*यश हे कोणालाही आंदण मिळत नाही तर ते खेचुन आणावं लागतं*
यश मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो ते सहजासहजी मिळत नसतं अथवा पदरी पडत नसतं त्या साठी प्रचंड मेहनत, दैदिप्यमान संघर्ष, प्रबळ इच्छाशक्ती, अहोरात्र कार्य करण्याची मानसिकता, ठेवून यश खेचून आणण्यासाठी राणनिती आखली आणि त्या नुसार योग्य पाठपुरावा केला तर निश्चितच यश मिळण्यासाठी काही अडचण राहत नाही. जीवनात कोणालाही यश हे आंदण मिळत नाही तर ते अथांग प्रयत्नांची पराकाष्ठा करून अहोरात्र संघर्ष करून खेचाव लागतं.तस पाहिलं तर जीवन आणि यश हे एक अद्भुत समिकरण आहे . प्रत्येक व्यक्ती जीवनात काही तरी सर्वश्रेष्ठ असं उच्चतम मिळविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतो आणि हे प्रयत्न करत असताना काही जण यशस्वी होतात परंतु बहुतांशी लोकांना अपयशाला सुद्धा सामोरे जावे लागते . अपयश येण अथवा अपयशला सामोरं जावं का लागतं याचं कारण हि तसंच असतं यश हे कधीच कोणालाही आंदण मिळत नसत.तर ते खेचुन आणावं लागतं . मुळात यशासाठी अथवा यशस्वी होण्यासाठी आपल धेय्य हे निश्चित असलं पाहिजे.धेय्य निश्चित असेल तर जवळपास यश निश्चित असतं .पण धेय्य ठरलेलं नसेल तर मग प्रयत्नांचा मार्ग सर कसा होणार आपलं धेय्य हे स्थिर असलं पाहिजे त्यावर इतरांच्या मतांचा प्रभाव होता कामा नये. प्रभाव निर्माण होऊन वांरवार धेय्य बदलल तर मग यश मिळविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होण स्वभाविक आहे. म्हणून धेय्य बदलणे हितकारक ठरत नाही. मुख्यत्वे यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे हे अगोदरच समजणं खुप महत्त्वाचे आहे .लोक आपवाद ,लोक भय ,न बाळगता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते धेय्य हे निश्चित असलं पाहिजे आपण कशासाठी शिक्षण घेत आहेत आणि शिक्षण घेत असताना आपण कशा साठी शिकत आहेत हेच जर आपल्याला महित नसेल तर मग पुढे काय करणार आणि शेवटी आपण कुठे पोहचणार त्या मुळे आपण ज्या ठिकाणाहून प्रवास चालू केला आहे त्याच ठिकाणी निश्चित असं धेय्य फिक्स केलेलं पाहिजे .आपलं धेय्य निश्चित करून अंतिम करताना काही काळ आपल्या अंतर्मनात द्वंद्व देखिल निर्माण होऊ शकत पण जेव्हा आपण पुर्ण पणे जागृत होऊन निर्णय घेऊ तेव्हाच तो निर्णय योग्य ठरेल अन्यथा घाई गडबडीतील निर्णय निष्फळ ठरेल . जीवनात आपल्याला यश हे अपेक्षित असतंच पण व्यक्तिपरत्वे क्षेत्र मात्र वेगवेगळे असणारच या मध्ये काही शंका दुमत नाही.जस अध्यात्म,कला , व्यापार, उद्योग, साहित्य, समाजकारण, राजकारण, खेळ, नौकरी, असे एक ना अनेक वेगवेगळे क्षेत्र आहेत त्या पैकी आपल्याला काय आवडते हे निश्चित करता येणं महत्त्वाचं आहे. आपल्याला जिथं रस स्वारसय आहे. त्यावर मंथन चिंतन करून अंतिम धेय्य निश्चित केले पाहिजे. इतरांच पाहुण अथवा अनुकरण करून आपलं धेय्य निश्चित करू नये .आपलं धेय्य हे आपण आपल्या मर्यादा तपासून व उपलब्ध संसाधने यांचा योग्य ताळमेळ घालून स्वतःच्या मनाची मानसिकता ठाम करून ठरवलं पाहिजे. यश मिळविण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा संघर्ष करण्याची मानसिकता विकसित करून स्वतःला झोकून देऊन कामाला लागलं पाहिजे मग वादळ किती संकट किती हे गौण आहे.आपल्याला कडे कोणत्याही प्रकारची संसधान नसली तरी दैदिप्यमान इच्छा शक्ति आणि संघर्ष या बळावर आपण अशक्यालापण शक्य करू शकतो. अर्जुनाच धेय्य निश्चित होत म्हणून अर्जुना ने खाली पाण्यात पाहुण वर टांगलेल्या माशाचा नेमका डोळा सुद्धा यशस्वी पणे उडवला होता. धेय्य अवघड होत पण धेय्य निश्चित होत म्हणून यश मिळालं त्या साठी हे समजणं अंत्यंत आवश्यक आहे कि ,न्याय,निती, धर्म,अंगीकारून आपण प्रचंड इच्छाशक्ती ने मेहनत घेतली तर जगात अशक्य असे काहीच नाही . जवळपास बहुतांश लोकांच धेय्य हेच निश्चित नसल्या कारणाने अपयशाला सामोरे जावे लागते.आणि म्हणून ज्याला यशस्वी होयच आहे त्याच धेय्य निश्चित असलं पाहिजे तसेच धेय्य निश्चित म्हणजे च यश निश्चित हा यशाचा मंत्र आहे आणि हा मंत्र पराकोटीच्या आत्म बलावर ,विश्वासावर निश्चित केला पाहिजे म्हणजे च हा मंत्र जीवनात ज्यांनी आत्मविश्वासाने अंगीकारला तो यशस्वी होणे निश्चित आहे. म्हणून धेय्य निश्चित तर यश निश्चित हा मंत्र आहे यश आपल्याला कोणीही आंदण म्हणून देणार नाही ते आपल्याला खेचुन आणावं लागतं आणि म्हणून यश खेचण्याची मानसिकता घेऊन कामाला लागलं पाहिजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301