🥳 स्वप्नांनो तुम्ही सुद्धा
रसिका ,
स्वप्नात विठोबाच्या दर्शनाच
वैकुंठात भरलं होतं प्रदर्शन
बसलो पंढरीच्या पायथ्याला होतं आरक्षण
पुंडलिकाच अंगाखांद्यावर चाललं होतं लोळण
जिवंत तुका आणि विमान
चालकाविना करीत होते भ्रमण
जोजे वांछील तो ते लाभो प्राणिजात
संजीवन समाधीतून ऐकू येत होते पसायदान
बरंच काही चाललं होतं अभियान
एकीकडे भरलेला लाभार्थींचा मेळा
शंकर महादेवाचा उघड झाप करीत होता तिसरा डोळा
एकनाथाचं गाढव गंगेत नाहात होतं
भगीरथ प्रयत्नाने पृथ्वीवर झेपावलेल्या नदी प्रवाहात
देवेंद्राच कलंक धुनं चालू होतं
शपथ चालीसाच पठण चालू असताना
हनुमान द्रोणागिरी घेऊन प्रगटले
धाडदीसी मातोश्रीवर कोसळले
दरम्यान हातातील गदा निसटली
थेट सिल्वर ओकवर आदळली
प्रचंड आवाजाने मी हादरलो
खाडकन जागा झालो
अंगावर पडली होती पाल
काय सांगू माझे बे ....हाल
रसिका,
...... बाय ! बाय ! फिर मिलेंगे.....