Bluepad
सहाण
सौ.मेघा नांदखेडकर
17th Jul, 2023
Share
झिजून जाते चंदन पण
साथीला असते सहाण
संपत नसली तरी तिचा
जन्म ठेवलेला गहाण
दुस-यांसाठी झिजणारे
बनतात जगात महान
त्याच्यापुढे भासते समस्त
ब्रम्हांड सुद्धा लहान
पण त्याला आधार देतो
जो विसरून भूक तहान
ऋण त्याचे फिटणार नाही
जरी केली कातडीची वहाण
पायरीचा दगड नसतो उणा
मिळे कळसाला जरी सन्मान
कमवणारीला द्यावाच मान
पण गृहिणीचा नको अपमान
1
Share
Written by
सौ.मेघा नांदखेडकर
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us