Bluepad | Bluepad
Bluepad
आयुष्यात फक्त संस्कारांचा वसा आणि वारसा हाच सर्व श्रेष्ठ ठरतो
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*आयुष्यात फक्त संस्कारांचा वसा आणि वारसा हाच सर्वश्रेष्ठ ठरतो*
आपण जन्माने कोणाचे वारसदार आहेत या पेक्षाही आपण कर्म करताना कोणता वारसा चालवतो आहेत अथवा कोणत्या विचारांचा वसा घेऊन निघालो आहेत यानुसार आपलं मुल्यमापन ठरत असत. संसारातील वारसदार होण्यासाठी मर्यादा असतात पण संस्कारांचा वारसा हा अमर्याद असतो आपण आपल्या पात्रतेनुसार हा वसा आणि वारसा स्वीकारू शकतो. आपण संपत्ती अथवा वंशपरंपरेने कोणाचे वारसदार आहेत या पेक्षाही आपण कोणाचे संस्कार घेऊन मार्गक्रमण करतो हे जीवनात खुप महत्वपूर्ण आहे. आणि हाच वैचारिक संस्कारांचा वसा आणि वारसा चालवता आला पाहिजे. कारण जीवनात संस्कारांचा वसा आणि वारसा हाच सर्वश्रेष्ठ आहे. धन, द्रव्य, संपत्ती याचा वारसदार होण काही कठिण नाही पण संस्कारांचा वारसदार अथवा संस्कारांचा वसा चालवणं हे खुप कठिण असतं. पण हे कठिण कार्य ज्याला जमत तो सर्वसामान्य व्यक्ति नसतो एवढं मात्र निश्चित आहे. मानवी जीवन म्हटलं कि संसार आलाच संसार हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने संसारातील जीवनात काय फल निष्पत्ती होईल. हे आपल्या ज्ञानावर अवलंबून आहे. संसाराचा वारसा हा संपत्ती चा विषय असतो. परंतु संस्काराचा वारसा हा प्रमाणिकता, सत्य, न्याय, सात्विकता, याचा वसा आहे जो पुढे नेतो तो संसारात कृतकृत्य होतो. आपली समाजातील ओळख हि आपल्या कडे असणार्या साधन संपती वरून किंवा आपण धारण करत असलेल्या पदावरून होत असते हे सत्य असलं तरीही पुर्ण सत्य नसुन अर्धसत्य आहे. कारण आपली हि भौतिक ओळख हि खुप क्षणिक अथवा अल्प असा कालावधी साठी असते. म्हणजे जोपर्यंत धनसंपदा आहे किंवा धारण केलेलं पद आहे तोपर्यंतच हि ओळख टिकुन असते. हि संपदा संपुष्टात आली किंवा पद गेलं कि ती निर्माण झालेली ओळख लुप्त होऊन एक खुप मोठी पोकळी निर्माण होते. परंतु संस्कार आणि प्रमाणिकता , सत्य, न्याय याचा वसा आणि वारसा घेऊन निर्माण झालेली ओळख तहयात कायमस्वरूपी व आपल्या हयाती नंतर सुद्धा टिकुन राहते. म्हणजे पिढ्यानपिढ्या जी ओळख कायम टिकुन राहते ती ओळख संस्काराची व प्रमाणिक पणाचा असते. म्हणून सगळ्यात उत्तम मौल्यवान संपत्ती म्हणून संस्काराचा उल्लेख होतो. कुठल्याही संपत्तीने खरेदी करता येत नाही चोरी होत नाही किंवा चोरीला जात नाही ती बाब म्हणजे संस्कार आणि कुणालाही सहजासहजी जपता येणार नाही. किंवा शक्य होणार नाही. असा वसा म्हणजे प्रमाणिकपणा आणि हा वसा व वारस हा सहजासहजी मिळण किंवा मिळवणं शक्य होत नाही. प्रथा , परंपरा ,रूढी याला छेद देऊन फक्त संस्कारा आणि प्रामाणिकता याचा वरसा आणि वसा कोणीही आपल्या गुणवत्तेवर चालवु शकतं यासाठी भौतिक वारस होण्याची आवश्यकता भासत नाही. पिढ्यानपिढ्या चालत आलेली वंश परपंर, धनसंपदा , नातेसंबंध नैसर्गिक नियमानुसार पुढे चालवण म्हणजे आपण याला सर्वसाधारण पणे वारसा असं संबोधतो आणि अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या व्यक्ति आपल्या रक्तं नात्यांच्या बाहेरील व्यक्तिला सुद्धा आपला वारसा हक्क देऊ शकतो पण हा वारसा वैचारिक असुन तो प्रामाणिकता आणि संस्कारांचा असतो . एकंदरीत काय तर जो दाता आहे त्याच्या मतानुसार आपला उत्तराधिकारी म्हणून निवड केली जाते याला आपण वारसा हक्क समजतो. पण याला अपवाद हा आहे कि संस्काराचा वारसा आणि प्रामाणिकपणाचा वसा आपण कोणालाही देऊ शकत नाही. हा वसा आणि वारसा परंपरेनुसार नाही तर गुणवत्तेवर आधारित कोणीही चालवु शकतं. वसा आणि वारसा ह्या जीवनातील सगळ्यात महत्वपूर्ण बाबीआहेत. आपण अनेक नामांकित किंवा सर्वसाधारण लोकांच्या तोंडुन ऐकत असतो मी यांचा वसा आणि वारसा पुढे चालवत आहे किंवा चालवणार आहे. असा नाम उल्लेख होणा-या महान थोर व्यक्तिमत्वांची संख्या अल्प आहे. कारण हा वसा आणि वारसा पाहिजे तेवढा सहज सोपा नसतो. त्यासाठी खुप मोठी तपस्या साधना पुर्ण करावी लागते म्हणून तर संस्कार चा वारसा आणि वसा प्रमाणिक पणचा असतो . सत्याचा , न्यायचा, धर्माचा असतो, आणि यासाठी आर्थिक सदन असण्याची आवश्यकता नाही तर आध्यत्मिक ज्ञानाने आपण किती सदन आहेत त्याची आवश्यकता आहे . म्हणून संस्काराचा वसा आणि प्रमाणिक पणाचा वारसा पुढे चालविण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी आध्यत्मिक दृष्टीने सदन संपन्न असण्याची आवश्यकता आहे. आणि हि संपदा खुप सहज सोपी असल्याने आपण मिळवु शकलो तर जन्म सार्थक झाल्याचं समाधान मात्र नक्कीच आपल्याला मिळु शकत.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301आ

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad