Bluepad | Bluepad
Bluepad
तारूण्यात अपमान पचवायला शिका जीवनाचा उत्कर्ष घडेल
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*तारूण्यात अपमान पचवायला शिका जीवनाचा उत्कर्ष घडेल*
भावी आयुष्याचा पाया हा तारूण्यात रचला जात असल्याने आयुष्यातील निर्णायक घडामोडी ह्या तरूण वयातच घडत असतात.म्हणुन तारूण्य हे घडण्याचे अथवा बिघडण्याचे केंद्रस्थान असल्यामुळे तारुण्य हे दिशादर्शक व निर्णायक असत.जीवनात अपमानित होण्याची वेळ आली तर घाबरून जाण्याची अथवा तणाव घेण्याची आवश्यकता मुळीच नाही.अपमान सकारात्मक घेतला तर कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आणि नकारात्मक घेतला तर अहित होणं जवळपास निश्चित आहे. तारूण्य आणि संयम हा अपवादात्मक परिस्थितीत एकत्र आढळतो .पण तारूण्यात संयम आवगत झाला आणि अपमान सहजासहजी पचवता आलातर जीवनाचा उत्कर्ष होण्या पासुन कोणतीही शक्ती आपल्याला दुर ठेवु शकणार नाही. ऐन तारुण्यात अपमान पचवायला शिकलं पाहिजे. पण दुर्दैवाने असं असं होतं नाही तरूण वयात रक्त हे सळसळत असतं . आणि अनुभव व आध्यत्मिक ज्ञान याचा अभाव असल्याने किरकोळ प्रसंगावरून सुद्धा क्षणात राग येतो. आणि हा राग क्षणात उग्र रूप धारण करून आपल्या हातुन नको ते कार्य घडवतो.पण याच वयात आयुष्य घडत असल्याने रागाच्या अनुषंगाने काही चुका हातुन घडतात.आणि त्याचा परिणाम आपल्या भावी जीवनावर होतो . म्हणून आपण अपमान पचवायला शिकलो तर आपल्या जीवनात उत्कर्ष निश्चितच झाल्या खेरीज राहणार नाही.काळ आणि वेळ बदलतेय तसं तसं दिवसेंदिवस लिनता विनम्रता हे गुण लुप्त होत चालल्याने अपमान पचवण्याच सामर्थ्य सध्याच्या तरूण पिढीकडे कमी प्रमाणात दिसत आहे.आणि त्याचे परिणाम पण आपण कौटुंबिक, सामाजिक तसंच सार्वजनिक पातळीवर अनुभवतोय .स्वतःच्या पायावर उभा राहण्यापर्यंत आपण कोणाच्या तरी अज्ञेत असणं अथवा राहण हे जीवनातील कल्याणासाठी खुप आवश्यक असतं .पण सध्या अगदी लहान पणा पासुन स्वतःला श्रेष्ठ समजण्याची मानसिकता विकसित होत असल्याने अज्ञाधारकपणा हा जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.जीवन उत्कर्ष होण्यासाठी खास करून तारूण्यात तर अज्ञाधारक असणं खुप महत्वाचं असतं .पण हल्ली जसं जसं पाश्चात्य संस्कृतीची मुळ घट्ट होऊन आपली संस्कृती आणि संस्कार कमकुवत होत आहेत. तशी तशी अज्ञाधारकता कमी होत चालली असुन आपणच खुप हुशार ज्ञानी आहेत हि भावना वाढीस लागली असुन त्याच पद्धतीने मार्गक्रमण चालू असल्याने अगदी बाल्य अवस्थेपासुन दिशाहीन पिढीच्या निर्माणाला सुरुवात झाली आहे का ? हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. सध्य स्थिती मध्ये,हि समस्या कौटुंबिक पातळीवर आणि सामजिक पातळीवर उग्र रूप धारण करताना दिसत आहे. पण हे वेळीच नियंत्रित झालं नाही तर याचे दिर्घ कालिन परिणाम खुपचं घातक येतील हे मात्र निश्चित आहे. अज्ञानाधारक पणा आणि अपमान पचवण्याची क्षमता मात्र कमी झाली हे तर वास्तव आहे.जीवन म्हटलं कि मान ,सन्मान अपमान हा वाट्याला येणारच मान, सन्मान हा नेहमीच सुखद सुखकारक अनुभवदायी असतो .पण अपमान हा नेहमी वेदनादायक असल्याने तो पचणी पडण जड जात पण ज्याने अपमान पचवला त्याचा उत्कर्ष निश्चित आहे. वय कोणतही असो मान ,सन्मान पचवता येतो पण अपमान हा सहजासहजी पचनी पडत नाही आणि त्यातलित्यात तरूण वयात तर अपमान पचवणं खुप कठिण असतं .पण तारूण्यात अपमान पचवता आला तर उज्ज्वल भविष्य निश्चित आहे.घडण्याच्या वयात अपमान पचवायला शिका उज्ज्वल भविष्य आपलं स्वागत करण्यासाठी वाट पाहतय घडण आणि बिघडण्याच जे वय असतं ते आयुष्यातील निर्णायक वळण असतं.आणि याच वळणावर आपण ज्या पद्धतीने आचरण ठेवु अथवा स्वतःवर नियंत्रण स्थापित करू त्यानुसारच आपल्या भविष्यातील वाटचाल ठरते . आधुनिक चंगळवाद आणि विदेशी संस्कृतीचा प्रभाव वाढत असताना संयमाची कमी जाणवतं आहे आणि बाल वयातील मुलां पासुन अगदी तरूण्याच्या उंबरठ्यावर असणारी युवा पिढी खुपचं शीघ्र कोपी म्हणजे प्रचंड राग धारण कारणारी असल्याने खुप मोठी समस्या कौटुंबिक व सामाजिक पातळीवर निर्माण झाली आहे. तारूण्यात अपमान पचवायला शिकण्यासाठी आपल्या जीवनात अध्यात्मिक वृत्ती जोपासली गेली पाहिजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक, तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301‌

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad