त्या नयनी बसावे मी,जे सदैव तुलाच पाहती
घडो मज त्यांची संगती,तुजवर ज्यांची प्रीती
कधी व्हावे मी पवन पावन तुला स्पर्शून वाहण्या
कधी व्हावे मी धूलिकण तव चरणांतळी राहण्या
डोळे उघडले असता जरी तू समोर ना दिसलेला
बंद नेत्रांनी सदैव पाहिला तुला ह्रदयात बसलेला
कोण दूर करील तुला तू रोमरोमी भरून वाहिला
माझा प्रत्येक श्वासही तुझाच जप करून राहिला
जे हवे ते मिळवण्याची कोणी देऊ शकतो का खात्री
अनंत काळापासून कुठे मिळाली आकाशाला धरित्री