Bluepad | Bluepad
Bluepad
वाईट वेळ वाट्याला येण म्हणजे संपणे असं अजिबात नाही
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*वाईट वेळ वाट्याला येणे म्हणजे संपणे असं अजिबात नाही*
निसर्ग चक्र वेळेच्या भोवती फिरत वेळ हि प्रभावी असेल तर सगळं काही सुरळीत असतं.पण वेळ प्रभावी नसली तर मग संकटांची मालिका सरत नाही.वेळेचा प्रतिकुल आणि अनुकुल प्रभाव प्रत्येकाच्या जीवनात अनुभावास येतच असतो .वेळ प्रतिकुल झाली म्हणजे पिछेहाट जरूर होते .पण पिछेहाट होण म्हणजे संपुष्टात येण असं होतं नाही . प्रतिकुल वेळ अनुकूल सुद्धा होऊ शकते पण त्यासाठी काही काळ हा वाईट जाणवतो तो व्यतित करावाच लागतो त्या मध्ये कोणालाही विशेष सुट मिळत नाही. जीवन आणि वेळेचा प्रभाव याला सृष्टी वर कोणीही अपवाद नाही. सृष्टी वर जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाला वेळेच्या प्रभावाला सामोरे जाणेही ही जाणे आहे .मग तो दिग्गज असो कि सर्वसामान्य आयुष्य म्हटलं कि चांगली वाईट वेळ वाट्याला येणार म्हणजे येणारच या मध्ये काही शंका नाही पण वाईट वेळ हि थोडी कठिण असल्याने हि वेळ कोणालाही नकोशी असतेच.वाईट वेळ आली म्हणजे आपण संपलो अथवा हि वेळ आपल्याला संपविण्यासाठी अथवा संपुष्टात आणण्यासाठी आली आहे असं अजिबात नाही.जीवन म्हणजे संघर्ष हे सुत्र समजलं तर मग वाईट वेळ सुद्धा आपलं काही बिघडवु शकत नाही.संघर्ष हे वेळेवर जलिम औषधं असतं . वाईट वेळ संधी घेऊन येते तीच सोन करता आलं पाहिजे पण अनेकदा आपण वाईट वेळेच सोन करण्या ऐवजी राख करतो .आणि वेळेला दोष देतो .दोष हा वेळेचा कधीच नसतो वेळेला आणि काळाला प्रत्येकाकडे जाणच आहे फक्त कोणाकडे कधी जायचं हे वेळेच्या हाती असतं .पण कालचक्र कोणालाही सोडत नाही . फक्त काळाच्या प्रभावात स्वतःला टिकवून ठेवणे आणि खंबीर पणे उभा राहण्याची आवश्यकता असते.आपल्या जीवनात वेळचा प्रभाव कधी निर्माण होऊन त्याचे काही दुष्परिणामही हे आपल्यालाभोगावे लागतात याला कोणीच अपवाद नाही .जो पर्यंत वेळ आणि काळ यांचं पाठबळ आहे तो पर्यंत आपलं सगळं काही पाहिजे तसं घडत पण एकदा का वेळ फिरली कि आपली जशी अपेक्षा आहे त्याच्या उलटं परिणाम येतात आणि आपसुकच हे परिणाम आपल्यासाठी आणि आपल्या जवळपासच्या लोकांसाठी आनंददायी नसतात हे अगदी सत्य आहे.पण अशी वेळ येण अथवा या वेळेचा सामना करावा लागण म्हणजे संपुष्टात येण असं होतं नाही. जीवन म्हणजे अनिश्चिततेचा खेळ असतो . दैनंदिन जीवनात अनेक समस्या गुंतागुंत अडचणी निर्माण होण नैसर्गिक आहे क्रमप्राप्त आहे. त्याच बरोबर आपण ज्या क्षेत्रात ज्या ठिकाणी ज्या उंचीवर आहेत ती जागा उंची कधी कधी संकटात देखिल सापडते याच कारण त्या काळात आपली वेळ हि खराब असते.आपली वेळ खराब असल्याने आपले प्रयत्न यशात परिवर्तित होत नाही.अशा वेळी आपण घाबारून जाण उचित नाही अथवा तणाव घेऊन स्वतःला डिप्रेशन स्थिती पर्यंत घेऊन जाणं हे देखील योग्य नाही.आलेलं वादळ हे कधीच फार काळ थांबत नसत पण या भयाण वादळात आपल्याला फक्त खंबीरपणे उभा रहता आलं पाहिजे.वाईट वेळ असताना आपण प्रयत्न करण्या ऐवजी स्वतःला सावरलं पाहिजे आणि स्वतःला सावरलं कि मग आपोआपच अनुकूल वेळ निर्माण झाली कि आपल्या इच्छेनुसार घडामोडी घडणारच आहेत पण त्यापुर्वी आपण स्वतःला मजबुत ठेवुन उभा राहण आवश्यक असतं . वाईट वेळ हि कायम वास्तव्य करण्यासाठी अजिबात आलेली नसते.वेळेचा प्रभाव जगात कोणालाही टाळता येत नाही पण वेळ व्यवस्थित होण्याची वाट आपण नक्कीच पाहु शकतो आणि ज्या वेळी आपली वेळ आपल्याला अनुकूल असेल तेव्हा जगातील सगळ्या शक्ति आपल्या बाजूने उभा राहातात त्याच बरोबर नैसर्गिक शक्ति सुद्धा आपल्या बाजुने असतात म्हणून चिंता न करता तणाव न घेता आपली वेळ योग्य येई पर्यंत स्वतःला मैदानात खंबीरपणे ठेवता आलं पाहिजे.आणि वाईट वेळेचा प्रभाव दुर होई पर्यंत स्वतःला आध्यत्मिक ज्ञानाच्या छत्री खाली सुरक्षित ठेवता येऊ शकत.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad