Bluepad | Bluepad
Bluepad
सुशिक्षित माणसं भोंदूगिरीच्या चक्रव्युहात अव्वल स्थानी
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*सुशिक्षित माणसं भोंदूगिरीच्या चक्रव्युहात अव्वल स्थानी*
शिक्षण म्हणजे जीवनातील ज्ञान सुर्य असतो .पण हाच ज्ञान सुर्य आपल्या जीवनात प्रकट होऊन देखिल आयुष्यातील अंधकार जर संपुष्टात नसेल तर मग कठिण आहे. सुशिक्षित म्हणजे ज्ञानी असं साधारणतः आपण समजतो पण सध्या राज्यात जी काही आकडेवारी आणि घटना समोर येत आहेत त्यावरून उच्च शिक्षित सुशिक्षित माणसं हेच भोंदूगिरी च्या चक्रव्युहात अव्वल स्थानी असल्याच स्पष्ट होत आहे.विवेक जागृत ठेवून ज्ञान सदृश, सत्य स्वीकारणारी श्रद्धा असेल तर मनात अंधश्रद्धा निर्माण होत नाही आणि मनात अंधश्रद्धा निर्माण झाली नाही तर मग भोंदूगिरी कडे मन धावत नाही. उलटपक्षी श्रम न करता अथवा प्रयत्न न करता भौतिक साधन संपत्ती मिळावी अथवा जीवनातील काही विशिष्ट समस्या ज्या सार्वजनिक करता येत नाहीत अशा समस्या संपुष्टात याव्यात यासाठी शोधलेला मार्ग भोंदूगिरी कडे घेऊन जातो . सत्य आणि असत्य समजलं पाहिजे. सत्य समजलं आणि विवेक जागृत असेल तर आपण या मार्गावर जाणार नाहीत. अशिक्षित माणसं भोंदूगिरी च्या चक्रव्युहात अडकण स्वभाविक आहे कारण त्यांच्या मध्ये शैक्षणिक अज्ञान असल्याने त्यांची फसगत होणे अथवा प्रसंगानुरूप ते एखाद्या चक्रव्युहात आडकण इथं पर्यंत ठिक आहे. कारण ते बोलून चालून अशिक्षित आहेत अज्ञानी आहेत हा त्यांच्यावर शिक्कामोर्तब आहे.पण सुशिक्षित सज्ञानी माणसं देखिल भोंदूगिरी च्या चक्रव्युहात आडकत आहेत हे दुर्दैव आहे . जीवनात समस्या निर्माण होण नैसर्गिक आहे .अनेक समस्या गुंतागुंत हि आपल्या काही चुकीच्या निर्णयामुळे निर्माण होत असते वेळ निघून गेल्यावर आपल्याला चुका उमजतात आणि मग आपण त्या मधुन आपली सुटका करून घेण्यासाठी आपल ज्ञान वापरण्या ऐवजी भोंदूगिरी वापरतो. आणि त्या मधुन सुटका होण्या ऐवजी जास्तच अडकत जातो व शेवटी आपण भोंदूगिरीचे शिकर ठरतो .जीव , जीवात्मा,संसार समजला तर चुकीच्या घटना घडामोडी घडत नाहीत. सत्य स्वीकारता आलं पाहिजे सत्य स्वीकारलं तर जीवनातील बहुतांश समस्या अडचणी कमी होतात.जीवनाच्या संदर्भात ज्ञान,मोह ,माय,हे सगळं व्यवस्थित पणे समजलं आणि कर्म कर्तव्य जबाबदारी निती, न्याय, धर्म संस्कारा यांचा पालन व्यवस्थित केले तर जीवनातील दुःख हे आपोआप कमी होईल. सृष्टी वर आपल्या मनासारखं काही घडत नसतं अथवा घडणार नाही हे वाक्य व्यवस्थीत समजलं आणि पचवता आलं तर डोक्यात भोंदूगिरी शिरकाव करत नाही . विश्वास संपुष्टात आला आणि आत्मबल कमी झालं कि बुद्धी आपोआप लोप पावतो आणि होश संपुष्टात येतो एकदा होश संपुष्टात येऊन बेहोश झाल्यावर आपण काय करतोय हे आपल्यालाच कळत नाही उलटपक्षी आपण केलेली कृती कशी खरी आणि सत्य आहे हे आपण पटवून देण्यासाठी प्रयत्नाशील असतो .मग आपल्या संपर्कातील इतर अनेक सहकारी सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवून हा मार्ग स्वीकारतात. पण हे सगळं का घडतंय हे महत्वाचं आहे. जीवन विषयक आवश्यक ज्ञान आपण अर्जित केलं पाहिजे. प्रत्येक दुःखाचं मुळ अज्ञान आणि मृगजळ असतं. आत्मा अमर आहे शरिर नश्वर असुन जीवन हे क्षणभंगुर आहे तर मग दुःख कसलं .पण हे कळुन उमजत नाही म्हणून जीव संसारात अडकतो .आणि साक्षीभावाने राहता येत नसल्या कारणाने आपण लोकांना दाखविण्यासाठी अनेक उपद्व्याप करतो त्या मुळे अशा बाबी घडतात.जीवनातील प्रत्येक दुःखावर अडचणींवर ज्ञान हेच सर्वोत्तम औषधं आहे हे औषध आपण वापरत नाही आणि विनाकारण नको तिथे डोकं चालवुन भोंदूगिरी कडे आकर्षित होतो‌. जीवनाची फसगत होऊ नये म्हणून शिक्षण असतं पण शिक्षित माणसं स्वतः हुन स्वतःची फसगत करून घेत आहेत .मग शिक्षण हे वाघीणीचे दुध आपल्या वाट्याला येऊन देखिल आपण कुषोषितच राहत असु तर मग त्याला काही अर्थ नाही . उलटपक्षी आपण अशिक्षित लोकांना या चक्रव्युहातुन बाहेर पडण्यासाठी आपलं योगदान दिलं पाहीजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301सुशि

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad