बस तुझा खांदा हवा
हातात हात गुंफून तुझ्या सोबतचा
लोकल मधला प्रवास हवा
मंद झुळूक येता, डोकं टेकायला
बस तुझा खांदा हवा
उसळणाऱ्या लाटांनाही जसा
शांत समुद्रकिनारा हवा
धावपळीच्या जीवनातल्या
एखाद्या निवांत संध्याकाळी
तुझ्या सहवासातला
गारवा अनुभवताना
बस तुझा खांदा हवा....
कधी झाले ओझे मनावर
झाले कधी अश्रू अनावर
बांध तुटता ,भावनेचा पूर येता
खचल्या मनाला या धीर देण्या
बस तुझा खांदा हवा..,.
होईल जेव्हा जीवनसंथ्या
श्र्वासही होईल फितूर जेव्हा
असेल अखेरची गाढ निद्रा
चार खांदे उचलतील भार माझा
भार माझा घेण्या झुकलेला
पहिला खांदा तुझा हवा
बस तुझा खांदा हवा.....
बस तुझा खांदा हवा....
✍️आकांक्षा