मध्ये काही शंका नाही फक्त आपली दिशा हि योग्य असली पाहिजे. उलटपक्षी आपल्या सोबत कोणीही असल अथवा किती हि बलाढ्य शक्ति आपल्या सोबत असली पण दिशा चुकली अथवा चुकीची असेल तर कोणाचाही पाठिंबा आपल्याला असला तसेच आपल्या मागे सृष्टी वरील सगळ्यात प्रबळ शक्ती ने पाठबळ जरी उभे केले तर सुद्धा आपली दिशा चुकल्याने दशा होणार हे निश्चित आहे. आपली दिशा हि अयोग्य असेल तर काहीच उपयोग होत नाही हे वास्तविक सत्य आहे .म्हणून जीवनात योग्य ठिकाणी पोहोचायचं असेल किंवा प्रत्येक बाबी मध्ये यशस्वी होयच असेल तर मात्र आपली दिशा सुयोग्य असण खुप महत्वपूर्ण आहे .आवश्यक असुन त्याची जाणीव हि जीवनात सदैव क्षणोक्षणी असली पाहिजे साधारणतः आपल्या जीवनातील मुख्य अडचण हिच आहे कि आपण जेव्हा एखाद्या बाबींचा निर्णय घेतो तेव्हा उदेश आणि दिशा यावर योग्य निर्णय घेत नाही म्हणून अनेकदा आपल्याला अनेक नानाविध प्रयत्न करून सुद्धा माघार घ्यावी लागते .आपण दिशा योग्य निवडण्या ऐवजी संसाधनांचा विचार करतो पाठबळ पाहतो . आपल्याकडं काय उपलब्ध आहे.तसेच आपल्या सोबत कोण कोण आहे . कोण कोण नाही या भोवतीच आपण जास्त फिरतो. आणखी आपल्या पाठीशी किती पाठबळ उभा करता येईल यावरच आपण खल असतो अथवा आपलं मंथनही चालू असतं मुख्यत्वे आवश्यकता हि आहे कि दिशा सुयोग्य आहे कि नाही हे निश्चित करण्याची गरजच असते .अधिकच आणि योग्य चिंतन हे स्पष्ट उदेश आणि दिशा योग्य निश्चित करण्यासाठी खर्ची घातलं पाहिजे पण तसं होत नाही.हजारे लाखोंच पाठबळ असणाराही अयोग्य दिशेने निघाला तर सुयोग्य ठिकाणी पोहचु शकत नाही . म्हणून आपल्या पाठीशी काय आहे काय नाही याला फार महत्त्व नाहीच ‌आपल्या जवळ जे आहे त्याच्या सामर्थ्यवर सार्थ विश्वासावर व आपल्याकडील उपलब्ध संसाधन च्या आधारावर जर प्रवासाला सुरुवात केली तर अशा वेळी मात्र आपल्याला कोणतंही संकट वादळ आपल्या इच्छीत ठिकाणी पोहचण्या पासुन रोखु शकत नाही . आणि मात्र शर्त एकच आहे आपला उदेश स्पष्ट आणि दिशा योग्य असली पाहिजे. यदाकदाचित प्रचंड शक्ति,ताकद संसाधन ,पाठबळ मग ते वेगवेगळ्या प्रकारचे सोबत आहे तरी आपण कमी पडलो. अथवा अयशस्वी झालो तर मग आपण नेमकं कुठे कमी पडलो . याच उत्तर हेच आहे कि आपली दिशा हि अयोग्य होती . म्हणून आपण यशस्वी होऊ शकलो नाही . आणि एखाद्याकडे कुठलही संसाधन ,पाठबळ, सेवा , सुविधा उपलब्ध नाहीत आणि त्याने आपल्या धेय्या प्रति प्रवास चालू केला आणि तो योगायोगाने यशस्वी झाला तर मग याठिकाणी नक्की काय चमत्कार झाला असे आपण मानतो . पण यामध्ये असं काहीच चमत्कार घडलेला नसतोच तर एक सुवर्ण मध्य सत्य हेच आहे कि ज्याची दिशा योग्य होती तो कुठल्याही सहकार्य शिवाय कुठल्याही मदतीशिवाय फक्त योग्य दिशेच्या विश्वासावरच यशस्वी झाला .हे अंतरीम सत्य आहे म्हणून आपल्या आजूबाजूला काय आहे नाही मागे कोण आहे नाही हे काहीच महत्वाचे मुद्दे नाहीत .तर आपली दिशा योग्य आसण आवश्यक आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक, तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad