प्रेम तुझे नि माझे कायम अंतर्मनात असावे
पण त्या प्रेमामुळे मात्र अंतर मनात न यावे
जाणून तुला घेण्यास मी तुझ्या मनात उतरावे
पण आजीवन मी तुझ्या मनातून ना उतरावे
श्वासोश्वास बनून मी तुझ्या मनात भरून रहावे
पण तृप्त होऊनही तुझे मन कधीच ना भरावे
आपल्या सुंदर नात्याचा शेवटही गोडच व्हावा
पण जीवंत असेपर्यंत त्या गोडीचा शेवट न व्हावा