Bluepad | Bluepad
Bluepad
आवड हि नेहमीच मतलबा भोवती फिरत असते
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*आवड हि नेहमीच मतलबा भोवती फिरत असते*
आवडीचा भाव टिकणयाचा कालावधी ठरवतो .आणि आवडीचा कार्यकारण भाव हा आवड का निर्माण झाली आहे याच मुळ ठरवतो . ज्या पद्धतीने कार्यकारण भाव असेल तितकेच दिवस हि आवड कायम राहिल अथवा टिकेल .कोणाताही प्रकारचा स्वार्थ लाभ,मतलब नसेल तरी देखील आवड निर्माण झाली तर हि आवड तहयात चिरकाल टिकणारी असते .याला शाश्वत सत्य आणि ज्ञान सदृश्य आवड म्हणायला हरकत नाही. पण विद्यमान स्थितीत हिच आवड कालबाह्य होऊन लाभाअंती आवड या क्षणिक संसारातीलआवडीचा बोलबाला सर्वच क्षेत्रात सुसाट आहे. क्षणभंगुर जीवनात कोणीही कोणाचा खासमखास अथवा प्रिय , अप्रिय नसतो .वेळ काळ परस्थिती मतलब या मुळे प्रियत्व खासत्व आणि अप्रियत्व निर्माण होत ज्याच वास्तव दर्शन योग्य वेळी जीवनात प्रत्येकाला घडत पण वळत नसल्याने ते कळत नाही. म्हणून आवडीच्या माध्यमातून जीवनात निर्माण होणारे सगळे स्नेह बंध हे शेवटी येऊन मतलबाच्या महासागरात मिळतात.जितका वेळ मतलब आहे तितकाच वेळ तो स्नेह जीवंत अथवा अस्तित्वात असतो .मतलब संपला स्नेह बंध संपला.हे वास्तव आहे मग त्या स्नेह बंधातील पात्र कोणीही असु द्या. अंतिमतः अभिनय तो पर्यंतच आहे जोपर्यंत मतलब जीवंत आहे . अथवा हित होईल हि अपेक्षा सजीव आहे .मतलब संपला आवड जिव्हाळा संपला हे अगदी खुल वास्तव आहे .जिव्हाळा ,आवड, गोडी हि सहजासहजी आपल्या मनात कोणाविषयी हि निर्माण होत नाही. मग संबंधित व्यक्ती हि परिचित अपरचित पैकी कोणत्याही स्नेह बंधातील असो अथवा नसो आवड हि शेवटी मतलबावर येऊनच स्थिर होते .परमार्थात निस्वार्थ निरपेक्ष भाव हाच आवडीचा निकष असतो.पण या उलट संसारात मात्र आवड हि मतलबा भोवती फिरत असते .आपण कोणाच्या आवडीचे अथवा आपल्या कोण आवडीचा याचा मुख्य निकष काय याचा आपण स्वतःच सखोल विचार करून सुयोग्य पद्धतीने ज्ञान सदृश्य पाहिलं तर आपल्या आवडीनुसार मतलबा हाच केंद्रबिंदू निश्चित होतो.मानवी जीवनात स्नेह बंधाचा जन्म हा मतलबातुनच होत असतो .संसारीक जीवनातील आवडीचा संबंध हा खासकरून मतलबाशी निगडित असतोच . हे अगदी ञिकाल बाधित सत्य आहे पण हे कटु सत्य कोणीही सहजासहजी मान्य करणार नाही अथवा स्वीकारणार नाही.सत्य स्वीकारणं अथवा मान्य करणं हे मानवी स्वभावाच्या विपरीत असल्याने ते पचत नाही. पण सत्य जाणल तर आवड हि मतलबा भोवती फिरत असतेच.आवड म्हणजे आकर्षण गोडी जी नेहमीच मतलबा भोवती फिरत असते .वास्तविक पाहिलं तर आवड हि विना मतलब असली पाहिजे. विना मतलब आवड गोडी परमार्थात असल्याने फार करून कोणालाही परमार्थात फार रूची नाही .संसारात मतबल हिच आवड असल्याकारणाने माणसांच महत्व हे मतलबानुसार ठरत असतं.जितका मतलब मोठा तितकंच महत्त्व तितकीच आवड जितका मतलब छोटा तितकीच आवड देखिल छोटी ठरते .आपण कोणासाठी किती महत्वपूर्ण आहेत अथवा आपल्यासाठी कोण किती महत्वपूर्ण आहे हे मतलबानुसार ठरत असतं पण विना मतलब जर कोणाच्या लेखी आपल्या विषयी आवड असेल तर हिच खरी आणि निस्वार्थ आवड असते श्रद्धा आणि निष्ठा हि निरपेक्ष भाव ठेवून असली पाहिजे आणि हिच अस्था निरपेक्ष असते प्रमाणिक असते .निष्ठा हि मतलबा नुसार ठरते जसा मतलब तशी निष्ठा असते .पण लाभा शिवाय निष्ठा नसते . आपल्याला वरकरणी दिसतं तसं नसतं विना मतलब आवड हि जवळपास दुर्लभ असते. अपवादात्मक परिस्थितीत विना मतलब आकर्षण आवड असते. संसार म्हटल कि मोह, माया , स्वार्थ,आलाच, जीवनात आपला कळत नकळत अनेकांशी संपर्क येत असते.आपले इतरांशी अथवा इतरांचे आपल्याशी निर्माण होणारे स्नेह बंध हे जेव्हा घनिष्ठ अथवा अंत्यंत जवळचे निर्माण होतात असतात पण जेव्हा आपण त्या स्नेह बंध आवडीच मुळ शोधतो त्या वेळी मतलब हाच मुख्य घटक आवडीच्या केंद्रस्थानी असतो. स्वार्थ मोह ,माया हा संसाराचा पाया असल्याने हित जोपासण्यासाठी अथवा हितसंबंधासाठी माणुस आपले स्नेह बंध जोडतो तोडतो , अथवा हितसंबंध मजबूत कमकुवत हे वेळेनुसार करत असतो .वेळ जशी आहे तसे संबंध निर्माण होतात अथवा लोप पावतात. पण वास्तविक ज्ञान सत्य हाच आवडीचा आधार असेल तर हिच आवड शाश्वत तहयात टिकणारी ठरते .पण हि आवड साध्य दुर्लभ आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad