गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
18th Jul, 2023
Share
*निद्रेशी मैत्री हे दरिद्रतेला निमंत्रण*
निद्रेशी मैत्री हि वरकरणी सुखद असते .हि मैत्री बहुतांश सगळ्यांनाच हवी असते .पण दुरगामी परिणाम पाहिले तर हि मैत्री लाभदायक ठरत नाही.निद्रेशी मैत्री हा यशस्वी जीवनातील सगळ्यात मोठा अडथळा असुन हा अडथळा ज्याला पार करता आला त्याच जीवन सार्थक झाल्याशिवाय रहात नाही.आपल आयुष्य सुखमय असलं पाहिजे.हि प्रत्येकाची अपेक्षा असते.त्या सोबतच आपण आपल्या जीवनात यशस्वी पणे प्रगती केली पाहिजे . त्यासाठी आपण प्रयत्नशीलही असतो.आपली प्रगती व्हावी या साठी धडपडत असताना यशस्वी होण्यासाठी काही बाबींच पालन आपल्याला निश्चितच कराव लागतं. जीवनात अलौकिक असं यश मिळालं पाहिजे अशी आशा अपेक्षा महत्वकांक्षा असणं या मध्ये गैर असं काहीच नाही. पण त्या साठी फक्त अपेक्षा असुन चालत नाही तर प्रचंड मेहनत , कष्ट घेण्या सोबतच निद्रेच्या चक्रव्युहात आपण अडकणार नाहीत अथवा आपल्या यशो मार्गाआड निद्रा येणार नाही याची काळजी दक्षता घेणं अत्यंत गरजेचे असत.जीवनात काही विशेष कामगिरी करण्याची अपेक्षा असेल तर काही पथ्य हि जीवनात पाळावीच लागतात . यशस्वी होण्यासाठी निद्रा हि आपल्या पासून अलिप्त ठेवता आलीच पाहिजे. यशस्वी आयुष्य आणि निद्रा यांचा घनिष्ठ असा संबंध असतोच .जसं धेय्य तशी निद्रा असते.आपलं धेय्य जर उच्चतम असेल तर आपोआपच आपली निद्रा देखील कमी होत जाते . धेय्य उच्चतम आणि सार्थक नसेल तर मग आरामच आराम असतो. तसं पाहिलं तर जीवनातील विविध क्षेत्रातील यश अपयश यांचा थेट संबंध हा निद्रेशी असतोच. ज्या पद्धतीने आपण आराम करतो अथवा कष्ट करतो त्या नुसार परिणाम देखिल अनुभवास येत असतात. आळस, येणं थकवा,येणं स्वाभाविक आणि सहाजिक आहे पण तो घालविण्यासाठी जरी निद्रा आवश्यक असली तरी त्याचे प्रमाण किती याला मर्यादा असते. प्रमाण म्हणून प्रमाण पाळल गेलं पाहिजे.जीवनात निद्रेशी मैत्री करू नका विश्रांती आवश्यक आहे पण त्याला काही मर्यादा आहे .ती मर्यादा पाळून विश्रांती घेण्यास हरकत नाही पण त्या सोबत मैत्री होता कामा नये.आपण फक्त मोठी झालेली माणस पाहतो ऐकतो पण जी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी झालेली आहेत अथवा त्यांनी आपलं नावलौकिक निर्माण केलेलं आहे हे नावलौकिक सहज निर्माण झालेलं नाही त्यासाठी रात्रीचा दिवस त्यांनी केलेला आहे हे वास्तव आहे. आणि विशेष म्हणजे यशस्वी व्यक्तिमत्व हे कधीच निद्रेशी मैत्री स्वीकारत नाहीत. निद्रा हि त्यांच्या दृष्टीने गौण असते . नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्तिच्या जीवनात निद्रेचा दुष्काळ असतो .जिथं निद्रेचा सुकाळ आहे तिथं दारिद्र्याचे पिक जोमात फोफावत आणि जिथे दुष्काळ आहे तिथे मात्र आदर्श व्यक्तिमत्व घडत. स्वतःला घडावायच असेल तर निद्रेला शुन्य महत्व असल पाहिजे.जगातील अनेक अशा मोठ्या घडामोडी ह्या रात्री अपरात्रीच घडत असतात आपल्या नजरेत जी माणसं मोठी असतात ती रात्री उशिरापर्यंत कार्य मग्न असतात आणि सकाळी सुद्धा भल्या पहाटे पासुन त्यांचं कार्य चालू असतं. त्यांच्या कामाचा आवाका एवढा मोठा असतो कि निद्रा हि त्यांच्या लेखी नगण्य बाब आहे जेव्हा शरिर आति थकेल तेव्हा त्याला थोडी विश्रांती दिली पाहिजे.पण दिनचर्या हि जास्तीत जास्त कार्य मग्नच असली पाहिजे.निद्रा आवश्यक आहे पण किती याला प्रमाण असलं पाहिजे.शालेय दशेत विद्यार्थी शिकत असताना किती आराम करावा याला मर्यादा असते .शरिर थकवा, विश्रांती हि आवश्यक आहे पण प्रमाण मर्यादेत असलं पाहिजे. प्रमाण मर्यादा पाळली गेली तर हित होत आणि ओलांडली गेली तर अहित होण निश्चित आहे.आळस थकवा निरूत्साह हे नेहमी नकारात्मक असतात आणि त्यामुळे फक्त आणि फक्त अहितच होत. तर चैतन्य हे नेहमीचं उत्साह वर्धक असत . जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार सदैव राहण्यासाठी तसंच जीवनाला योग्य दिशा उपलब्ध होण्यासाठी आळस वृत्ती ला कोणत्याही प्रकारचा थारा देता कामा नये.जेणेकरुन त्याचा प्रभाव आपल्या जीवनशैलीवर झाला तर आपल प्रचंड नुकसान होण हे निश्चित असतं.निद्रा हि आवश्यक आहे पण मर्यादित असली पाहिजे.हे सुत्र जीवनात काटेकोर पणे पाळल गेलंच पाहिजे. आपण आपल्या जीवनाविषयी किती सकारात्मक आहेत त्यानुसारच आपला उत्साह चैतन्य हे अवलंबून असतं. जीवनात काही सत्य असतात आणि हेच सत्य स्वीकारलं तर परिणाम योग्य येतात . आणि सत्य पचणी पडल नाही तर मग मात्र फार काही उल्लेखनीय फायदा होत नाही . जीवनात आपलं सख्य कोणाशी आहे हे खुप महत्वपूर्ण ठरत .जसं सख्य तसे परिणाम हा जीवनाचा आलेख असतो . निद्रा नियंत्रण करण्यासाठी अथवा आपल्या जीवनात आपल्याला निद्रा कमी करून आपलं हित करायचं असेल तर आपण आपल्या जीवनशैली मध्ये सुधारणा केली पाहिजे .जसं हलका व पौष्टिक आहार त्याच प्रमाणे शारीरीक कसरत हि नियमित आवश्यक आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301निदरे
0
Share
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य