*जीवनातील दुःखाचं मृगजळ कमी करण्यासाठी स्थितप्रज्ञ साक्षी भाव महत्वाचा*
जीवनातील बहु दुःखाचं मृगजळ कमी करून सुखाचा अनुभव घेयचा असेल तर स्थितप्रज्ञ साक्षीभाव निर्माण झाला पाहिजे.जीवनाचं हित कल्याण व्हावं असं वाटतं असेल तर स्थितप्रज्ञ अवस्था हि प्राप्त करता आलीच पाहिजे.भौतिक अथवा उपभोग वस्तू हे व्यसन आहे त्याचा जितका जास्त विचार आपण करू तितकीच जास्त मनात आसक्ती निर्माण होण स्वभाविक आहे . त्याचा परिणाम म्हणून वासना हि अधिक अधिक उग्र रूप धारण करणारच मग आपसुकपणे क्रोधाचा जन्म होण नैसर्गिक आहे. क्रोध जन्माला आला कि मोह साथीदार होणारच मोह उत्पन्न झाला कि स्मृती नष्ट होण निश्चित आहे. एकदा स्मृती नष्ट झाली कि विवेक आपोआप संपुष्टात येईल मग आपल्या हातुन काय घडेल हे आपल्याला कळणार देखिल नाही. हि अवस्था म्हणजे नाश असुन या पासून आपला बचाव व्हावा असं वाटतं असेल आणि जीवनाचा नाश होऊ देयचा नसेल तर स्थितप्रज्ञ रहता आलं पाहिजे. शरीर हे नश्वर असुन आत्मा अमर आहे पण हे सगळं ज्ञात असुन देखील उमजत नसल्याने संसारात बहु दुःखाच मृगजळ निर्माण होत. कारण आपण सृष्टीवर पाहुणे आहेत हे समजलं कि दुःखांचा प्रभाव आपोआप संपुष्टात येतो पण हे कळुन देखिल मन हे वास्तव स्वीकारत नाही.जीवन म्हटलं कि संसारीक दुःख हे आलेच हि दुःख टाळता येणं जवळपास अनिश्चित असत. पण याच संसारीक दुःखांचा प्रभाव मात्र निश्चितच कमी करता येऊ शकतो. आत्मा स्वरूप जीवन जगणं म्हणजे अध्यात्मिक ज्ञान अवगत करून जीवनात त्याचा कृतिशील योग्य वापर करणं व शरिर स्वरूप जगणं म्हणजे अध्यात्मिक ज्ञान समजन पण कृती मध्ये मात्र न उतरण म्हणजे शरिर स्वरूप जगणं आणि सगळी दुःख हे शरिर स्वरूप जगण्यामुळेच निर्माण होतात . त्यामुळे आपली जीवनाविषयी नेमकी संकल्पना काय आहे यावर आपल्या जीवनातील अनेक बाबी अवलंबून असतात . आणि आपण त्या प्रकट कशा पद्धतीने करतो यावर त्याचे परिणाम आपल्याला दिसत असतात . जीवन म्हटलं कि दुःखांचा समुद्र पण तो तरूण जाण्यासाठी आपण सृष्टीवर पाहुणे आहेत याची जाणीव ठेवून मार्गक्रमण करता आलं पाहिजे.
वास्तविक अंतिम सत्य जाणता आलं पाहिजे त्यांचं बरोबर अध्यात्मिक ज्ञान समजलं नाही तर आपण मग भौतिक वस्तू यांना सत्य माणुन जीवन जगतो विज्ञान आधारीत भौतिक संसार करत असताना आपण अनेक अशा वेगवेगळया वस्तू भौतिक सुविधा, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे नाते संबंध आणि त्या अनुषंगाने निर्माण होणा-या वेगवेगळ्या समस्या अडचणी यामुळे आपल्या जीवनात नहक कित्येक दुःख निर्माण करतो . म्हणून आपल्याला जीवनात साक्षी भाव बाळगाता आला पाहिजे. हेच जीवनातील सगळ्यात मोठं यश आहे . सुख दुःख , फायदा, तोटा ,याचा समप्रमाणात विचार करणे तसेच मुलंबाळं , कुटुंब , नातेसंबंध ह्या सगळ्यात वावरत असताना जबाबदारी कर्तव्य आणि कर्म भाव ठेवून साक्षी भाव ठेवता आला पाहिजे म्हणजे दुःख निर्माण होऊच शकत नाही. आपण आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडली पाहिजेत परंतु हे पार पाडत असताना निसर्गाचे संविधान आणि अंतिम सत्य याची जाणीव जागृती ठेवली तर साक्षी भाव आपोआप तयार होईल . आणि नाहक दुःखाची निर्मिती होणार नाही.
आपण दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे व्याप वाढवते याच मुख्य कारण हेच आहे कि आपल्यला सुख समाधान आनंद शांती मिळाली पाहिजे. एवढीच अपेक्षा असते .पण हे सगळे व्याप वाढवले तरी आपण खरया अर्थाने सुखी समाधानी होतो का? तर नाही होत आणि का होत नाही तर आपल्याला साक्षी भाव निर्माण करता येत नाही अथवा साक्षी भावाने जगता आलं पाहिजे.आपण कितीही भौतिक व्याप वाढवले , साधन संपत्ती मिळवली तरी समाधान मात्र मिळत नाही .कारण सांसारिक जीवनातील सुख समाधान आनंद हा अशाश्वत आहे म्हणजे संसारीक जीवनात वेगवेगळ्या कारणांमुळे आनंद मिळतो हा भास असतो आणि आपण भासाला भुलतो . त्यामुळे कुठल्याही कारणाने मिळणारा आनंद समाधान हे क्षणिक असत. कारण ती वस्तू ते कारण या मध्ये काही अडचण निर्माण झाली किंवा ते संपुष्टात आले ,तर त्या माध्यमातून निर्माण झालेला आनंद समाधान देखिल क्षणिक असल्याने संपुष्टात येणार ठरत .म्हणून भौतिक स्वरूपाच्या वस्तू रूपातुन मिळणार समाधान हे पण भौतिकच असतं . म्हणून मग शाश्वत वास्तविक समाधान आनंद कशा मध्ये आहे हे समजलं कि आपण जीवनात साक्षीभावाने जगतो . म्हणजे निसर्गातील घडणारी प्रत्येक घटना हे निसर्गाच्या लिखित संविधानानुसार घडते .आपली इच्छा असली किंवा नसली तरी पण आपण त्या मध्ये काही बदल करू शकत नाहीत . तसेच बदल करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त नाही . निसर्गाने तो अधिकार त्याच्या कडे ठेवलेला आहे पण आपण हे मान्य करत नाही . म्हणून दुःखाची निर्मिती होते पण हे खरंच दुःख असतं का?आणि म्हणूनच मग आपण नेमकं दुःख कशाच आणि का बाळगतो हाच मुख्य प्रश्न आहे . सगळ्यात महत्वाचे कारण हेच आहे कि जीवन आणि संसार याच्या प्रति आपल्यला साक्षी भावाने वागता आलं पाहिजे. हेच जीवनातील सगळ्यात महत्वाचे ज्ञान आहे . आणि नेमकं हेच आपल्याला जमत नाही आपली मुख्य अडचण हिच आहे . आपल्याला सदैव सुखी ,समाधान ,आनंद, राहयाच असेल तर जीवना प्रति आपल्यला साक्षी भावाने जगता वागता आलं पाहिजे. आणि आपण ह्या सृष्टीवर पाहुणे आहेत याची जाणीव ठेवून मार्गक्रमण करता आलं पाहिजे दुःखाची धार आपोआपच बोथट होईल.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301