Bluepad | Bluepad
Bluepad
शिक्षणाची तपश्चर्या भंग झाली तर भविष्य उध्वस्त होण निश्चित आहे
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*शिक्षणाची तपश्चर्या भंग झाली तर भविष्य उध्वस्त होण निश्चित आहे*
शिक्षण हि तपश्चर्या असुन हि तपश्चर्या भंग झाली नाही तर आपला उत्कर्ष निश्चित आहे.शिक्षण हेच जीवनातील उत्थानासाठीच प्रभावी माध्यम आहे.आपल जीवन उत्थान करायचं असेल तर शिक्षणाच महत्व पण त्याच पद्धतीने समजलं पाहिजे.शैक्षणिक कालखंडात आपण अभ्यासावर योग्य पद्धतीने काळजी पुर्वक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. त्याच बरोबर आपण इतर कोणत्याही चक्रव्युहात अडकलो नाही पाहिजेत. तरच मग आपल्याला शिक्षणातुन योग्य असे परिणाम प्राप्त होतील आणि हेच सुयोग्य परिणाम यावेत यासाठी शिक्षणाला तपश्चर्या समजुन अभ्यास करा. आणि हि तपश्चर्या भंग होणार नाही एवढी दक्षता घेणं गरजेचं आहे.आपण कशाला काय समजतो हा आपला जरी व्यक्तिगत विषय असला तरी पण आपण ज्या शिक्षणाकडे वाघिणीचे दूध म्हणून पाहतो ते शिक्षण हि एक कठिण आणि घनघोर तपश्चर्या आहे .हि तपश्चर्या यशस्वी झाली तर जीवनाचं कल्याण होण निश्चित आहे .आणि भंग झाली तर मग पुढे जीवनाचं काही खरं नाही म्हणून योग्य वेळी योग्य पद्धतीने आपणं आपला वेळ सार्थकी लावुन आपली तपश्चर्या यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे.जेणेकरून पश्चात्ताप करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.आपण शिक्षण घेताना एक इच्छित धेय्य ठेवुन अभ्यास करत असतो हेच इच्छित धेय्य प्राप्ती करण्यासाठी समर्पित भावनेने अभ्यास केला पाहिजे. आणि शैक्षणिक कालखंडात आपली शिक्षणाची तपश्चर्या हि कोणत्याही परिस्थितीत भंग होणार नाही . याबाबत आपण जागृत सचेत असलं पाहिजे .कारण यावरच आपलं यश अपयश ठरत असतं शिक्षण हि साधना तपश्चर्या समजुन प्रयत्न करणं गरजेचं असुन शैक्षणिक कालखंडात आपण खुप काळजी पुर्वक आणि दक्ष राहुन आचरण करण्याची आवश्यकता आहे .जेणेकरून आपलं भविष्य उज्ज्वल होईल आणि याचं शैक्षणिक कालखंडात जर आपली दिशा चुकली तर मग मात्र आयुष्यभर आपली दशा झाली म्हणून समजा . हि तपश्चर्या यशस्वी झाली तर कल्याण होण्यापासून कोणीही आपल्याला वंचित ठेवु शकणार नाही.आणि भंग झाली तर मग भविष्य उध्वस्त होण जवळपास निश्चित असतं.आपण शालेय जीवनात शिक्षण घेत असताना त्या कडे कसं पाहतोय हे खुप महत्वपूर्ण असत.आपला शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या यशाची दिशा ठरवतो . मुळात आपण शिक्षणाच्या विषयावर किती गंभीर आहेत हे महत्वाचं आहे.जीवनाच कल्याण व्हावं हित व्हावं असं जर आपल्याला मनोमन वाटतं असेल तर आपण चुकुन सुद्धा शैक्षणिक कालखंडात शिक्षण हि तपश्चर्या भंग होईल असं कृत्य गैरकृत्य करणार नाहीत. अथवा त्या दिशेने त्या मार्गावर आपलं पाऊल पडणार नाही.शिक्षण हे जीवन उत्थानाच प्रभावी माध्यम आहे. त्याचा योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे.शैक्षणिक कालखंडात खुप दक्ष आणि जागृत राहण्याची आवश्यकता असते .जेणेकरून अभ्यास करताना आपलं लक्ष विचलित होणार नाही .त्याच बरोबर अभ्यास सोडून इतर कोणाताही विचार अथवा विषय आपल्या मनात घर करून त्याच रूद्र रूप धारण होऊन आपण आपल्या मुख्य उद्देशापासुन दुरावले जाणार नाहीत. शैक्षणिक वय हे जीवनातील निर्णायक वळण असतं घडण आणि बिघडण हे याचं काळातील साध्य असतं .याच कालखंडात तारूण्याला बाहार येत असल्याने हा बहर हा सगळ्यात मोठा धोका आहे .हाच धोका व्यवस्थितपणे पार करता आला पाहिजे .हा धोका टाळला तर आयुष्य कल्याणकारी संधी देत आणि हा धोका नाही टाळता आला तर मग मात्र जीवन पुर्ण पणे उध्वस्त होण निश्चित आहे.शिक्षणा च्या काळात एक नवीन संकट उभा राहत ते संकट म्हणजे तारूण्य शैक्षणिक कालखंडातील महत्वाच्या टप्प्यावर तारूण्य प्रकट होत आणि त्या मुळे आपण बिथरून जातो .पण हेच तारूण्य हे प्रचंड ऊर्जादायी असल्याने त्याचा योग्य उपयोग केला कि हि उर्जा योग्य ठिकाणी खर्च केली तर या उर्जेचा प्रचंड ज्ञान ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी समर्पित भावनेने प्रयत्न केला तर यश आपल्याला आंदन येईल. अभ्यास हि तपश्चर्या भंग होऊ दिली नाही तर आपलं इच्छित धेय्य गाठण्या पासुन आपल्याला कोणीही वंचित ठेवु शकणार नाही.महणुन शिक्षणाची तपश्चर्या भंग होऊ देऊ नका. जेणेकरून आपलं भविष्य उध्वस्त होईल.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक, तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad