Bluepad | Bluepad
Bluepad
हल्ली गण्या वाट पाहतोय पावसाची....
राहुल सोनटक्के
राहुल सोनटक्के
19th Jul, 2023

Share

हल्ली गण्या वाट पाहतोय पावसाची....
(कवी...राहुल सोनटक्के यांनी स्वलिखित मनाला भावणारी कविता आवडल्यास नक्की शेअर करा)
हल्ली गण्याच मन शेतात
लागताच नाही....
गण्या वाट पाहतोय पावसाची
पण पाऊस वेळेवर पडत नाही...
गण्यान लाख मोलाचं बियाण
उघड्या वावरात पेरल...
होता नव्हता पैसा गेला
सांगा गण्याकडे शिल्लक काय उरलय...
गण्या पुरता खचून गेलाय शेती करून....
कधी मालाला भाव येईल उर आलाय त्याचा भरून....
हल्ली गण्याला रात्री रात्री
झोप ही लागत नाही....
आमचा तुमचा गण्या
आता कुठे फिरताना ही दिसत नाही...
गण्याला आता सरकारवरही
भरोसा उरला नाही....
गण्या त्याच्या परिसथितीच राहिला
तो तिथपर्यंत पुरला नाही...
गण्या सांगतो,माझ्या शेतातला
हरीण, वानर,रोहीचा रोजचाच त्रास..
कुठ पर्यंत सांभाळावी शेती
नाहीतर होईल गण्याचा हास...
तुमच्यातला अन् आमच्यातला
गण्या जगाला पाहिजे....
अन् प्रत्येक संकटावर मात
करताना गण्या पुरला पाहिजे...

0 

Share


राहुल सोनटक्के
Written by
राहुल सोनटक्के

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad