अनमोल उर्जा क्षुल्लक फिजुल गोष्टींवर खर्च करण्यासाठी नाही
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023
Share
*अनमोल उर्जा क्षुल्लक ,फिजुल गोष्टींवर खर्च करण्यासाठी नाही*
उर्जा हि जीवनातील अनमोल शक्ति असुन आपण हि शक्ति ज्या पद्धतीने वापरतो तया प्रमाणेच परिणाम आपल्याला अनुभवायला मिळत असतात. उर्जेचा वापर आपण कसा करतोय यावर बरंच काही अवलंबून असत. योग्य वापर उचित परिणाम अयोग्य वापर अनुचित परिणाम हे जवळपास निश्चित सुत्र आहे. दैनंदिन जीवनात आपली उर्जा हि क्षुल्लक कारणासाठी खर्च होऊन आपल नुकसान होणार नाही याची काळजी दक्षता घेतली गेलीच पाहिजे. त्यासाठी आपला विवेक हा सदैव सचेत आणि जागृत ठेवलाच पाहिजे. मुख्यत्वे उत्कृष्ट आणि सर्व श्रेष्ठ कार्यावर आपली उर्जा खर्च होण अपेक्षित असते जेणेकरून जीवनाचा उत्कर्ष होईल .पण आपण अंहकाराच्या चक्रव्युहात अडकतो व आपली उर्जा नाहक नको तिथे खर्च करून आपलं नुकसान करून घेतो . वेळ काळ प्रसंग समजला पाहिजे आणि तो समजला नाही तर मग मात्र आपण नको तिथे आपला विवादात पडतो . जीवनातील कोणत्या टप्प्यावर कोणाच्या आणि कशासाठी नादी लागयच हे अगोदर समजलं पाहिजे. धक्काधकी च्या जीवनात वादाच कारण क्षुल्लक नसलं पाहिजे .क्षुल्लक कारणासाठी वाद घालुन आपली उर्जा व्यर्थ घालवण हे कधीच परवडणार नसतं .आपल्याला जीवनात मिळालेली उर्जा हि आयुष्याला योग्य दिशा देऊन सर्वोच्च यशोशिखरावर गाठण्यासाठीच असते .याची जाणीव ठेवली तर आपला मार्ग चुकत नाही. आपण यशाच्या मार्गावर दिशेने मार्गस्थ असताना अनेक छोटे-मोठे गतिरोधक येण हे स्वभाविक आहे.पण हे सर्व गतीरोधक पार करताना आपण आपली विनम्रता वापरून मार्ग काढण आवश्यक आहे.मान, अपमान ,सन्मान हि जीवनातील गौण बाब असते .आपलं मन आणि अंतःकरण उदार असलं पाहिजे. जेणेकरून किरकोळ कारणावरून संघर्ष करण अथवा वाद विकोपाला घेऊन जाणं हे कधीच लाभदायी ठरत नाही.म्हणून आपल्या शरिरातील उर्जा हि सर्व श्रेष्ठ उत्कृष्ट अशा बाबींवर खर्च करून त्या अनुषंगाने सुयोग्य परिणाम काढण्यासाठी मिळालेली अद्भुत शक्ती असते .हि शक्ती आपण ज्या पद्धतीने वापरतो त्या पद्धतीने त्याचे परिणाम आपल्याला अनुभवायला येत असतात.मुळात उर्जा हि शक्ती असुन हि शक्ती लोक हितार्थ अथवा स्व हितार्थ ठरली पाहिजे. आपली उर्जा हि व्यर्थ अथवा फिजुल गोष्टीवर खर्च करण अजिबात व्यवहार्य नसतं पण आपला अंहकार अडावा येतो.आणि आपण नको तिथे नको तितक डोकं लावतो .आपली उर्जा हि सर्व श्रेष्ठ कार्यावर खर्च झाली तर त्याची फलनिष्पत्ती देखिल ऐतिहासिक होत असते.हे उमजलं नाही तर मग मात्र चिल्लर चिल्लर बाबींवर उर्जा व्यर्थ खर्च करून आपण आपलं व्यक्तिमत्त्व सुद्धा त्याच पद्धतीचे घडवतो .दैनंदिन जीवनात असे काही छोटे छोटे प्रसंग येत असतात ज्यामुळे आपल्याला मान सन्मान, अथवा आपमान या पैकी एकाला सामोरे हे जावेच लागते .पण त्या मध्ये आपलं असं काही मोठं हित अथवा उत्कर्ष अजिबात नसतो तरी देखील आपण नादी लागतो छोट्या गोष्टी अथवा बाबींसाठी स्वतःची अनमोल उर्जा खर्च करण हे कधीच हितकारक लाभदायी ठरत नाही.हे अगदी वास्तव आहे सत्य आहे पण उत्कर्ष आपल्या खुणवत नाही म्हणून हे सत्य उमजत नाही. जीवन म्हटलं कि वेगवेगळे प्रसंग तर नक्कीच येणार पण आपण कोणत्या प्रसंगासाठी आपली किती उर्जा खर्च करतो त्यानुसारच आपल व्यक्तिमत्त्व हे ठरत असतं.आयुष्यातील धेय्य हे उच्च असलं पाहिजे.लहान साहान बाबींवर आपली उर्जा खर्च करून आयुष्य निरर्थक करणं हितकारक ठरत नाही.छोट्या छोट्या कारणांसाठी ताण तणाव निर्माण होत असतात त्यासाठी वाद विवाद करून आपली उर्जा व्यर्थ खर्च करण्या ऐवजी त्या ठिकाणी आपण आपली वैचारिक प्रगल्भता दाखवणं हितवाह असतं . उर्जा खर्च करण्यासाठी आपल्या समोर लक्ष्य कसं आहे हे खुप महत्वाचं आहे. दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या पातळीवर अथवा टप्यावर अनेक बाबी कारण नसताना देखील आपल्याशी संघर्षाच्या भुमिका येत असतात. पण संघर्ष अथवा वाद विवाद कोठे घालायचा आणि कोठे नाही घालायचा हे समजणं खूप गरजेचं आहे. हल्ली संयम कमी झाल्याने अनेकदा आपण नको तिथे वादाच्या भोवऱ्यात अडकतो आणि आपली उर्जा व्यर्थ खर्च करून आपला अमुल्य वेळ वाया घालवतो आणि वेळ निघून गेल्यावर मग त्याचे परिणाम भोगुन झाल्यावर आपल्याला हे उमजत पण नंतर उमजून काही अर्थ नाही नंतरच उमजन हे व्यर्थ आहे म्हणून योग्य वेळी योग्य कार्यसिद्धी करण्यासाठी आपली उर्जा कारणी लागली पाहिजे.
*गणेश खाडे*.
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301
0
Share
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य