*पोकळ प्रसिद्धी ऐवजी विचारांनी मोठे व्हा*
आयुष्य म्हटलं कि प्रसिद्धीचा हव्यास आलाच पण या हव्यासापासुन स्वतःला अलिप्त ठेवून विचारांची उंची निर्माण करत गगनभरारी घेता आली पाहिजे.आणि पोकळ मोठेपणा ऐवजी स्वतःच्या वैचारिक उंचीने मोठं झालं पाहिजे.माणुस विचाराने मोठा असला पाहिजे पण दुर्दैव असं आहे कि माणसांना विचारा ऐवजी प्रसिद्धी ने मोठं होण्याचा हव्यास लागला आहे .वैचारिक मोठेपणा अथवा विचाराने मोठं व्हावं हि मानसिकता दिवसेंदिवस दुबळी होत चालली असुन भंपकपणा वाढीस लागल्याने भौतिक मोठेपणा सिद्ध करण्यासाठी जो तो धडपडत आहे.प्रसिद्धी मिळाली याचा अर्थ व्यक्ती विचाराने मोठा असेलच असं होत नाही .पण अपवादात्मक परिस्थितीत प्रसिद्धीने मोठा असलेला व्यक्ति विचाराने देखिल मोठा असतो पण हे प्रमाण मात्र अल्प असत. प्रसिद्धी आणि विचाराने मोठा् हा योगायोग जर जुळून आला तर मग मात्र हा योग ज्यांच्या बाबतीत येतो ते एकतर युगपुरुष ठरतात किंवा महापुरुष असतात. प्रसिद्धी हि हल्ली फॅशन झाली आहे .अगदी बालवयापासून ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सगळयांनाचा प्रसिद्धी च्या झोतात राहण्याचा हव्यास असतो .या हाव्यासापासुन स्वतः दुर ठेवण्यात यशस्वी होताना कोणीही दिसत नाही . म्हणून प्रसिद्धी मिळविण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचा धोका पत्करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी संघर्ष करताना प्रत्येक जण दिसतोय याला खूप कमी लोक अपवाद आहेत . यातुन प्रसिद्धी मिळविण्यासाठी जी प्रचंड मोठी स्पर्धा हि सुरू झाली .हि स्पर्धा सुसाट झाली आहे.यासाठी अनेक वेगवेगळ्या करामती करण्याची मानसिकता विकसित होत आहे.या मधुन काही करामती जीवावर बेतत आहेत त्याच बरोबर अनेक वेगवेगळ्या घटना दुर्घटना जन्म घेऊ लागल्या आहेत. जिथं जीवीत धोक्यात घालण्याचा धाडस निर्माण होत यापेक्षा मोठं दुर्दैव काय असावं. ख्याति,किर्ती,यश,महीमा , प्रतिष्ठा, नावलौकिक याला एक जनमानसात झळाळी मिळण याला सर्वसाधारण पणे प्रसिद्धी म्हणता येईल . पण हि प्रसिद्धी मिळण आणि मिळवणं हे वेगळं या मध्ये सुद्धा खूप मोठं अंतर आहे.तसेच नैसर्गिकरीत्या प्रसिद्धी मिळण हा आपल्या कार्याचा प्रयत्नांचा योग्यवेळी झालेला सन्मान असतो.पण व्यसन म्हणून त्या मागे धावण ,अति प्रयत्न करून प्रसिद्धी मिळवण म्हणजे , प्रसिद्धी मिळविण्यासाठी वाटेल तस आचरण करून अथवा प्रसिद्ध होण हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र प्रयत्न करणं हे वेगळं आहे. सध्या च्या विद्यमान युगात प्रसिद्धी ची स्पर्धा लागली आहे .आणि स्पर्धेत टिकण्यासाठी निति,नियम , तत्व , नैतिकता सगळं वार्यावर सोडुन स्वाभिमान ,अभिमान गहण ठेवून बहुतांश लोक सुसाट धावतायत हे अंधाधुंद धावण कुठेतरी थांबायला आणि प्रसिद्धी चा हा जो काही नवीन आजार सामाजिक पातळीवर येऊ घातला आहे तो रोखण्यासाठी विचाराने मोठे व्हा आणि स्वतःला अंहकार मुक्त ठेवा . इतरांनी आपल्याला मोठं म्हणावं या मध्ये नेमका मोठेपणा काय आहे. आणि मग त्या एका शब्दासाठी वाक्य साठी रात्र दिवस सुसाट वेगाने सुटणं हे आपण आजकाल समाजात जे सर्रासपणे पाहतोय .ते चिंताजनक आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी मेहनत करण प्रयत्न करून सातत्य टिकवून ठेवणं या मध्ये गैर असं काहीच नाही.अनेक प्रयत्न करून सुद्धा नैसर्गिक प्रसिद्धी हि वेळकाळ परस्थिती नुसारच मिळत असतेच . जसं समुद्रातील लाट एकदा उसळली कि सर्वोच्च शिखर गाठते व शेवटी संपुष्टात येते .तसंच काहीसं प्रसिद्धीच देखिल असतं म्हणून केवळ आणि केवळ प्रसिद्धी ने मोठा असलेल्या व्यक्ती चा मोठेपणा हा तहयात टिकेलच असं नाही महापुरुष अथवा युग पुरुष यांचा मात्र या बाबतीत अपवाद असु शकतो.याला कारण हि तसंच आहे जर प्रसिद्धी सोबत विचाराने संस्काराने व्यक्ति मोठा झाला तर ती प्रसिद्धी तहयात टिकुन राहते.कोणत्याही क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण तसं पाहिलं तर अवघड नाही.पण काही लोकांना मात्र नैसर्गिकरीत्या मिळते .तर काहींना अनंत अशा नानाविध प्रयत्ना नंतर मिळते . आणि म्हणूनच प्रसिद्धी मिळाली म्हणून माणुस मोठा होतो हे अर्धसत्य आहे. या मध्ये काही दुमत नाही पण प्रसिद्धी ने जो मोठा झाला त्याच्याकडं विचारांची उंची असली पाहिजे तर तो लोक उपयोगी लोक कल्याणकारी ठरतो . प्रसिद्धि ने भले तुम्ही अगदी छोटे , लहान असा परंतु विचाराने मोठे असले पाहिजे . तेव्हा आपला उपयोग आपलं जीवन सार्थकी लावण्यासाठी आणि समाजा हितासाठी निश्चित होतो .
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301