कस असत ना सर्व....
अचानक कोणीतरी येत life मध्ये आणि सर्व बदलून जात... हो... मी प्रेमात पडलीय त्याच्या... खूप ठरवलं होत... कि हे प्रेम वैगरे नसतं काही " सब मोह माया है " आत आपण नाही अडकायचं..., पण झालं.....!! आता काय करू त्याला...
ती वेळच तशी असते... आपल्याला हवं असत कोणीतरी... आपलं असं.. हक्काचं!आणि काय भेटलं ना समोरून तस... काय सांगू त्याच्या बदद्दल... खरंतर मला आधीपासून आवडत होता तो.. पण कधी सांगितलं नाही... किंवा मान्य ही केल नाही.
11 th मध्ये असल्यापासून ची आमची ओळख.. College च्या पहिल्या दिवशी मी त्याला पाहिलं., आणि पाहतच बसले...! White shirt, black pant... त्यात आणखीन भर म्हणून..., त्याची Beard.... खूप छान दिसत होती त्याला...