आयुष्यामध्ये उच्च शिक्षण घेवून स्वत:ची शिकण्याची ईच्छा मला पुर्ण करायची होती. पण मी ग्रामीण भागात राहात असल्यामुळे, माझ्या वडिलांवर गावठी लोकांच्या विचाराचा आसर होता. त्यांना माझे शिक्षण नकोसे , नकोसे वाटू लागले. पण मी परिस्थीला विरोध करत शिक्षण घेतले. बि. एस . सी . जर्नालिस्ट झाले. तेवढ्याच माझ्या लग्नासाठी पाहुण्यांची वर्दळ वाढली. एका दिवशी माझे लग्न जमले. लग्न झाल्याच्या नंतर, मला समजले माझ्या नवऱ्याचे प्रेमप्रकरण आहे. प्रेमप्रकरण साहाजिक आहे. लगेच दोन महिन्यात लक्षात आले. त्याचे एका विवाहित स्त्रीसोबत संबध आहेत. या गोष्टीवरुन बरेच वाद झाले. मी नाते तोडून जायला तयार झाले.
क्षणात मला माझ्या वडिलांची आठवण आली. त्यांनी कर्जबाजारी होऊन माझे लग्न केले. मी गोष्टी विसरुन परत चांगले रहायला सुरवात केली. माझा दिड शहाणा नवरा जास्तच हुशारी करु लागला. तो सारखे त्याच्या बाहेरील बायीसोबत बोलू लागला. हे सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. त्याच्या सर्व चूका असून , तो मलाच निघून जा बोलतो. या जगात असे वाईट नवरेसुध्दा आहेत. मी थोड्यावेळाखाली ब्लूपॅड वर वाचले. नवऱ्यावर संशय घेतल्यामुळे तो नैराश्यात जात आहे. नवऱ्याला वारंवार समजावून जर तो विवाहबाह्य संबध ठेवत असेल , तर काय करायचे. असले नवरे बायकांसाठी श्राप आहेत. लग्न करुन पदरामध्ये फक्त दूं:ख येते. अशा नवऱ्यांना कडक नियम केले पाहिजेत. कारण तो नवीन ड्रेस परफ्यूम मारुन जात असेल तर, नक्कीच काही तरी तोंड काळी करणारे कृत्य करणार आहे. ही गोष्ट समजून जावी. सगळे नवरे नैराश्यात जात नसतात. स्वतः मस्ती करतात. बायकांना निराश व्हावे लागते. अशा नवऱ्यांच्या गोष्टीत कधीच येउ नये. वारंवार घरात भांडण क्लेश होवून नवरा विवाह बाह्य स्त्रीला सोडत नव्हता. ही माझ्या आयुष्यातील न पुसणारी आठवण आहे. काळाच्या ओघाने मी वृध जरी झाले , तरी या नवऱ्याची हावरट हारकत मी विसरणार नाही....