मी जेव्हा या दुनियेत नसेल...
मी तेव्हा कुणाचे,
जगण्याचे कारण सुद्धा बनेल,
मी तेव्हा कुणाच्या,
नजरेत कायमच बसेल,
मी कुणाच्या हृदयात,
कायमच घर करेल,
मी कुणाच्या आठवणीत,
चमकणार त्या लखलखीत चांदण्या सारखे,
मी कधी कधी कुणाचे,
हसण्याचे कारण सुद्धा बनेल,
मी कधी कधी कुणाचे,
डोळ्यातील अश्रूंचे मोती सुद्धा बनेल,
मी कुणाच्या जीवनात येणार,
त्या तेजस्वी सूर्याच्या प्रकाशा सारखे,
मी जेव्हा दुनिया सोडून जाईल ना,
तेव्हा मी नक्की ही कहानी लिहून जाईल...
- कु.संतोषी सरकार.
🙏 धन्यवाद 🙏