गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
17th Jul, 2023
Share
*जीवसृष्टी रक्षणासाठी पर्यावरण वाचवा*
वाढत्या मानवी हास्तक्षेपामुळे संबंध जीव सृष्टीच अस्तित्व धोक्यात येण्याच्या दिशेने मार्गक्रमण चालू आहे.जीवसृष्टी रक्षणासाठी पर्यावरण वाचवलं पाहिजे हे आपलं कर्तव्य जबाबदारी आहे असं समजून योगदान दिलं पाहीजे जीवनात भौतिक सुख सुविधा निर्माण करण्यासाठी आपला बहुतांश वेळा जात आहे पण पर्यावरण नष्ट झालं तर सुख सुविधा मिळवून उपयोग काय होईल. आपलं अस्तित्व आणि भविष्य पर्यावरणावर अंवलबुन असुन देखील आपण पर्यावरणाचे रक्षण संवर्धन करण्यात कमालीचे दुर्लक्ष करतोय . पर्यावरण रक्षण हे आपण इतरांच्या साठी नाही तर स्वतःसाठी करणं गरजेचं आहे. पर्यावरणाच असुंतलन वाढण्यासाठी आपणच जबाबदार आहेत . म्हणजे आपण आपल्या भवितव्या सोबतच खेळतोय का? पर्यावरण रक्षण आणि संवर्धन हे कृतीशील झालं पाहिजे.जशी लोक संख्या वाढते आहे त्याच प्रमाणात वृक्ष लागवड, संख्या देखील वाढली पाहिजे . फक्त वृक्ष लागवड करून चालणार नाही तर संवर्धन करून समतोल राखणे हे देखील गरजेचं आहे.प्राण वायु ची निर्मिती पर्यावरणातुन होते . त्याच बरोबर प्राण वायु सह अनेक अशा अनमोल साधन संपत्ती ,संपदा आपल्यला पर्यावरणाकडुन कडुन मिळालेली देणगीच आहे . फक्त देणगीच नाही तर ते पर्यावरणाचे आपल्यावर ते अनंत उपकार आहेत. संबंध जीव सृष्टी हि प्राण वायु वर जीवंत आहे म्हणून प्राण वायु अमुल्य आहे. तर मग पर्यावरणाचं महत्व किती प्रचंड मोठ असल पाहिजे.पण ते आपल्या दृष्टीने किती आहे. बहुतांश लोकांच्या मनात तर पर्यावरण नगण्य आहे. म्हणूनच पर्यावरणाचा समतोल टिकला तर सृष्टी वरील मानवासह इतर जीव व्यवस्थित पणे आपलं जीवन जगु शकतात . अन्यथा पर्यावरण समतोल बिघडला तर जीव सृष्टीला धोका निर्माण होऊन अनेक परिणामांना समस्यांना सामोरे जावे लागु शकते. एकंदरीत पर्यावरण समतोल टिकण व टिकवणे हे मानवी कल्याणासाठी खूप महत्वपूर्ण आवश्यक आहे. आणि आपण पर्यावरणाचे संवर्धन केले ,रक्षण केले समतोल राखला तरच येणाऱ्या पिढीच भविष्य उज्ज्वल असेल. या मध्ये यत्किंचितही शंका नाही . पर्यावरण हे जीव सृष्टीच सुरक्षा कवच आहे. आणि विज्ञान युगातील मनुष्य हे कवच विकासाच्या नावाखाली नष्ट करण्याचा दिशेने झपाट्याने मार्गक्रमण करत. आहे हि प्रचंड आणि अंत्यत खेदाची बाब आहे. निसर्गाकडुन प्राप्त होणा-या ज्या दुर्मिळ नानाविध संपदा ज्या आपल्याला पर्यावरणातुन अगदी मोफत मिळतात आपण निसर्गाचे कायम ऋणी असलं पाहिजे .हे सगळं आपल्याला निसर्गाकडून देणगी स्वरुपात मिळतं असताना देखिल आपण आपल्या हव्यासापोटी तसेच वाढत्या गरजा वाढती लोकसंख्या , त्या अनुषंगाने आवश्यक असणार्या सेवा सुविधा निर्माण करताना निसर्गाचा असमतोल निर्माण करतो आहोत. आणि तो असमतोल पण क्रमप्राप्त आहे.महणजे सेवा सुविधा उपलब्ध करत असतानाच निसर्गरम्य सौंदर्य नष्ट होऊन भौतिक विकास होत आहे. म्हणून मग निर्धास्त पणे निसर्गाचे संतुलन बिघडवायचे का आणि मग जीवनासाठी आवश्यक असणारा प्राण वायु कुठुन मिळणार प्राण वायु चे मुल्य काय याचा अनुभव आपण करोना काळात घेतला आहेच . सगळीकडे फक्त ऑक्सिजन ऑक्सिजन हा हाहाकार होता. आणि हा ऑक्सिजन जर पर्यावरणातुन आपल्याला मोफत निःशुल्क मिळत असेल तर त्याच महत्व आपल्या लेखी किती असलं पाहिजे. परंतु जे मोफत मिळत त्याच महत्व ओळखण्या मध्ये सध्या चा मनुष्य कमी पडत आहे . आणि म्हणूनच तो निर्धास्त पणे वृक्षांची कतल करत आहे त्या मुळे वायु प्रदुषण प्रचंड मोठ्या वेगाने वाढत आहे . घानकचर व्यवस्थित व्यवस्थापन न करता तो निसर्गाच्या असमतोलात भर घालत आहे.महणुन दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे.हे कुठं तरी थांबलं पाहिजे . मानवी गरजा पण आवश्यक आहेत . म्हणून निसर्गाचा असमतोल करणं योग्य नाही . म्हणून आवश्यक असणार्या गरजा पूर्ण करताना होणार निसर्गाचे नुकसान टाळण आवश्यक आहे. आणि ज्या प्रमाणात निसर्गाचे नुकसान होत आहे .समतोल बिघवडला जात आहे .त्याच प्रमाणात जास्तीत जास्त वृक्ष लागवड , संवर्धन करणं आवश्यक आहे .आणि भविष्यातील येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी निसर्गाचं संतुलन टिकवून त्याच संवर्धन आणि रक्षण करण आवश्यक आहे .जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत निसर्गाचा समतोल बिघडणार नाही.वसुंधरेच जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते टिकुन रहिल आणि आपल्या पुढील पिढीच भविष्य सुरक्षित राहिल. पर्यावरण हे जीव सृष्टी च अभेद्य कवच आहे आणि हेच कवच आपण नष्ट करण्यासाठी उतावीळ झालो आहेत म्हणजे एक प्रकारे आपणच आपल्या जीवांवर उठलो आहेत.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301
0
Share
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य