Bluepad | Bluepad
Bluepad
जीवनाची अवस्था हि ज्ञान स्थितीवर अवलंबून असते
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
16th Jul, 2023

Share

*जीवनाची अवस्था हि ज्ञान स्थितीवर अवलंबून असते* ‌
वेळ काळ परस्थिती स्थिती कोणतीही असो परिपुर्ण ज्ञान हेच जीवनातील सर्व दुःखावर गुणकारी औषध ठरत .आपल्याला मिळालेला मनुष्य देह हा काही फक्त सुखाचा उपभोग घेण्यासाठी झालेला नसुन बहुतांश दुःख पण निश्चित वाट्याला येणार आहेत याची जाणीव ठेवून ज्या पद्धतीच दुःख आहे .त्या पद्धतीचे उच्च ज्ञान आपल्या कड असलं पाहिजे जेणेकरून दुःख आल तरी ते आपल्या जीवनावर प्रभाव निर्माण करू शकलं नाही पाहिजे तेव्हाच ते ज्ञान आपल्यासाठी उपयोगी ठरत . परिपुर्ण ज्ञान हेच सर्व दुःखावर प्रभावी गुणकारी औषध आहे ज्याचा वापर आपण आपलं जीवन स्थिर ठेवण्यासाठी करू शकतो. आपण ज्या बाबीला सुख समजतो त्याच बाबी दुःखाचं मुळ ठरतात.आपण आपल्या ज्ञान उंची नुसार सुख दुःख ठरवतो .पण वास्तविक सत्य काय आहे हे आपण जाणून घेत नाहीत. सत्य जाणून घेण्यासाठी आपल्या कड मजबूत अस प्रभावी ज्ञान असलं पाहिजे.ज्ञान अवस्था असेल तर दुःख आपल स्थान आपल्या जीवनात निर्माण करू शकत नाहीत.ज्ञान उंची कायम ठेवली तर सदैव आपली अवस्था स्थिर राहते . मुळात अवस्था म्हणजे काय? तर अवस्था म्हणजे दशा अथवा हालत एकंदरीत जीवनाच मुल्यमापन काढलं तर जीवन स्थिती निश्चित होते . आणि हि स्थिती अवस्था हि आपल्या ज्ञान ,अज्ञानावर ठरत असते .आपल्या जीवनात निर्माण होणारी स्थिरता अस्थिरता सुख दुःख हे आपल्या ज्ञान स्थितीवरच अवलंबून असते.परीपुर्ण ज्ञान दुःख मुक्त जीवन अर्धवट ज्ञान असेल तर अस्थिर दुःखी जीवन मग जीवनात नेमकं मिळविण्या सारखं काही असेल तर पुर्ण ज्ञान हेच जीवनासाठी हितार्थ ठरत . मानवी जीवन हे क्षणभुंगर असलं तरीही जो पर्यंत जीवन आहे तो पर्यंत जीवनचक्र चालू असत .मग जीवन चक्र आलं कि त्या सोबत आकांक्षा महत्वाकांक्षा,मोह,माया ,स्वार्थ,हे सगळं आलंच या सगळ्या सोबत दुःख हे आलंच मग या दुःखाच्या चक्रव्युहातुन कायमची मुक्ती मिळविण्यासाठी पुर्ण ज्ञान आवश्यक असतं .तसं पाहिलं तर जीवनाची स्थिती हि फक्त ज्ञानानुसारच निश्चित होत असते.आपण समस्येला घाबरत असतो. पण समस्या हि कधीच मोठी नसते .उपाय माहित नसतो म्हणून समस्या हिच खुप मोठी अडचण भासते . समस्या अडचण या सोबत खेळत बसण्यापेक्षा उपया शोधुन मार्गक्रमण करण हे कधीही हितकारक ठरत.जीवनातील सुख दुःखाची निर्मिती हि ज्ञान आणि अज्ञानावर अवलंबून असते .या गुह्य ज्ञाना पासुन आपण वंचित असल्या कारणाने सुख दुःखाच्या फेरयात आपण सहजपणे अडकतो.जीवन म्हटलं कि समस्यांचा महासागर आणि महासागरात तरूण जाण्यासाठी ज्ञान हेच उपयुक्त प्रभावी असं माध्यम आहे. जीवनात समस्या अडचणी दुःख अनंत आहेत पण त्या अनुषंगाने असणारे पुर्ण ज्ञान हेच त्यावरील उपयुक्त प्रभावी औषध आहे. परीपुर्ण ज्ञान हे जीवनातील सर्व दुःख संपवुन समाधान स्थिरता निर्माण करते.तर अर्धवट ज्ञान हे जीवनातील सर्वात घातक ठरत . अस्थिरता निर्माण करत म्हणून जीवनाची दिशा आणि दशा हि सर्वस्वी आपल्या ज्ञानावर अवलंबून असते. आपलं जीवन कसं आहे हे आपल्या ज्ञान स्थिती वर आधारित असल्याने जीवनातील स्थिती बदलण्यासाठी आवश्यक ज्ञान अर्जित करणं गरजेचं आहे.तस पाहिलं तर सृष्टी वर उपलब्ध ज्ञान हे अनंत आहे त्या पैकी आपण जितकं जास्ती जास्त ज्ञान गृहण करू शकु तितकंच आपली वैचारिक स्थिती मजबूत होणार हे निश्चित आहे.जीवनाशी निगडित विषय अनेक आहेत त्या अनेक विषयांपैकी आपण ज्या क्षेत्राशी निगडीत आहेत त्यामधील संपुर्ण ज्ञान आपल्याला असेल अथवा एकंदरीत जीवनाविषयीच जरी संपूर्ण ज्ञान आपल्याकडं असलं तरी कसलंच दुःख आपल्या जीवनात प्रवेश करत नाही. त्याच प्रमाणे आपल्याकडं निव्वळ ज्ञान नसेल तरीही फार काही उल्लेखनीय फरक पडत नाही पण एदाकदाचित आपण अर्धवट ज्ञानी असु तर मग मात्र आपली खैर नाही कारणं अर्धवट ज्ञान हे नेहमी घातक ठरत.विघातक असतं तसं पाहिलं मानवी आयुष्य हे दोन स्थिती मध्ये विभागलेल असतं. स्थिरता आणि अस्थिरता ह्या जीवनातील प्रमुख स्थिती असल्याने संबंध जीवन हे फक्त स्थिरता आणि अस्थिरता या भौति फिरत असल तरी या स्थितीला प्रमुख कारणही ज्ञान हेच असल्याने ज्ञान स्थिती वर जीवन स्थिती आधारित असते.मानवी जीवन हेच वास्तविक समस्यांच माहेर घर आहे जीवनात दुःख हे कोणालाच नको आहे सुख हे प्रत्येकाला अपेक्षित आहेच .तसं पाहिलं तर मानवी जीवन हि अद्भुत घटना आहे.इथ आपण साक्षीदार होण्यासाठी अथवा साक्षीभाव अनुभव घेऊन कर्म फल सोबत घेऊन जाण्यासाठी आलो आहोत मुळात येण्याचं प्रयोजन माहित नसल्याकारणाने मुख्य अडचण निर्माण होते.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad