Bluepad | Bluepad
Bluepad
राजकारणाचा चिखल कि चिखलाच राजकारण
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
15th Jul, 2023

Share

*राजकारणाचा चिखल कि चिखलाच राजकारण*
चिखल म्हणजे दलदल आणि याच दलदली कडे पाहण्याचा सर्वसामान्य माणसांचा दृष्टिकोन हा नेहमीच उद्विग्न असाच असतो.चिखला पासुन स्वतःला दुर कसं ठेवता येईल अथवा हा चिखल आपल्या अंगावर लागणार नाही याची काळजी घेताना प्रत्येजण दिसतो.राजकारण म्हटलं कि बहुतांश लोकांच्या आवडीचा विषय पण सध्या राजकारणाला चिखलाचा स्वरूप प्राप्त झाल्याची भावना लोक मनात निर्माण होऊ लागल्याने त्या विषयी उद्विग्नता वाढीस लागली आहे.लोकशाही मध्ये मतदार हा राजा असतो .पण हल्ली राजकारणात जे काही घडतंय ते पाहुन हाच मतदार राजा म्हणजे सामान्य माणूस हवालदिल आहे.याची प्रचिती सोशल मध्यातुन व्यक्त होताना सगळीकडे आपण पाहतोय. तसं पाहिलं तर सध्याची परिस्थिती पाहुन मनात अशा पद्धतीने प्रतिक्रिया निर्माण होणं हे देखील स्वाभाविक आहे. मनाविरुद्ध घडुन सुद्धा ते पचनी पाडण्याची मानसिक तयारी ठेवण्याच कौशल्य हा सध्याच्या राजकारणाचा पाया झाल्याने राजकारणाचा पार चिखल झाला आहे असंच काहीसं चित्र सर्व सामान्य माणसाच्या मनात निर्माण होताना दिसत आहे. लोकांचा विश्वास आणि लोकमताचा आदर हा प्रमुख आधारस्तंभ असणार राजकारण हे खरंया अर्थाने लोककल्याण करण्याचा वसा आणि वारसा समजला जातं असे पण साध्य हेच वैचारिक राजकारण पातळी सोडुन टोकाच्या भुमिकेत पोहचलं आहे .सोय म्हणजे राजकारण नाही अथवा सोयीचा आपल्या सोयीनुसार वापर देखिल राजकारण नाही.पण तत्वांच राजकारण संपुष्टात आल्याने आता सोयीच्या राजकारणाचे वेगवेगळे प्रयोग होत आहेत.आणि त्याच नामकरण देखिल जो तो आपापल्या सोयीनुसार करत आहे .कोण चुक आहे कोण बरोबर आहे हा नंतराचा विषय आहे. पण लोकांच्या नजरेस जे पडतंय ते खुप भयानक आहे.मग प्रश्न हाच आहे कि नेमकं खरं काय आहे आणि खोटं काय? आहे. लाभ आहे तोपर्यंत कोणाचही खर रूप प्रकट होत नाही पण लाभ संपला कि मग मात्र कोण गुरू कोण शिष्य कसले उपकार हे सध्याच युगाच भयानक वास्तव आहे.खरं पाहिलं तर राजकारण हि एका विचार धारा असते . ज्या मध्ये तत्व सत्व निष्ठा जपली जाते ती जपली पाहिजे आणि ती जपणारी माणसं देखिल याच मातीत होऊन गेली .पण सध्या सोयीनुसार विचारधारा बदलण्याची आधुनिक सोय राजकारणात रूढ झाली आहे. आणि सत्ता हिच सर्वपरी आहे मग सत्तेसाठी सर्वकाही असंच काहीसं सध्या तरी चालेल आहे.पण हे सगळं घडत असताना हे चित्र पाहुण सामान्य माणुस मात्र हवालदिल झाला आहे. राजकारणाचा चिखल झाला कि चिखलाचे राजकारणा झाले हे कळायला मार्ग नाही.वैचारीकता सिद्धांत तत्व हा राजकारणाचा पाया होता पण हा पाया ढासळुन साध्य सत्ता हाच राजकारणाचा मुख्य उद्देश ठरत आहे. प्रत्येकाला सत्ता पाहिजे मग मार्ग कोणाताही असो आणि सगळ्या मध्ये भावनिक असणारा मतदार मात्र अचंबित आहे.कि मतदान कोणाला द्यायचे. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो . प्रत्येकाचं एक ईप्सित असतं आणि हेच ईप्सित साध्य करताना एकमेकांच्या वर आरोपांची राळ उठवणारे चिखल फेक करणारे जेव्हा एकाच ताटात जेवायला बसतात तेव्हा सर्व सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. राजकारणाचा चिखल झाला कि चिखलाच राजकारण झालं . मतदार राजा हा राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे पण याच केंद्रबिंदू च्या हे सगळं पचणी पडेल का हे तर वेळ काळ ठरवेल .जिंकण आणि हरण यापलिकडे म्हणजे जय पराजय या पेक्षाही आपली भुमिका विचारधारा घेऊन लोकांचा विश्वास सार्थ करण हे खरं राजकारण असत तसं पाहिलं तर राजकारणात सत्ता हि गौण असते . सत्ता येत असते जातं असते .पण सत्तेच्या भोवती फिरण्याच्या नादात लोकाभावनेला तिलांजली मिळता कामा नये. हे सुत्र आणि तत्व पायदळी तुडवून पुढे जाणं उचित नसतं पण हे तत्त्व साध्य तरी कोणाला पचेल अस नाही. पण लोक भावना जपणं हे सध्यातरी कोणालाही पटण्यासारखं नाही.आपला वारू पूढे जावा यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्याची मानसिकता निर्माण होणं मुळात हेच घातक आहे .पण जे सध्या घडतंय ते घातक तर आहेच पण भविष्य अंधकारमय करण्यासाठी पुरेसं आहे.कोण जिंकल कोण हरल हे निवडणुकी पुरत मर्यादित असल पाहिजे एरव्ही विचारधारा हि महत्वपूर्ण असली पाहिजे. हाच राजकारणाचा आश्वासक चेहरा असतो . तसंही राजकारण हे आश्वासक असतं पण सध्याच राजकारण दिवसेंदिवस खुप गढुळ होत चाललं आहे.तत्व , निष्ठा, मुल्य पायदळी तुडवून आपणच कसे निष्ठावंत आणि निष्ठावान आहेत हे प्रकट करण्याचा फंडा तर अजब गजब आहे.हे सगळं पाहुण लोकशाही सुद्धा मनोमन चिंतन करत असेल .जो सगळ्यात जास्त लाभानवित होतो सगळ्यात मोठा अन्याय त्यांच्यावर होतो हे तत्वज्ञान तर भल्या भल्या ज्ञानी पंडितांची बुद्धी बंद पडेल असंच कहिस आहे.एंकदरीत काय तर माझं सगळं खरं माझ्यावर सगळ्यात जास्त अन्याय झाला मला अपमानित केल गेल वगैरे वगैरे हे सगळं ठरलेल गणित असतं . वेळ काळ पात्र बदलतं मात्र सोंग तेच असत. अन्याय सगळ्यांवरच झाला तर मग न्याय कोणालाच मिळाला नाही का ? मला योग्य न्याय मिळाला मी समाधानी आहे असं शेवटी बोलेल असं एकही पात्र राजकारणात शिल्लक नसाव हि किती मोठी शोकांतिका आहे. सत्य कधीतरी कुठेतरी मान्य झालं पाहिजे. आणि मन समाधान पण झालं पाहिजे.एखाद पद जबाबदारी भुषवली तर सन्मान जनक पद्धतीने तिथुन बाहेर पडलं पाहिजे .पदाची असक्ति असता कामा नये . राजकारण हि जन सेवा आहे तर मग जनसेवा हि सगळ्यांना करण्याची संधी उपलब्ध होईल असं वागल पाहिजे.मोह किती असावा याला पण मर्यादा असते .आणि हि मर्यादा समजली तर मग कुठे थांबायचे हे पण समजते . शेवटी लोकांचा विश्वास हा महत्त्वाचा असतो आणि तो टिकविणे, वृद्धिंगत करणे त्याच रक्षण करणं हे खरया अर्थाने लोकशाही राजकारणात अपेक्षित असतं पण विचारांच्या भोवती फिरणार राजकारण समाजकारण हे पदाभोवती फिरू लागल्याने राजकारणाचा चिखल झाला कि चिखलाच राजकारण झालं हे मात्र उमजायला तयार नाही.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad