प्रवास करताना तुझ ते न कळत. माझ्या कडे बघण लक्ष जाताच माझ तुझ्या कडे. तुझ ते नजर फिरवन हातातला मोबाईल तो तर फक्त एक बहाना च होता. इंस्त्राग्राम ओपन करून. तू फक्तं माझ्या कडेच बघत होता. लक्ष जाताच माझ तू नजर फिरवत होता. खरच तो बसचा प्रवास. माझ्या साठी आनंदाचा क्षण होता.
तुझ्या कडे बघितल्या वर वाटायचं. तुझ नी माझ नात काही जुनच असायचं. तुझ ते अलगद पापणे आळून माझ्या कडे बघन आणि गालातल्या गालात तुझ ते हसन. परत तुझ चोरून चोरून माझ्या कडे बघण. दिसायचा तसा तू शांत चेहऱ्यावरून तुझ्या कडे बघितल्या वर. टाकायचा तू खाली मान करून बघायचा तू नुसत फक्त मला चोरून चोरून.
वाटायचं तुला , माझ्याशी काही तरी बोलायचं. थोडी जागा दे बहुतेक अस काही तरी म्हणायचं. परत माझ्या कडे बघत. तू इंस्त्राग्राम ओपन करायचा रिल्स ला लाईक देऊन त्या,. तू परत काढायचा. तुझा मोबाईल पुढे असून. तू मलाच बघायचा
कंडक्टर नी विचारलं कुठे जायचं आहे. तर तिकीट काढताना. तू बस डेपो म्हणाला मी उतरली आधी तर. माझ्या मागे तू ही उतरला. वाटल होत हा बसचा प्रवास इथेच संपला पण ऐन वेळी कंडक्टर नी पैसे सुटे नाही म्हणून सर्वा घोड केला दोघांनी मिळून वाटून घ्या अस म्हणत दोघांनाही विचारात पाडलं. हळू आवाजात तोच बोलला राहू दे पैसे तुझा कडे म्हणाला मी ही हळू आवाजात च म्हटल. एक मिनिट सुट्टे पैसे आहे माझ्या कडे. तुझे तू घेऊन जा अस म्हणत हा बस चा प्रवास इथेच थांबला. माझ्या मार्गाने मी गेली त्याच्या मार्गाने तो गेला. मागे वळून तरी तो मला एक सारखाच बघत राहिला कोण होता तो मनाला अगदी स्पर्श करून गेला न बोलता खूप काही सांगून गेला...
कुु रुचिता विलासराव निकम. रा. तळणी (मोर्शी) ता. मोर्शी जिल्हा.अमरावती