Bluepad | Bluepad
Bluepad
पाश्चिमात्य करण स्वीकरताना आपले संस्कार केंद्रस्थानी असले पाहिजेत
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*पश्चिमात्यकरण स्वीकारताना आपले संस्कार केंद्रस्थानी असले पाहिजेत*
पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रचंड मोठा प्रभाव आपल्यावर पडतोय हे वास्तव आहे पण यातील काही बाबींचा स्वीकार करताना आपले संस्कार मात्र केंद्रस्थानी ठेवता आले पाहिजे.जग नक्कीच बदलतंय त्या मुळे कहि बदल स्वीकारणं हे आपल्यासाठी अपरिहार्य आहे. मात्र अपरिहार्य बदल स्वीकारताना आपले संस्कार हे केंद्रस्थानी ठेवता आले तर पाश्चिमात्य करण आपल्याला फार काही प्रभावित करू शकत नाही. आधुनिकता स्वीकारताना आपले संस्कार पायदळी तुडवले जाणार नाहीत याची काळजी दक्षता घेणं आवश्यक आहे.आधुनिकतेच्या नावाखाली सध्या ची तरूण पिढी खुप झपाट्याने बदलत आहे हे सत्य नाकारता येणार नाही .याला सोशल नेटवर्कच ब-यापैकी जबाबदार आहे .पण याचा पहिला आघात हा समाज व्यवस्थेचा पाया आधारस्तंभ असणार्या धर्म संस्कार वर होत आहे . आणि या सगळ्या घडामोडी मध्ये फल निष्पत्ती काय तर सरतेशेवटी येणारे परिणाम हे संबंधीतांना व शेवटी समाजाला आत्मचिंतन करायला लावणारे असतात .आधुनिकता नक्कीच स्वीकारा या मध्ये काळानुरूप स्वीकार करणं तसं आवश्यक असतं .परंतु कुठपर्यंत स्वीकारा कारायचा याला निश्चित एका मर्यादा आहे. आणि ती मर्यादा म्हणजे जिथं पर्यंत आपल्या धर्म संस्काराचा उलंखघन होणार नाही. पायमल्ली होणार नाही.किंवा धर्म संस्कार पायदळी तुडवले जाणार नाहीत. तिथपर्यंत आधुनिकतेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी कुटुंब अथवा समाज यापैकी कोणालाही अडचण नाही . अथवा हरकत नसते.परंतु सध्याच्या परिस्थितीत आधुनिकतेच्या नावाखाली धर्म संस्कार पायदळी तुडवून उलंखघन करून झालेले प्रकार आपण सामाजिक वातावरणात पाहतोय .आणि त्याची फलनिष्पत्ती पण आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय .हे पाहिल्यावर मग मात्र प्रश्न पडतो कि आपण कुठे चाललो आहेत. यावर मंथन चिंतन करण्याची वेळ हि नक्कीच आली आहे .आपल्या आजूबाजूला अनेक अप्रिय घटना घडामोडी घडत आहेत. ह्या घटना घडामोडी सर्वसाधारण नाहीत . ज्या घटना मधुन व्यक्तिगत नुकसान तर होतंच पण कुटुबांच आणि समाजाचा देखिल नुकसान खुप मोठे होते .या घटनांना आपण सध्या जरी अपवाद असलो तरी भविष्यात याच लोन आपल्या दारापर्यंत येणार नाही याची शाश्वती खात्री कोणीही अधिकृतपणे देऊ शकत नाही.कारण आज जो सुपात आहे तो उद्या जात्यात असतो. म्हणून इतरांकडे पाहताना आपल्या वर अशी परिस्थिती ओढावु शकते . म्हणून प्रत्येकाने सजग आणि सावध होण्याची आवश्यकता आहे. आपण नेमकं कुठं कमी पडलो आहोत कि आजकाल आधुनिकतेच्या गोंडस नावाखाली मुलं मुली रातोरात नवीन विश्व निर्माण करत आहेत . आणि निर्माण झालेलं हे विश्व अल्पावधीतच नाहिस पण होत . आणि मग उरतो तो पश्चात्ताप पण या सगळ्या मध्ये महत्वाची बाब हि आहे कि धर्म संस्कार आणि जीवनमूल्ये यांची जपणूक एवढी पोकळ झाली आहे का कि त्याच एवढ्या सहज उल्लंघन व्हावं . आपल्या आजुबाजूला किंवा आपल्या ओळखीच्या कोणी चुकीचे आचरण केले तर आपण पुर्व लक्षी प्रभावाने त्याच अनुकरण करतो. संस्कार हिन कार्याचे जणुकाही आपल्यला वंशपरंपरागत अधिकार प्राप्त आहेत .असंच काहीसं आपल्यला वाटत असतं आणि त्याने केले मी पण केले पाहिजे.हा न्युनगंड तिथपर्यंत कधी आपल्याला घेऊन जातो हे कळत पण नाही .मग मी कुठे कमी आहे या पोकळ भावनेतून आपण सुद्धा तसंच कार्य करतो .परंतु जेव्हा विषय संस्कार व आचरणाचा असतो . तेव्हा मात्र आपण दुरवरूनच फाटा मारतो . म्हणजे चांगली गोष्ट चांगली सवय सहजासहजी आपण स्वीकारत नाही .आणि वाईट किती लवकर झटपट स्वीकारतो .एकंदरीत काय तर कुठल्याही नाते संबंधाला नैतिकतेचा आधार आणि धर्म संस्काराचा पाया असला पाहिजे. तेव्हा ते नाते संबंध टिकतील . किंवा वृध्दींगत होतील .अन्यथा जेवढ्या लवकर नातेसंबंध निर्माण झाले तेवढ्याच लवकर ते संपुष्टात देखिल येतिल .महणुन आधुनिकतेच्या नावाखाली धर्म संस्कारला पायदळी तुडवून पुढे जाता कामा नये. धर्म ,कुल , मर्यादा पालन करण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत अथवा मुल्यावर अमिषाला बळी न पडता भौतिक संसाधनांच्या आहारी न जाता आपले धर्म संस्कार उलंखघन होणार नाही. याची दक्षता सध्या च्या तरूण पिढी सोबत समाजातील प्रत्येका घटकाने घेणे आवश्यक आहे . तसेच या बाबींकडे गांभीर्य ने लक्ष देऊन धर्म संस्काराच महत्व तरूण पिढीला समजावलं पाहिजे. जेणेकरून भविष्यात असे अनर्थ होणार नाहीत.आणि यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची आवश्यकता आहे. बदल स्वीकारणं गैर नाही पण केंद्रस्थानी आपले आपले संस्कार हे असलेच पाहिजेत.
*गणेश खाडे*
‌ ‌‌ ‌ *विचारवंत साहित्यिक लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य*,9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad